Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

28 February 2011

एक नमूना

एकजण डॉक्टरकडे जातो.

माणूस : डॉक्टरसाहेब, मला माझ्या चेहर्‍याची प्लॅस्टिक सर्जरी करायची आहे. तेव्हा किती खर्च येईल?

डॉक्टर : कमीत कमी दोन-अडीच लाख तरी नक्कीच.

माणूस : बापरे......पण मी जर प्लॅस्टिक आणून दिलं तर?

डॉक्टर (एकदम भडकून) : जा साल्या, आण आणि तुझं तूच वितळवून लावून घे, तुझ्या थोबाडाला.

हुशार बंड्या


शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत होती की चोरी करणे म्हणजे पाप आहे, गुन्हा आहे, वाईट आहे, वगैरे, वगैरे...

हे मुलांना समजलं की नाही हे तपासून पाहण्यासाठी तिने मुलांना प्रश्न केला.

"सांगा पाहू, मी जर एखाद्या माणसाच्या खिशात त्याच्या नकळत हात घालून त्यातले पैसे काढून घेतले तर तुम्ही मला काय म्हणाल?"

बंड्या हात वर करतो.

शिक्षिका : तू सांग पाहू.

बंड्या : त्या माणसाची बायको.


एका पाहणीचा निष्कर्ष


एक दारुड्या वर्तमानपत्र वाचत बसलेला असतो.

वर्तमानपत्रात एका पाहणीचा निष्कर्ष सांगितलेला असतो.

पाहणीचा निष्कर्ष : महाराष्ट्रात दरवर्षी जेवढे अपघात होतात, त्यापैकी सुमारे २० % अपघात हे दारू पिऊन गाडी चालवल्याने होतात.

दारुड्याचा निष्कर्ष : याचाच अर्थ असा होतो की सुमारे ८० % अपघात हे दारू न पिता वाहन चालविल्याने होतात. म्हणून दारू न पिता वाहन चालविणे धोक्याचे आहे.


27 February 2011

नशा

प्रोफेसर : मुलांनो, मला सांगा सगळ्यात जास्त नशा कशात असते?

एका मुलाला जरा गंमत करण्याची लहर येते.

मुलगा : सर, पुस्तकात.

प्रोफेसर : पुस्तकात, वेडा आहेस की काय?

मुलगा : होय सर, पुस्तक खूप मादक असतं. नुसतं उघडलं तरी झोप येते.

भाषांतर

शिक्षक : संता, मी आता जे वाक्य सांगणार आहे त्याचं इंग्रजीत भाषांतर करू सांग मला.

संता : होय गुरुजी.

शिक्षक : त्याने त्याचे काम केले आणि तो करतच गेला.

संता : ही डन हीज वर्क आणि डन डना डन.

26 February 2011

पेपर कसा लिहावा?

पेपर खूप अवघड आहे?

एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये?

तर मग ही नवीन "आयडियाची कल्पना."

प्रश्नाच्या उत्तरात खालीलप्रमाणे रेघा मारा.

||||||||||||||||||||||||||||||

आणि लिहा, "कृपया, उत्तर पाहण्यासाठी येथे स्क्रॅच करा."

थ्री इडियट्स...

जब Question Paper हो,
out of control,
Answer sheet को करके fold,
Aeroplane बनाके बोल,
..
..
..
..
..
..

All is fail...

Translation

जर एक जाडी मुलगी बसस्टॉपवर बसची वाट बघत बसली असेल, तर हे तुम्ही इंग्रजीत कसे म्हणाल?

सोप्पं आहे, "Motivating."

हे कसं काय? असा प्रश्न पडला ना?

अहो, Motivating म्हणजे, "मोठी वेटिंग."

फाइल कट-पेस्ट कशी कराल?

संताला त्याच्या कम्प्युटरमधली एक फाइल दुसर्‍या कम्प्युटरमध्ये कॉपी करायची असते. तर तो काय करतो ते बघा.

संता पहिल्यांदा त्या फाइलवर Right Click करतो आणि Cut हा पर्याय सिलेक्ट करतो.

