Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label शाळा. Show all posts
Showing posts with label शाळा. Show all posts

20 July 2014

व्याकरणाचा अभ्यास : काळ ओळखा


एक गृहिणी आपल्या मुलांचा अभ्यास घेत असते.

ती आपल्या मुलाला व्याकरणातला एक प्रश्न विचारते, “सांग बरं, मी सुंदर आहे; या वाक्याचा काळ कोणता?


बाजूला बसलेला नवरा पटकन म्हणतो, “अर्थातच, भूतकाळ.”


02 October 2012

हुशार नव्हे स्मार्ट...बंड्या...!!!


एका शाळेचे मुख्याध्यापक स्वत:ला खूप (अति) शहाणे समजत असत.

ते एकदा दहावी “अ”मध्ये येऊन मुलांना म्हणतात,मी आज तुमची परीक्षा घेणार आहे. बघूया कोण हुशार आहे तुमच्यापैकी.

बंड्याला उभं राहायला सांगून त्याला विचारतात, “मला सांग बंड्या, गाढवा, जर आपल्या शाळेसमोर बॉम्ब दिसला तर तू काय करशील?

बंड्या : मास्तर, मी जरा वेळ वाट बघीन. कुणी उचलून नेला तर ठीक, नाही तर तो उचलून मी तुमच्या केबिनमध्ये आणून ठेवीन.

05 May 2012

उदाहरण द्या...


शिक्षक : त्याने आत्महत्या केली आणि त्याला आत्महत्या करावी लागली, या दोन वाक्यांना उदाहरण देऊन स्पष्ट करा.

बंड्या : गुरुजी, त्याने आत्महत्या केली कारण, तो सुशिक्षित बेरोजगार होता आणि त्याला आत्महत्या करावी लागली कारण, तो विवाहित होता.

03 May 2012

वर्गाचा CPU


गणिताचा तास संपलेला असतो आणि इतिहासाचे शिक्षक वर्गात येईपर्यंत वर्गात मुलांचा धिंगाणा चालू होतो.

मुलांचा गोंधळ कमी करण्यासाठी एक मुलगा उठून उभा राहतो आणि म्हणतो, “सगळ्यांनी शांत बसा नाहीतर मी गोंधळ करणार्‍यांची नावे फळ्यावर लिहीन.”

बंड्या त्याला विचारतो, “काय रे, तू कोण आमची नावं लिहिणार? गप खाली बस.”

मुलगा : मी वर्गाचा Monitor आहे.

बंड्या : मग मी वर्गाचा CPU आहे, समजलं?

30 March 2012

पुन्हा शाळा??? नको रे बाबा...


दोन मित्र एकाच वर्गात दुसर्‍यांदा नापास होतात.

पहिला : काय कटकट आहे ही. चल आपण आत्महत्या करू.

दूसरा : नको रे बाबा. नाहीतर पुढच्या जन्मी पुन्हा जूनियर के.जी. पासून सुरुवात करावी लागेल.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...