Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label पोलीस. Show all posts
Showing posts with label पोलीस. Show all posts

26 January 2016

सतर्क रहा...


आपल्या देशात “हाय अलर्ट” म्हणजे पोलिसाला हातात काठी पकडवून नाक्या-नाक्यावर उभे करणे.


जसे काय दहशतवादी “एके ४७” घेऊन नव्हे तर “म्हशी” घेऊन हल्ला करणार आहेत.


19 December 2015

नाम है विजय दीनानाथ चौहान, हांय...


अमिताभ बच्चन आपल्या नुकत्याच घेतलेल्या नव्याकोर्‍या लक्झरी कार ओस्टिन मोर्टिन मधून जात होता.

अचानक अमिताभला कार चालविण्याची हुक्की आली.

त्याने ड्रायवरला मागे बसविले आणि स्वत: कार चालवण्याचा आनंद घेऊ लागला.

सिग्नल तोडल्याने एका ट्राफिक हवालदाराने गाडी अडवली.

आत वाकून बघतो तर अमिताभ !!!

हादरलाच तो हवालदार. त्याने आपल्या एसीपी साहेबांना हाक मारली.

हवालदार : सर, सिग्नल तोडला म्हणून मी ही गाडी अडवली. पण पावती फाडण्याची माझी हिम्मतच होत नाहीये. फार मोठी व्यक्ती बसलीय आत.

एसीपी : कोण राजा बसलाय?


हवालदार : सर, ते माहीत नाही. पण त्याने अमिताभ बच्चनला ड्रायवर ठेवलय.


23 April 2015

आनंदोत्सव


पोलीस (एका चोराला) : काय रे, तू सोनाराच्या दुकानातून हार का चोरलास?


चोर : अहो साहेब, सोनारानेच ऑफर लावली होती की अक्षयतृतीयेच्या दिवशी शंभर टक्के लाभ घ्या म्हणून.


27 July 2013

अदृश्य पोलीसमामा

एकजण चौकात सिग्नलला लाल दिवा असताना आपली गाडी दामटतो.

झाडामागे लपलेले पोलीसमामा चटकन गाडीसमोर येऊन त्याला बाजूला घेतात.

मामा : काय रे, लाल दिवा दिसला नाही का?


तो : साहेब, लाल दिवा दिसला की. पण तुम्ही नाही दिसलात ना.


29 July 2011

दूरचा नातेवाईक

पोलीस रात्रीच्या गस्तीवर असताना संशयावरून एकाला पकडतात.

दुसर्‍या दिवशी चौकशीसाठी त्याच्या भावाला चौकीवर बोलावून घेतात.

पोलीस : हा तुझा कोण आहे?

आरोपीचा भाऊ : तो माझा दूरचा नातेवाईक आहे.

पोलीस : काय नातं आहे तुझं त्याच्याशी?

आरोपीचा भाऊ : तो माझा सख्खा भाऊ आहे?

पोलीस : (दरडावून) मग दूरचा नातेवाईक काय म्हणतोस?

आरोपीचा भाऊ : अहो म्हणजे, त्याच्या आणि माझ्यात सहा भावांचं अंतर आहे ना म्हणून.



12 July 2011

वा रे पोलीस...

एका पोलीसाच्या घरात चोर शिरतात.

त्याच्या बायकोला याची चाहूल लागते.

बायको : अहो, उठा. उठा की. चोर शिरलेत घरात.

पोलीस : च्यायला, गप ए. मी आत्ता ड्युटीवर नाहीये.

06 July 2011

नो एंट्री...

एक वाहनचालक नो एंट्रीत घुसला.

पुढे गेल्यावर त्याला मामा दिसले. पण पळणार तेवढ्यात दबा धरून बसलेल्या मामांनी या शिकारीला पकडले.

मामा : काय रे, दिसत नाही का, इथून नो एंट्री आहे म्हणून???

वाहनचालक : दिसतोय हो बोर्ड, पण मला वाटले की तो पिक्चरचा बोर्ड आहे.

04 July 2011

बच्चे भी जानते है, इसके सारे गुण...

बच्चे भी जानते है, इसके सारे गुण...
माफ करा, वाटत असली तरीही ही “आयोडीन नमक”ची जाहिरात नाहीये...पुढे वाचा मग कळेलच.

मुलगा : पप्पा, ह्या प्रगतिपुस्तकावर सही द्या ना.

पोलीस बाप : हे काय, तुझा निकाल अजिबात चांगला नाही. एवढे कमी मार्क? आजपासून तुझं खेळणं, टीव्ही बघण सगळं बंद.



मुलगा : हे घ्या ५० रुपये आणि आजपासून तुमचं तोंड बंद.

28 June 2011

पोलिसाचा सल्ला


एक वाहतूक पोलीस चौकात वाहतुकीचे नियमन करीत असताना त्याला एक माणूस माकड आपल्या खांद्यावर घेऊन जाताना दिसला.

वाहतूक पोलिसाने त्याला बजावले, "ए भाऊ, त्या प्राण्याला प्राणिसंग्रहालयात घेऊन जा पाहू."

काही दिवसांनी पुन्हा त्या वाहतूक पोलिसाला तो माणूस माकडासमवेत जाताना दिसला.

वाहतूक पोलीस : का रे, तुला मी काय सांगितलं होतं? विसरलास काय?

माणूस : नाही हो. मी त्यादिवशी माझ्या या प्रिय माकडाला तिथे घेऊन गेलो होतो. आज त्याला चित्रपटाला घेऊन जातो आहे.

21 May 2011

वाट पहात आहे...

ट्रॅफिक हवालदार : अहो, थांबा थांबा. १०० च्या स्पीडने गाडी का चालवताय?