मग त्याच्या कम्प्युटरचा माऊस काढतो आणि ज्या PC मध्ये ती फाइल टाकायची आहे, त्या PC ला जोडतो.

आता तो एका फोल्डर उघडून त्यात Right Click करून Paste हा पर्याय सिलेक्ट करतो.

लॉटरीचे पैसे

सरदारजीला एकदा २० कोटी रुपयांची लॉटरी लागते.

तो लॉटरीचं बक्षीस घ्यायला मूळ विक्रेत्याकडे जातो.

विक्रेता केवळ ११ कोटी त्याच्या रुपयेच हातावर टेकवतो.

सरदारजी : हे काय? बाकीचे पैसे कुठे आहेत?

विक्रेता : सर, टॅक्स वजा करून बक्षिसाची एवढीच रक्कम आपल्याला देय आहे.

सरदारजी : हे बघा, एकतर २० कोटी रुपये द्या नाहीतर माझे मला २० रुपये परत द्या.

24 February 2011

जमाना

चौथीचा वर्ग भरला.

गणिताचा तास सुरू होता.

शिक्षक : मुलांनो १ आणि १ किती?

एक मुलगा : १ और १ ग्यारा.

शिक्षक : ए छोट्या, पिक्चरचं नाव नाही विचारलं तुला.

मुलगा : नाही सर, पिक्चरचं नाव नाही सांगत मी.

शिक्षक : चल मग मला सिद्ध करून दाखव.

मुलगा : सर, पण एक अट आहे.
शिक्षक : बरं, ती कोणती?













मुलगा : हीच की त्या दोघांना ९ मुले असावीत म्हणून.

शुभमंगल "सावधान"

पहिला मित्र : अरे मी तर खूप वैतागलो आहे.

दूसरा मित्र : का रे, काय झालं?

पहिला मित्र : काय सांगू, रोज स्वत:चे कपडे धुवून धुवून, घरा-दारात झाडू मारून आणि जेवण बनवून बनवून मी फार वैतागलो आहे. आता म्हणून मी ठरवलं आहे की लग्न करायचं म्हणून.

दूसरा मित्र : ए मूर्खा, मी उलट हे सगळं करून वैतागलोय म्हणून बायकोकडुन घटस्फोट कसा मिळवायचा याचा विचार करतोय.

23 February 2011

वाहतुकीचे नियम पाळा

बंड्या आज शाळेत उशिरा पोचतो.

शिक्षक : का रे बंड्या, आज उशीर कसा काय झाला?

बंड्या : सर, कारण मी आज वाहतुकीचा नियम पाळला म्हणून.

शिक्षक : ते कसं काय?

बंड्या : मी शाळेत येत असताना शाळेजवळ आल्यावर इथे बाजूलाच एक बोर्ड दिसला. त्यावर लिहिलं होतं, "हळू जा, पुढे शाळा आहे."





शाळेचा पहिला दिवस

एका मुलाचा आज शाळेचा पहिला दिवस असतो.

मुलगा संध्याकाळी शाळेतून परत घरी येतो.

त्याची आई त्याला विचारते, "काय रे बाळा, आज काय शिकलास शाळेत?"

मुलगा : फारसं काही नाही, म्हणून तर त्यांनी परत बोलावलंय उद्या.





22 February 2011

बंड्याचा प्रश्न...

शाळेत इतिहासाच्या तासाला गुरुजी शिकवतात की माणसाचा पूर्वज हा माकडच होता.


बंड्या घरी येतो आणि आईला विचारतो, "आई, माझे पूर्वज माकड होते का गं?"

आई : काय माहीत, असतीलही.

बंड्या : तुला कसं माहीत नाही.

आई : कारण तुझ्याबाबांचे पूर्वज कोण होते हे मी त्यांना कधीच विचारलं नाही अजून.

अशी बायको पाहिजे बघा...

मध्यरात्री एका घरात चोर शिरतो.

बायकोला चोर घरात शिरल्याची चाहूल लागते.

ती नवर्‍याला हलवून हलवूनजागं करण्याचा प्रयत्न करते.

बायको : अहो, उठा ना. तो बघा तिकडे कपाटाजवळ चोर उभा आहे. पकडा त्याला. तो सगळे दागिने चोरून नेईल.

