Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label नवरा आणि बायको. Show all posts
Showing posts with label नवरा आणि बायको. Show all posts

29 March 2020

धीर सोडू नका ..

अजून १८ दिवस तुम्हाला बायको बरोबर घरी  काढायचे आहेत ....😟😟😟

शांत रहा ..
😌😌

धीर सोडू नका ..
🥺🥺🥺

तोंड उघडू नका ..
😷😷😷

रिकामा पुरुषार्थ दाखवू नका..
😠😠😠😠😠 

नजर खालीच ठेवा ...
😌😌😌😌😌

कोणताही वाद विवाद करू नका ...🤫🤫🤫🤫

काही हवे असेल तर विनंती करा ..👏🤤🤤🤤

डोक्यातला राग डोळ्यात दिसू देऊ नका ...🙄🙄🙄🙄

गरीब चेहरा ठेवा ...
🙂🙂😦😦😦

एका आवाजात धावत जा ..
🏃🏿‍♂️🏃🏿‍♂️🏃🏿‍♂️🏃🏿‍♂️

कोणतीही गोष्ट असो परवानगी घ्या ...🤗🤗🤗

प्रत्येक घर कामात पुढे पुढे करा ..🧚‍♂️🧚‍♂️🧚‍♂️🧚‍♂️🧚‍♂️

ऑर्डर दयायचा मूर्खपणा करू नका ..😝😝😝😝

बायको पुढे रिकामा attitude दाखवू नका ...😤🧛‍♀️

उपाशी रहावे लागेल असे कोणतेही कृत्य करू नका ...
😭😭😭😭😭😭

संयम आणि समजदारी ने विचार करून वागा 🙂

बायकोचे रागात बोलणे मनावर घेऊ नका ..😇😇😾😾

येथे साम्राज्य त्यांचे आहे हे समजून घ्या ...
🧛‍♀️🧛‍♀️🧛‍♀️🧛‍♀️🧛‍♀️🧛‍♀️🧛‍♀️

🐊🐊🐊🐊🐊🐊🐊

21 दिन पाणी में रहना है तो मगरमच्छ से बैर नहीं । 
🙂
🙂

आणि शेवटी सर्वात महत्वाचं 
..
..
भिऊ नका ...
🥶🥵🥵🥵🥵
हे दिवस निघूनच जातील ..

Stay at home, Stay quiet, Stay safe 

😜🤪🤪🤪😄😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

14 November 2016

असाही उपचार

एक माणूस दवाखान्यात उपचारासाठी गेला.


डॉक्टर : तुम्हाला विश्रांतीची खूप गरज आहे. एक झोपेची गोळी लिहून देतोय. बायकोला द्या.


13 November 2016

बापरे...!!!

एकदा एक बाई एका ज्योतिषाकडे गेली.

ज्योतिषी : बोला, कुणाचं भविष्य जाणून घ्यायचं आहे? तुमच्या नवऱ्याच सांगू?


बाई : नको. त्यांचं भविष्य तर माझ्या हातात आहे. फारतर त्यांचा भूतकाळ सांगा.


12 November 2016

बायकांची समस्या



बायकांची सगळ्यात मोठी समस्या ही असते कि,

जेव्हा त्या सून असतात, तेव्हा त्यांना सासू चांगली मिळत नाही,

आणि


जेव्हा त्या सासू होतात, तेव्हा त्यांना सून चांगली मिळत नाही.


11 November 2016

बायकोचं वय



नवरा : एका सर्वेक्षणानुसार, जे लोक जास्त बोलतात त्यांचं वय कमी होतं.

बायको : खरं कि काय? त्यामुळेच मी ४० ची असूनही सगळे म्हणतात कि २० ची वाटते म्हणून.


07 November 2016

हसू नका बर...

जर ग्लास पडून फुटला आणि तरीही,

घरामध्ये शांतता असेल,

तर,

तो नक्कीच बायकोकडून फुटलेला असेल...


पैज लावून सांगतो...


06 November 2016

नवीन नवीन लागलेला शोध



बायकांनी नवऱ्यासाठी करवा चौथचं व्रत करण्याऐवजी मौनव्रत केल्यास पती २५ वर्षे जास्त जगू शकतो.


देवदर्शन



बायको : अहो, मी रोज या आशेने भक्तीभावाने पूजा करते; कि एक दिवस मला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होईल.


नवरा : त्यापेक्षा मीराबाई बनून विष पिऊन घे. सर्व ३३ कोटी देवांचं दर्शन होईल.


