Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label bomb blasts. Show all posts
Showing posts with label bomb blasts. Show all posts

02 October 2012

हुशार नव्हे स्मार्ट...बंड्या...!!!


एका शाळेचे मुख्याध्यापक स्वत:ला खूप (अति) शहाणे समजत असत.

ते एकदा दहावी “अ”मध्ये येऊन मुलांना म्हणतात,मी आज तुमची परीक्षा घेणार आहे. बघूया कोण हुशार आहे तुमच्यापैकी.

बंड्याला उभं राहायला सांगून त्याला विचारतात, “मला सांग बंड्या, गाढवा, जर आपल्या शाळेसमोर बॉम्ब दिसला तर तू काय करशील?

बंड्या : मास्तर, मी जरा वेळ वाट बघीन. कुणी उचलून नेला तर ठीक, नाही तर तो उचलून मी तुमच्या केबिनमध्ये आणून ठेवीन.

23 July 2011

भाकीत (?)

१३ जुलै, २०११ ला मुंबईत खाऊगल्ली, झवेरी बाजार आणि ओपेरा हाऊस इथे जे बॉम्बस्फोट झाले, त्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान झरदारी आणि आपले भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यामध्ये झालेलं हे संभाषन.

झरदारी : हॅलो, नमस्कार मनमोहनसिंगजी. मुंबईत आत्ताच खाऊगल्ली, झवेरी बाजार आणि ओपेरा हाऊस इथे जे बॉम्बस्फोट झाले, त्याबद्दल मला खूप दु:ख वाटते. अनेक निरपराध माणसे यात नाहक मारली गेली आणि वित्तहानीसुद्धा झाली. पण मला इथे आवर्जून एक खुलासा करावासा वाटतोय तो म्हणजे, याहीवेळी तुमची संशयाची सुई आमच्याकडे असेल; परंतु आमचा मात्र याच्याशी काहीही संबंध नाहीये.

मनमोहनसिंग : अहो, कसले बॉम्बस्फोट? कसली वित्तहानी? कसला खुलासा?

झरदारी : (डोकं खाजवत, गडबडून) तुमच्या घड्याळात किती वाजलेत?

मनमोहनसिंग : ६ वाजून १५ मिनिटे.

झरदारी : अरे देवा...माझ्या घड्याळात ६ वाजून ४५ मिनिटे झालेली आहेत. आमचं घड्याळ तुमच्यापेक्षा ३० मिनिटे लवकर आहे, हे मी विसरलोच होतो. माफ करा हं ! त्यामुळेच मी तुम्हाला चुकून अर्धा तास अगोदर फोन केला.



14 July 2011

काळजी करण्याचं काही कारण नाही...


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश जेव्हा भारताला भेट देतात, त्यावेळी आपले पंतप्रधान मा.वाजपेयी यांच्याशी आंतरराष्ट्रीय दहशतवाद या गहन प्रश्नावर चर्चा करत असतात.

जिथे बॉम्बस्फोट झाले अशा ठिकाणी मुंबईच्या रस्त्यावरून पाहणी करत फिरत असतानाही ही चर्चा चालूच असते.

बुश : आम्हालाही माहीत आहे, की हा दहशतवाद पाकिस्तान पोसत असून त्यांचाही यात फार मोठा हात आहे. पण आंतरराष्ट्रीय दबाव असल्याने अगदीच थेट कारवाई करण्यासाठी विचार करावा लागतो.

वाजपेयी : त्यात काय एवढं, ते पाकिस्तानी आहेत तरी किती...फार फार तर १४-१५-२० कोटी. जगातले एवढे लोक मारले तरी त्याची कुणाला पर्वा वाटण्याचं कारण नाही.

बुश : असं कसं म्हणता येईल? आजकाल अगदी सामान्य माणूसही लगेच पेटून उठतो अशा कृत्यांविरुद्ध.

रस्त्याने जाणार्‍या एका चहावाल्याला वाजपेयी हाक मारतात. त्याच्याकडून दोन कटींग घेतात.

वाजपेयी : (चहावाल्याला) हे बघ हे मि. बुश. अमेरिकेचे अध्यक्ष. आपल्याकडे आलेत परवा ते बॉम्बस्फोट झाले ना त्याची पाहणी करायला. आता आम्ही ३ र्‍या महायुद्धाची तयारी करत आहोत. १५-२० कोटी पाकिस्तानी आणि एक सायकलवाला मारण्याचा विचार सुरू आहे.

चहावाला : (आश्चर्याने) एक सायकलवाला?

वाजपेयी लगेच बुश यांना म्हणतात, पाहिलंत? मी म्हणालो होतो ना, ह्या पाकिस्तान्यांची काळजी करत नाही कुणी.





मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...