Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label विमान. Show all posts
Showing posts with label विमान. Show all posts

16 July 2013

AIR INDIA


जेवणाची वेळ झाल्यावर एयर इंडियाच्या विमानात एक हवाईसुंदरी एका प्रवाशाला विचारते, “तुम्हाला भोजन हवंय का?

प्रवाशी : यात पर्याय कोणकोणते आहेत?


हवाईसुंदरी : फक्त दोनच, हो किंवा नाही.

02 July 2011

अशीही माणसं असतात?

एक कंजूष मारवाडी असतो.

तो एकदा अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचं काम असल्यानं आणि ताबडतोब करायचं असल्यानं नाईलाज म्हणून विमानप्रवास करत असतो.

विमानाने उड्डाण करून काही अंतर पार केल्यावर विमान वादळात भरकटत. पायलटचं त्यावरील नियंत्रण सुटतं. आता कुठल्याही क्षणी विमान पडणार असतं.

विमानातील सगळे प्रवासी घाबरून जातात. पण फक्त मारवाडीच हसत असतो.

सगळे लोक त्याच्यावर जाम वैतागतात. इथे बाकीच्यांना जिवाची पडलीये आणि हा हसतोय???
ते त्याला कारण विचारतात.

मारवाडी : कारण, मी परतीच्या प्रवासाचं तिकिटच काढलं नव्हतं. तेवढे पैसे वाचले माझे.

19 April 2011

संताचा विमानप्रवास

एकदा संता विमानात बसतो.

विमान उड्डाण घेण्यासाठी धावपट्टीवर धावू लागतं.

तेवढ्यात संता पायलटच्या केबिनमध्ये जाऊन त्याच्या कानाखाली जोरदार आवाज काढतो.

पायलट : मला का मारलं?

संता : मला तातडीच्या कामास उशीर होतोय म्हणून मी आज खास विमानात प्रवास करीन म्हटलं, तर तू रस्त्यानी विमान पळवतोयस काय मूर्खा?


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...