Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

26 August 2010

नाटक

आई : अरे बंड्या, इतकी रात्र होईपर्यंत कुठ गेला होतास?

बंड्या : मी मित्राच्या घरी आईच प्रेम नावाचा सिनेमा बघत होतो, म्हणून यायला उशीर झाला.

आई : मग आता माडीवर जा आणि बाबांचा राग नावच नाटक बघ.

प्रश्न

हॉट एयर बलूनमधून फेरफटका मारताना एका तरुणीला जाणवलं की आपण हरवलो आहोत. तिन काही बटनं दाबून बलून कसाबसा काही अंतरावर खाली आणला. खाली एक तरुण उभा होता. ती ओरडून म्हणाली, “हॅलो यंग मॅन, मला मदत कराल का?”

तरुण : काय झाल?

ती : तासाभरापूर्वी मी माझ्या मित्राला भेटण्याच वचन दिल आहे, पण मी हरवले आहे. मला मी कुठे आहे तेच समजत नाहीये.

तरुण : ओह, तुम्ही आत्ता जमिनीपासून २० मीटर उंचीवर, उत्तरेला ३० ते ४० अक्षांशावर आणि पश्चिमेला ६० ते ६२ रेखांशावर आहात.

ती : तुम्ही नक्कीच इंजिनीयर असणार.

तरुण : हो, बरोबर. पण तुम्ही कस काय ओळखल?

ती : कोणतीही कामाची नसलेली पण अतिशय बरोबर अशी तांत्रिक माहिती तुम्ही सांगितली म्हणून. ते जाउद्या. मला वेळ वाया घालवून चालणार नाही. मला मदत करा हो.

तरुण : तुम्ही मॅनेजमेंटमध्ये उच्च पदावर काम करीत असणार.

ती : अय्या, तुम्ही कस काय ओळखल?

तरुण : तुम्ही कुठ आहात, तुम्हाला कुठं जायचय, याची तुम्हाला माहिती नाही. शिवाय तुम्ही कुणाला तरी वचन देऊन बसलात जेव्हा की तुम्हाला वचनपूर्ती काशी करायची हेही तुम्हाला ठाऊक नाही. इतकच नाही, तर तुम्ही निर्माण केलेला हा प्रश्न खालच्या माणसानं सोडवावा, अशी तुमची अपेक्षा आहे, यावरून...

तुम्ही जिवंत आहात ?

अरे, तुम्ही जिवंत आहात?, बर्‍याच दिवसांनी भेटलेल्या कुलकर्णींना नाडकर्णींनी विचारले.

कुलकर्णी : हो, पण तुम्हाला अस का वाटतं?





नाडकर्णी : अहो, आजच तुमच्याविषयी एकाला चांगलं बोलतांना ऐकलं.

ऑक्सीजनचा शोध

बंता : जगण्यासाठी ऑक्सीजन आवश्यक आहे. या वायुचा शोध १७७३ साली लागला.
संता : अरे देवा, बरं झालं माझा जन्म त्यापूर्वी नाही झाला तो.

16 August 2010

किती गरम होतय !

बंता : आजकाल किती गरम होतय !
संता : कुठे यार, काहीतरीच. अरे, थोड्या वेळापूर्वी मी बर्फ पाहिलं !
बंता : कुठे?
संता : फ्रिजमध्ये

डॉक्टरच अक्षर

गिर्हाइक : कशावरून तुम्ही हा डॉक्टर बोगस आहे, असे समजता.
केमिस्ट : इतक स्पष्टपणे समजणार डॉक्टरच अक्षर नसत म्हणून म्हटलं.

साडीची किंमत

वझे बाई साडी खरेदी करण्यासाठी एकदा दुकानात गेल्या. त्यांनी साडीची किंमत विचारली.
दुकानदार : ३०० रुपये
वझे बाई : अरे बापरे !
त्यांनी दुसर्याे साडीची किंमत विचारली.
दुकानदार : दोनदा अरे बापरे !

उदाहरण

मॅडम : राजू, जसे आपण आईला मॉम किंवा डडीला डेड म्हणतो, त्याचे आणखी एक उदाहरण दे पाहू.
बंड्या : सोप्पं आहे, मॅडमला मॅड म्हणू शकतो!

