Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label राहुल गांधी. Show all posts
Showing posts with label राहुल गांधी. Show all posts

12 July 2016

काय रे देवा, काय करू ह्याचं?

मोदींनी पेट्रोलचे दर १० रुपयांनी कमी केले.

राहुल : मोदींनी पेट्रोलचे दर कमी केल्याने ते २०१० मध्ये जितके होते, तितके झालेत.
            मोदी देशाला पुढे घेऊन जाण्याऐवजी, मागे घेऊन जात आहेत.


25 April 2015

संयोजक असावा तर असा...




राहुल गांधींच्या सभेला खूप कमी गर्दी होत असताना, पुण्यातील सभेच्या संयोजकांनी मात्र खूप गर्दी जमवलेली.

सभा पार पडल्यानंतर संयोजकांना विचारले असता त्यांनी याचं रहस्य सांगितलं.


ते म्हणाले,मी प्रत्येकाच्या घरा-घरात एक निरोप पाठवला की तुम्ही सभेला आला नाहीत तर राहुल गांधी तुमच्या घरी येतील.


23 April 2015

आतली बातमी


राहुल गांधी दोन महिन्यांची सुट्टी संपवून आले तो दिवस पुढील वर्षीपासून “राहुल गांधी दिवस” म्हणून साजरा होणार आहे.


04 June 2012

च्या असला...

एकदा राहुलजी एका गरीब शेतकऱ्याच्या घरी जातात.

त्यांना त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या असतात.

तेवढ्यात एक मुलगा येतो आणि म्हणतो, “साहेब, ह्यावर्षी वर्षामुळे सगळी पिक खराब झाली बघा.”


राहुल : त्या वर्षाच्या आई-वडिलांना बोलवा. मी बोलतो त्यांच्याशी.


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...