वाहनचालक : तुम्हीच तर तो बोर्ड लावलाय ना? (बोर्डकडे बोट दाखवून)

ट्रॅफिक हवालदार : हो, मग?

वाहनचालक : जरा नीट वाचा की मग...त्यावर लिहिलंय, "लक्षात ठेवा, घरी कुणीतरी तुमची वाट पहात आहे," म्हणून.

10 March 2011

चोराची चोरी की बायकोची शिरजोरी?


एक चोर एका कापडाच्या दुकानात चोरी करताना पकडला जातो.

त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले जाते.

चौकशी करताना :-

पोलीस : काय रे, तू एकाच दुकानात चोरी करण्यासाठी दुसर्‍यांदा का केलास?

चोर : साहेब, मी फक्त एकच ड्रेस चोरला हो. पण माझ्या बायकोला तो आवडला नाही म्हणून तो बदलून दूसरा आणण्यासाठी पुन्हा जावं लागलं.

12 January 2011

बोटांचे ठसे

पोलीस इन्स्पेक्टर : हवालदार रेडे, तुम्ही चोर पकडला का?

हवालदार : नाही साहेब, पण त्याची निशाणी मिळाली.

इन्स्पेक्टर : काय ती?





हवालदार : त्याच्या बोटांचे ठसे.

इन्स्पेक्टर : कुठे?

हवालदार : माझ्या गालांवर.

09 December 2010

मानवता

एकदा एक चोर एका धनाढ्य व्यापार्‍याच्या घरात घुसतो.

जिथे तिजोरी ठेवलेली असते, तिथे तो जाऊन पोचतो.

तिजोरीच्या बाजूला लिहिलेले असते...
तिजोरी फोडायची गरज नाही. बाजूलाच ठेवलेली ४२० नंबरची चावी तिजोरीच्या कुलपात घालून दोनदा फिरवा आणि मग समोरील लाल बटन दाबा.

चोर लाल बटन दाबतो तसा अलार्म वाजू लागतो आणि पोलिस येतात.
ते चोराला पकडून नेतात.

पकडून नेत असताना चोर मालकाला म्हणतो, "आज माझा माणुसकीवरचा विश्वासच उडाला."

12 November 2010

साक्ष

वकील (साक्षीदारास) : तू म्हणतोस की भिंत ८ फुट उंच आणि तू जमिनीवर उभा होतास. भिंतीवर किंवा शिडीवर चढला नव्हतास.

साक्षीदार : बरोबर.

वकील : आता तुझी उंची ५ फुट आणि भिंतीची उंची ८ फुट. मग पलीकडे तो माणूस काय करत होता, हे तुला कसं काय दिसलं?

साक्षीदार : भिंतीला भगदाड होतं ना साहेब.

07 November 2010

पंचनामा

रस्त्यात पडलेल नाणं उचलताना एकाचा गाडीखाली येऊन मृत्यू झाला.

पंचनाम्यात नैसर्गिक मृत्यु अशी नोंद होती.

पुढे खटला चालविल्यावर तपासात ते नाणं नसून थंडपेयाचं चकाकणारं झाकण असल्याचं निष्पन्न झालं.

तेव्हा अहवाल देण्यात आला, "मानसिक धक्क्याने मृत्यु."

10 October 2010

तिकीट तिकीट

एक साधू रेल्वेने प्रवास करत असतो. तेवढ्यात तिकीट चेकर येतो.


चेकर साधूला विचारतो, "कुठे जायचय?"
साधू : जिथे रामाचा जन्म झाला होता, तिथे; अयोध्येला.


चेकर : बरं ठीक आहे, तिकीट दाखवा.
साधू : तिकीट तर नाहीय.




चेकर : चला मग.
साधू : कुठे?


चेकर : जिथे कृष्णाचा जन्म झाला होता, तिथे; जेलमध्ये.

16 August 2010

स्पष्टीकरण

पोलिसाने रात्रीच्या वेळी एका माणसाला हटकले.
‘रात्रीच्या वेळी तू काय करतो आहेस ? बोल, काहीतरी स्पष्टीकरण दे.’
‘मला काही स्पष्टीकरण देता आल असत तर घरी जाऊन मी बायकोसमोरच उभा राहिलो नसतो का?’

शिस्त

हवालदार रेडके संध्याकाळची हजेरी घेत होते. मागच्या ओळीत कोणीतरी जागेवरून हलताना त्यांना दिसले.
“कोण ते? महादू पवार, सावधान म्हटल्यावर जागचा हलतोस? नालायक.”
“सर, महादू पवार आज सुट्टीवर आहे.”
“सुट्टीवर आहे म्हणून काय झालं? तरीसुद्धा त्यान हालायच नाही. समजलं? शिस्त म्हणजे शिस्त.”

चेहरा

पोलीस : तुझा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय.
आरोपी : ते कस शक्य आहे ? माझा चेहरा जन्मापासून माझ्या मानेवरच आहे.

पोलीस भरती

एक फकीर रोज भीक मागत फिरत असे. पण एक दिवस तो पोलिसात भरती होण्यासाठी गेला. त्याची छाती, बॉडी, उंची वगैरे पोलिस अधिकारयास पसंत पडली. त्याने फकिरास एक प्रश्न विचारला.
“समजा एके ठिकाणी काही कारणास्तव लोकानी गर्दी केली आहे त्यांची पांगापांग करण्यासाठी तू काय करशील?”
फकीर म्हणाला, “मी टोपी काढून उलटी करेन आणि भीक मागायला सुरुवात करेन अनायासे लोकांची पांगापांग होइल.”

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...