नाटक बघता बघता

बंड्या वडिलांबरोबर बाल्कनीत बसून नाटक पहात होता. नाटक बघता बघता तो इतका रंगला की बाल्कनीतून वाकून पहातांना तोल जाऊन पडला. त्याचे वडील ओरडले, “बंड्या लवकर वर ये पाहू कसा. खालचे दर जास्त आहेत.”

आनंदाची बातमी

बंड्या : बाबा, तुम्हाला आनंदाची बातमी सांगू का?
बाबा : सांग ना.
बंड्या : तुम्हाला या वर्षी नवीन पुस्तके घ्यावी लागणार नाहीत.
बाबा : का रे? शाळेतर्फे मिळणार आहेत का?
बंड्या : नाही, मी नापास झालोय.

कंजूस मारवाडी

कंजूस मारवाडी पैसे वाचवण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतो. त्याची मुल आणि बायको जाम वैतागलेली असतात.
एक दिवस कंजूस मारवाडी जाहीर करतो, ‘जो जेवणार नाही त्याला पाच रुपये मिळतील.’ सगळेजण पाच रुपये सोडायचे नाहीत, म्हणून पैसे घेऊन झोपी जातात.
दुसर्या दिवशी सकाळी बाप जाहीर करतो, ‘जो पाच रुपये देईल, त्यालाच नाश्ता मिळेल.’

दुखत होते म्हणून

बंड्या – बाबा, तुम्ही आईला डोळे दुखत होते म्हणून चश्मा आणून दिला. माझे मनगट दुखत आहे.
बाबा – मग मी काय करू ?
बंड्या – मला घड्याळ आणून द्या.

कौतुक

बंड्या : बाबा, बाबा, बघा आमच्या मास्तरांनीही माझ्या क्रिकेटच कौतुक केलय.
बाबा : अच्छा ! काय बक्षीस दिल रे तुला ?
बंड्या : माझ्या निकाल पत्रावर ‘चेंडू’ काढून दिलाय.

अशक्य हा शब्दच नाही

राजू : माझ्या शब्दकोशात ‘अशक्य’ हा शब्दच नाही.
बंड्या : आता हे सांगून काय उपयोग? शब्दकोश विकत घेण्याअगोदर तू तो तपासून पाहायला हवा होता.

नेम

‘जज्जसाहेब, विवाह झाल्यापासून माझी पत्नी माझ्या अंगावर सतत वस्तु फेकत असते.’
‘अस, विवाह केव्हा झाला तुमचा?’
‘सात वर्षांपूर्वी’
‘मग, या अगोदर तुम्ही तक्रार का केली नाही?’
‘कारण, आज प्रथमच तिचा नेम बरोबर लागला.’

नोकरी

वडील : (बंड्यास) तू नोकरी का करीत नाहीस. मी तुझ्या वयाचा होतो, तेव्हा फक्त २० रुपये महिना घेऊन एका दुकानात नोकरी केली. ५ वर्षे पूर्ण होताच मी त्या दुकानाचा मालक झालो.
बंड्या : हल्ली अस काही करता येत नाही बाबा. आजकाल मालक दररोज स्वत: हिशेब बघतात.

आत्महत्या

बंड्या एकदा रस्त्याने फिरत फिरत चाललेला असतो. त्याला वाटेत एक बेडूक भेटतो.
बेडूक त्याला म्हणतो, ‘बंड्याला अजिबात डोक नसत.’
बंड्या : असत.
बेडूक : नसत, नसत, नसत... (अस म्हणून बेडूक पाण्यात उडी मारतो)
बंड्या : काय हा बेडूक, एवढ्याशा कारणासाठी पाण्यात उडी मारून आत्महत्या कशाला करायची.

हत्ती श्रेष्ठ की मुंगी श्रेष्ठ ?

संता : सांग बर, हत्ती श्रेष्ठ की मुंगी श्रेष्ठ ?
बंता : मुंगी.
संता : कसे काय?
बंता : मुंगी हत्तीच्या पायाखालून जाऊ शकते, पण हत्ती मुंगीच्या पायाखालून जाऊ शकतो का?

स्पष्टीकरण

पोलिसाने रात्रीच्या वेळी एका माणसाला हटकले.
‘रात्रीच्या वेळी तू काय करतो आहेस ? बोल, काहीतरी स्पष्टीकरण दे.’
‘मला काही स्पष्टीकरण देता आल असत तर घरी जाऊन मी बायकोसमोरच उभा राहिलो नसतो का?’