10 November 2015

फायद्याचा सौदा


नवरा : काय गं, आजकाल मी दारू पितो, सिगारेट ओढतो तरी तू मला काहीच का बोलत नाहीस. आधी तर घर डोक्यावर घ्यायचीस.


बायको : कारण, काल ना इन्शुरेंसवाले आले होते. त्यांनी मला या सगळ्याचा काय फायदा आहे ते सांगितलं, म्हणून.


17 October 2015

एक खोज


पुरातत्व विभागाच्या लोकांना हजारो वर्षांपूर्वीचा एका बाईचा जबडा मिळाल्याची पक्की खबर आहे.

हा जबडा अजूनही चालू अवस्थेत असल्याने हा एखाद्या बाईचाच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.


05 August 2015

आता भीती कुणाची कशाला?


बायको : अहो, इकडे तोंड करून झोपा ना. मला फार भीती वाटतेय.

नवरा : वा गं बाई. तुला फक्त स्वत:चीच काळजी. मग भले घाबरून माझा जीव गेला तरी चालेल, हो ना?


02 August 2015

सहानुभूती? ठेव तुझ्याकडेच...

एक बेवडा नेहमीप्रमाणे डुलत घरी येतो.

बायको : जो माणूस रोज निर्लज्जासारखा दारू पिऊन घरी येतो, त्याच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल सहानुभूती नाहीये, समजलं?


बेवडा : ए चल हट...ज्याला रोज दारू मिळते ना, त्याला तुझ्या सहानुभूतीची गरजच नाहीये, समजलं?


26 July 2015

बायकोची व्यापम (मोठ्ठी) धमकी !!!



बहुचर्चित “व्यापम” घोटाळ्यात जी साक्षीदारांची एकामागून एक संशयास्पदरित्या हत्या होतेय, त्याच्या पार्श्वभूमीवर...

एकदा नवरा-बायकोची तूफान भांडणं होतात.

बायको नवर्‍याला धमकीच देऊन टाकते.


बायको : तुम्ही लिमिटमध्ये रहा, नाहीतर फेसबूकवर माझं status update करीन की माझ्या नवर्‍याला "व्यापम घोटाळ्याची" पूर्ण माहिती आहे म्हणून.


Be Careful...

दोन नवर्‍यांमधला हा संवाद.

पहिला : अरे, परवा माझी बायको विहिरीत पडली.

दूसरा : मग आता कशी आहे तिची तब्येत?


पहिला : काय सांगू, पडली तेव्हा खूप लागलं तिला, खूप ओरडत होती. पण कालपासून एकदम शांत आहे. विहीरीतून बिलकुल आवाज नाही आला.


14 July 2015

लग्न = बिजली

लग्न हे एखाद्या विजेच्या तारेसारखं असतं.

तार जुळली तर आयुष्यात उजाला,


नाहीतर आयुष्यभर झटके

05 July 2015

बारीक केसांचा फायदा


एक माणूस केस कापायला व्हाव्याकडे जातो.

माणूस : केस एकदम बारीक कापा.

न्हावी : किती बारीक?


माणूस : बायकोच्या हातात येणार नाहीत एवढे बारीक.


विचित्र बायका


बायका किती विचित्र असतात नाही?

यांना देवदास मधला शाहरुख दारू पिल्यावर "रोमॅंटिक" वाटतो.

आणि तोच आपला नवरा पिऊन आला तर “बेवडा” वाटतो.


शहीद



जावई वयाने सगळ्यात लहान असला तरी त्याला सासरचे लोक अहो-जाहो करून बोलवतात.

कारण, आपल्या देशात शहिदांचे नाव सन्मानाने घेण्याची परंपरा आहे.


16 June 2015

परेशान, परेशान…


तो देवळात जातो,

तो मशिदीत जातो,

तो चर्चमध्ये जातो,

तो गुरुद्वारातपण जातो,

तो,

ज्या धर्माचं प्रार्थनास्थळ दिसेल तिथे सगळीकडे जातो,

कारण, तो परेशान नवरा असतो;


ज्याचा कुठलाही धर्म नसतो.

02 June 2015

आत्महत्येचे प्रकार

आत्महत्या दोन प्रकारच्या असतात.

पहिली एकदम पटकन आणि सोप्या पद्धतीने, गळ्यात रश्शी अडकवा, पंख्याला लटकवा आणि कायमचे लटका.


आणि दुसरी एकदम हळूहळू म्हणजे पहिल्यांदा खूप निरखून पारखून वधू शोधा, गळ्यात वरमाला घाला आणि कायमचे लटका.


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...