अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश जेव्हा भारताला भेट देतात, त्यावेळी आपले पंतप्रधान मा.वाजपेयी यांच्याशी आंतरराष्ट्रीय दहशतवाद या गहन प्रश्नावर चर्चा करत असतात.
जिथे बॉम्बस्फोट झाले अशा ठिकाणी मुंबईच्या रस्त्यावरून पाहणी करत फिरत असतानाही ही चर्चा चालूच असते.
बुश : आम्हालाही माहीत आहे, की हा दहशतवाद पाकिस्तान पोसत असून त्यांचाही यात फार मोठा हात आहे. पण आंतरराष्ट्रीय दबाव असल्याने अगदीच थेट कारवाई करण्यासाठी विचार करावा लागतो.
वाजपेयी : त्यात काय एवढं, ते पाकिस्तानी आहेत तरी किती...फार फार तर १४-१५-२० कोटी. जगातले एवढे लोक मारले तरी त्याची कुणाला पर्वा वाटण्याचं कारण नाही.
बुश : असं कसं म्हणता येईल? आजकाल अगदी सामान्य माणूसही लगेच पेटून उठतो अशा कृत्यांविरुद्ध.
रस्त्याने जाणार्या एका चहावाल्याला वाजपेयी हाक मारतात. त्याच्याकडून दोन कटींग घेतात.
वाजपेयी : (चहावाल्याला) हे बघ हे मि. बुश. अमेरिकेचे अध्यक्ष. आपल्याकडे आलेत परवा ते बॉम्बस्फोट झाले ना त्याची पाहणी करायला. आता आम्ही ३ र्या महायुद्धाची तयारी करत आहोत. १५-२० कोटी पाकिस्तानी आणि एक सायकलवाला मारण्याचा विचार सुरू आहे.
चहावाला : (आश्चर्याने) एक सायकलवाला?
वाजपेयी लगेच बुश यांना म्हणतात, “पाहिलंत? मी म्हणालो होतो ना, ह्या पाकिस्तान्यांची काळजी करत नाही कुणी.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.