शिस्त

हवालदार रेडके संध्याकाळची हजेरी घेत होते. मागच्या ओळीत कोणीतरी जागेवरून हलताना त्यांना दिसले.
“कोण ते? महादू पवार, सावधान म्हटल्यावर जागचा हलतोस? नालायक.”
“सर, महादू पवार आज सुट्टीवर आहे.”
“सुट्टीवर आहे म्हणून काय झालं? तरीसुद्धा त्यान हालायच नाही. समजलं? शिस्त म्हणजे शिस्त.”

दात काढण्यासाठी

आजीबाई दात दुखत असल्याने ते काढण्यासाठी शहरात येतात.
डॉक्टर : आजीबाई तोंड उघडा.
आजीबाई तोंड उघडतात.
डॉक्टर : आजीबाई अजून उघडा. अजून थोडे, अजून थोडे.
आजीबाई : कारे मेल्या, आत बसून दात काढणार आहेस का ?

विसरभोळे साठे सर

साठे सर खूपच विसरभोळे होते. ते आपले घड्याळ नेहमी कोटाच्या डाव्या खिशात ठेवत असत. एकदा चुकून त्यांनी ते उजव्या खिशात ठेवले आणि वेळ पाहण्यासाठी म्हणून नेहमीप्रमाणे डाव्या खिशात हात घातला. घड्याळ मिळाले नाही. ते लगेच आपल्या एका विद्यार्थ्याला म्हणाले, ‘जा घरी जाऊन माझे घड्याळ घेऊन ये.’
आणि उजव्या खिशातून घड्याळ काढून घेत ते म्हणाले, ‘हे बघ आता १७-२० झालेत, बरोबर १७-४० पर्यन्त परत ये.’

प्राध्यापक साठे

प्राध्यापक साठे घाईघाईने वर्गात आले आणि पुस्तक उघडून त्यांनी विचारले, ‘तर मी काल कुठ आलो होतो ?’
‘इथच या वर्गात सर !’ एका मुलाने उत्तर दिले.

झोपेच्या गोळ्या

पेशंट : डॉक्टर, तुम्ही दिलेल्या झोपेच्या गोळ्या मी घेतो; पण त्याची सवय लागणार नाही ना ?
डॉक्टर : रोजच्या रोज गोळ्या घेतल्या तर सवय लागणार नाही.

त्रास

डॉक्टर : बंड्या, तुला नाक, कान, घशाचा काही त्रास होतो का ?
बंड्या : हो, अंगातून स्वेटर काढतांना ते मध्ये मध्ये येतात.

चेहरा

पोलीस : तुझा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय.
आरोपी : ते कस शक्य आहे ? माझा चेहरा जन्मापासून माझ्या मानेवरच आहे.

सोन्याचे नाणे

पेशंट : डॉक्टर, लवकर माझ्या पोटातून सोन्याचे नाणे बाहेर काढा. ते मी पाच वर्षांपूर्वी गिळले होते.
डॉक्टर : पाच वर्षांपूर्वी ? मग तुम्ही तेव्हाच का नाही काढलं ?
पेशंट : अहो डॉक्टर, तेव्हा सोन्याला एवढा दर नव्हता !!!

हत्तींनीचे ऑपरेशन

एका हत्तींनीचे ऑपरेशन झाल्यावर सर्जनने नर्सला विचारले, ‘सगळी हत्यारे व्यवस्थित ठेवली आहेत ना ? काही राहिले तर नाही ना ?’
नर्स म्हणाली, ‘सर, हत्यारे सर्व मिळाली, पण डॉक्टर देशपांडे कुठ दिसत नाहीयेत.’

साम्य

शिक्षक : सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे?
हात वर करून बंड्या सांगतो, ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
शिक्षक : काय ते?
बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले, पण आताच काही सांगू शकत नाही.

वीज का चमकते?

शिक्षक : बंड्या, सांग बर! पाऊस पडतांना आकाशामध्ये वीज का चमकते?
बंड्या : सर, सोप्पं आहे! कोठे-कोठे कोरडी जागा राहिली आहे, ते पाहण्यासाठी...