नवरा : अगं पण त्याच्याकडे एखादं हत्यार वगैरे असलं तर जीव घेईल ना तो माझा.
बायको : मग काय??? अहो, तुमचा विमा तरी आहे, पण त्या दागिन्यांचा नाहीये, समजलं का?

21 February 2011

लेक्चर

ते वर्गात आले, आम्ही बघत राहिलो
ते बोलत राहिले, आम्ही ऐकत राहिलो
त्यांनी काहीतरी विचारलं, आम्ही शांत राहिलो
जेव्हा ते जाऊ लागलो,
तेव्हा मात्र आम्ही त्यांना म्हणालो,

सर अटेंडन्स तरी घेऊन जा...





मला पास करा हो...

एक विद्यार्थी जंग जंग पछाडुनही काही केल्या साठे सरांच्या विषयात पास होतच नव्हता.

शेवटी त्याने एक युक्ती करायची ठरवली.

परीक्षेत पेपर सोडवल्यावर त्याने त्या पेपरमध्ये १०० रुपयांची नोट घालून ठेवली आणि लिहिले, "एका मार्कास १ रुपया."

साठे सरांनी त्या मुलाचा पेपर तपासला.

साठे सर अतिशय कडक स्वभावाचे.

परंतू एक शब्दही न बोलता, न रागावता त्यांनी त्या मुलाला ८४ रुपये परत केले.

मुलाने याचं कारण विचारलं, तर गालातल्या गालात स्मितहास्य करत म्हणाले, "तुला १६ च मार्क मिळाले."

Definition of Lecturer

प्रोफेसर : (एका झोपलेल्या विद्यार्थ्याला उठवत) महाराज, मला लेक्चररची व्याख्या सांगा. मी काय प्रवचन देतोय?

विद्यार्थी : नाही सर. लेक्चरर म्हणजे कुणी झोपलेलं असल्यास फुकट, निष्फळ बडबड करण्याची घाण सवय असलेली व्यक्ती.





हस्ताक्षर

शिक्षक : काय रे बंड्या, काय आहे हे? एवढं घाणेरडं अक्षर मी आयुष्यात कधी पाहिलं नाही.

बंड्या : अहो गुरुजी, आहे हेच चांगलंय. मी अक्षर चांगलं काढलं तर तुम्हाला स्पेलिंगपण चुकीची दिसतील.





दीर्घायुष्य

एक माणूस : डॉक्टर, माझं आयुष्य वाढावं यासाठी काही उपाय सांगू शकाल का?

डॉक्टर : तुम्ही एक काम करा, लग्न करून टाका.

माणूस : हो पण त्यामुळे आयुष्य कसं काय वाढेल?

डॉक्टर : बरोबर आहे तुमचं. पण हे बघा, त्यामुळे तुमच्या मनात आयुष्य वाढून जास्त जगण्याचा विचार मात्र येणार नाही.





वाहतुकीचे नियम पाळा

एका अभियांत्रिकी महाविद्यालयात वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृती करण्याचे ठरवले.
एका विद्यार्थ्याला यासाठी एक सूचक असा फलक लिहिण्यास सांगण्यात आले.

त्याने तो खालीलप्रमाणे लिहिला.

“Drive Carefully!
Don’t kill the students,
wait for the Teachers”

19 February 2011

गाडीच्या मागे जपून लिहा

एक सरदारजी कारने ऑफिसला चाललेला असतो.

त्याच्या कारच्या मागे लिहिलेलं असतं, "सावन को आने दो।"

मागून एक ट्रक जोरात येतो आणि त्याच्या कारला ठोकतो.

ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं, "आया सावन झुमके ।"

18 February 2011

व्यवसाय असा करा

एक दुकानदार पॅरॅशूट विक्रीचा व्यवसाय करायचं ठरवतो.

एक ग्राहक त्याच्याकडे पॅरॅशूट घेण्यासाठी येतो.

ग्राहक : (शंका येऊन) अहो, हे पॅरॅशूट चांगल्या प्रतीचं आहे ना? उडी मारल्यावर बटन दाबताच उघडेल ना?

दुकानदार : हो नक्कीच. अगदी खात्रीचा माल आहे.

ग्राहक : आणि नाही उघडलं तर?

दुकानदार : तुमचे पैसे परत. अगदी खात्रीचा माल आहे.

फरक

घड्याळ आणि बायकोमध्ये काय फरक आहे?

एकदम सोप्पं.

घड्याळ बिघडलं को बंद पडतं,
आणि
बायको बिघडली की चालू होते.

16 February 2011

मेडीकलची येडी पोरं

MBBS चा वर्ग चालू होतो.

आज विद्यार्थ्यांचा कॉलेजमधला पहिलाच दिवस असतो आणि त्यातही हे पहिलंच प्रात्यक्षिक (Practical).
प्रात्यक्षिक चालू होतं.

प्रात्यक्षिकादरम्यान एक मेलेला कुत्रा टेबलावर मांडला जातो.
सगळी मुलं त्या कुत्र्याकडं किळसवाण्या नजरेने बघतात. प्राध्यापक हॉलमध्ये येतात आणि सुरुवात करतात.

प्राध्यापक : चला, आज मी तुम्हाला शिकवण्यासाठी कुत्र्याचं प्रेत आणलय. आता मी करतो तसं तुम्ही करायचं. डॉक्टर व्हायचं असेल तर घाणेरडेपणाला लाजायचं नाही की प्रेतालाही घाबरायचं नाही.
सगळे तयार?

विद्यार्थी : हो...

प्राध्यापक : तर नीट बघा, तुम्हाला काय करायचं आहे ते.

असं म्हणून प्राध्यापक आपलं एक बोट त्या मेलेल्या कुत्र्याच्या तोंडात घालतात आणि बाहेर काढून आपल्या तोंडात घालतात.

या प्रकाराने सगळे विद्यार्थी किळस येऊन त्यांच्यासारखं करायला घाबरतात. पण मग एक एक करून सगळे मोठ्या उत्साहाने मेलेल्या कुत्र्याच्या तोंडात बोट घालून बाहेर काढतात आणि स्वत:च्या तोंडात घालून चोखतात.

प्राध्यापक : यातून तुम्ही काय शिकलात?
कुठल्याही गोष्टीचं चांगलं निरीक्षण करायचं.

कारण, मी माझ्या हाताच्या तर्जनीचं बोट कुत्र्याच्या तोंडात घातलं, पण माझ्या तोंडात मात्र तर्जनीच्या बाजूचं बोट घातलं.




वर्ग

इंजिनियरिंगचा वर्ग म्हणजे रेल्वेच जणू.


आता बघा ना.


पहिले २ बेंच म्हणजे आरक्षित डबे. - Reserved Coaches


मधले काही बेंच म्हणजे साधारण डबे. - General Compartments



आणि



मागचे २ बेंच म्हणजे अतिमहत्वाच्या व्यक्तींचे वातानुकूलित डबे. - VIP Sleeper Coaches





व्यवसायातली प्रगती

धीरूभाई अंबानी स्वर्गातून आपल्या मुलाला म्हणजे अनिल अंबानीला फोन लावतात.

धीरूभाई : अरे बाळा, आपली रिलायन्स कशी चालू आहे?

अनिल : हॅलो, हॅलो......

धीरूभाई : अरे, मी म्हणालो, आपली रिलायन्स कशी चालू आहे?

अनिल : हॅलो, अहो पप्पा, मला काही नीट ऐकू येत नाहीये. तुम्ही असं करा माझ्या आयडिया मोबाइलवर कॉल करा.





09 February 2011

पतीची व्याख्या



चुकीचा असलेल्याने चूक कबूल केल्यास त्याला प्रामाणिक म्हणतात.

खात्री नसल्यास शांत राहतो त्याला हुशार म्हणतात.

आणि

बरोबर असूनही शरणागती पत्करतो,

त्याला म्हणतात पती.

08 February 2011

पती आणि गाढव


पती आणि गाढव यांच्यातला फरक काय?

पती गाढव बनू शकतो,

पण गाढव इतकेही गाढव नसते की ते पुन्हा पती बनू शकेल.

स्वप्नाचा अर्थ


पत्नी : अहो, मी रात्री ना एक छानसं स्वप्नं पाहिलं. तुम्ही मला किनई सोन्याच्या दुकानात घेऊन गेला होतात, दागिने खरेदीसाठी.

पती : अगं हो, मलाही हेच स्वप्नं पडलं.

पत्नी : अय्या, किती छान. तुम्ही पण हेच पाहिलं स्वप्नात?

पती : हो, आणि आपण दागिने खरेदीसुद्धा केले बरं का. महत्वाचं म्हणजे मी नको नको म्हणत असतानासुद्धा सगळं बिल तुझ्या कंजूस बापाने भरलं.

06 February 2011

How this works?

एक सरदारजी आपल्या घरी चालला होता.

सिग्नल लागला आणि त्याने गाडी थांबवली.

खाली उतरून तो झेब्रा क्रॉसिंगजवळ गेला आणि त्यावर इकडून तिकडे, तिकडून इकडे असे ४-६ फेरे मारले.

सिग्नलला थांबलेले सगळे लोक त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले.

एकाने विचारलं, "ए भाऊ, वेडा आहेस की काय? काय चाललय हे?"

सरदारजी : मला एक कळत नाही, हा पियानो वाजतो तरी कसा.

05 February 2011

why?


१. चोर चोरी करताना का घाबरतो?
कारण – आपण चोरलेला माल दूसरा चोर तर चोरून नेणार नाही ना म्हणून.

२. शाहजहानने आपल्या बेगमसाठी ताजमहालच का बांधून घेतला?
कारण – तो बादशहा होता. मग बेगमसाठी तो झोपडी कशी बांधणार?

शिक्षण...

शिक्षक : बंड्या मला इंग्रजीतलं असं एक वाक्य सांग जे "I" ने चालू होतं.

बंड्या : I is the...

शिक्षक : अरे मूर्खा थांब, थांब. I नंतर कधी is लावतात का? I नंतर am लावायचा समजलं?

बंड्या : I am the ninth letter of alphabet.





पप्पांचा राग

बंड्याचे पप्पा : हे बघ बंड्या, नालायका, पास झाला नाहीस ना तर मला पप्पा म्हणू नकोस. मला लाज वाटेल तुझा बाप म्हणून घ्यायची. समजलं?

काही दिवसांनी...

बंड्याचे पप्पा : का रे आज निकाल होता ना? काय झालं?

बंड्या : सॉरी यार मोहनशेठ, मी नापास झालो.





शोधा पाहू...

A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z

शोधा पाहू वरील ओळीत १ राहिलय.

दुसर्‍यांदा वाचताय?

पुन्हा वाचताय?

अरे मूर्खांनो,

A B C D मध्ये कधी १ येतो का?





04 February 2011

आभारी


एके दिवशी संता आपल्या पार्क केलेल्या गाडीजवळ आला आणि पाहतो तर काय, गाडीला “पार्किंग फाईन” असं लेबल लावलेलं दिसलं.

संताने ते लेबल काढलं आणि गाडी घेऊन जाण्यापूर्वी तिथल्या बाजूच्या खांबावर एक दुसरं लेबल चिकटवलं.

त्यावर त्याने लिहिलेलं होतं, “आभारी आहे.”

हवामानाचा अंदाज

एके दिवशी सरदारजी एका हातात ग्लोव्ह घालून एक हात ग्लोव्हविना असा सकाळी सकाळी पळायला घराबाहेर पडतो.

वाटेत त्याचा मित्र त्याला भेटतो.

मित्र : काय रे, तू एकाच हातात का ग्लोव्ह घातला? दोन्ही हातात का नाही?

संता : काय करू? आज वेधशाळेचा अंदाज आहे, की हवामान एका बाजूने थंड तर एका बाजूने गरम राहील म्हणून.

हे कोण होते?


शिक्षक : बंड्या सांग पाहू, राजा राम मोहन रॉय हे कोण होते?

बंड्या : (जरा विचार करून) सर ते सर्व जिवलग मित्र होते.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...