खोकला

बंता संताला : तुझा खोकला कसा आहे ?
संता : खोकला थांबला पण अजूनही श्वास घेताना त्रास होतोय.
बंता : काळजी करू नको, एक दिवस श्वासही थांबेल.

आनंद

बंडोपंत : साहेब… जरा कम्प्लेन्ट लिहून घ्या ना. काल पासून माझी बायको घरी आली नाहीय.
साहेब : अहो हे पोस्ट ऑफीस आहे. पोलिस स्टेशन नाही.
बंडोपंत : काय करू हो, कालपासून एवढा आनंद झालाय की मी काय करतोय, कुठे जातोय, काहीच कळत नाहीये…

हिमालयाचे टोक

शिक्षक: बंड्या, तू सांग हिमालयाचे टोक किती उंच आहे?
बंड्या: माहित नाही, सर.
शिक्षक: (रागावून) बाकावर उभा रहा.
बंड्या: बाकावर उभे राहिल्याने हिमालयाचे टोक थोडेच दिसणार आहे?

काय होतं?

शिक्षक: एक शुन्य शुन्य (१००) नंबर डायल केल्यावर काय होतं?
बंड्या: पोलीस येतात.
शिक्षक: बरोब्बर. आता सांग, शुन्य शुन्य एक (००१) डायल केलं तर काय होईल?
बंड्या: पोलिस परत जातील.

कल्पना

बंता संताला विचारतो ‘डोळे मिटून कल्पना कर की तू एका बंद खोलीत बसला आहेस तिला खिडकी-दरवाजा काही नाही आणि त्या खोलीला अचानक आग लागते मग तू काय करशील?’ :D

संता म्हणतो ‘काही नाही मी कल्पना करने थांबवेन!’

ब्रांडी

संता रस्त्यावर बेशुद्ध होउन पडला. लगेच त्याच्याभोवती गर्दी जमली. लोक काहीबाही सल्ला देऊ लागले. गर्दीत संताच्या शेजारी राहनारी एक आजी होती. ती ओरडून म्हणाली, “त्याच्या तोंडात दोन घोट ब्राण्डी घाला।”
तेवढ्यात कोणीतरी म्हणाले, “त्याच्या तोंडात पानी घाला.”
ती आजी पुन्हा म्हणाली, “अरे त्याच्या तोंडात दोन घोट ब्रांडी घाला.”
परत कोणी तरी म्हणाले, “अरे त्याला इस्पितलात घेउन चला.”
मग मात्र बेशुद्ध पडलेला संताच उठला आणि म्हणाला, “आधी तुमची बकवास बंद करा आणि बिचारी आजी काय सांगते ते बघा…!!!”

मोबाईल बैटरी

संता: अरे यार हा मोबाईल मला पर कंगाल करून टाकणार.
बंता: का रे काय जाल?
संता: अरे सारखा-सारखा मेसेज येतोय बैटरी लो म्हणून.
बंता: मग?
संता: आतापर्यंत ७६ बैटरया घेउन जाल्या तरी मेसेज आहेच!!!

डासांच औषध

ग्राहक: अहो, डासांच औषध मारल पण तरीसुद्धा डास कानाजवळ येउन गुणगुणत आहेत.
दुकानदार: अहो, औषधामुले मेलेल्या डासाची बायकामुल तुमच्या कानाजवळ येउन रडत असतील.

साबुदाने चालतात

आई: अरे राजू, आज उपवास आहे मी तुला साबुदाने आणायला सांगितले होते आणलेस का?
राजू: आई, तूच म्हणाली होतीस ना की, उपवासाच्या दिवशी साबुदाने चालतात ! म्हणून मी साबुदाने रस्त्यातच ठेउन आलो. आता ते मागुन चालत येतील.

मुलाखत

एका माणसाची मुलाखत घेतली जाते. त्याला प्रश्न विचारला जातो.

साहेब : Ford म्हणजे काय??
माणूस : Ford म्हणजे गाडी.
साहेब : गुड. Then what is Oxford??
माणूस : Oxford म्हणजे बॆलगाडी.

मैनेजमेंट गुरु

मैनेजमेंट गुरु जाल्यानंतर लालूप्रसादना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. लालूंना इंग्रजी शिकावतोच अशी पैंज मारून बिल क्लिंटन त्यांना व्हाइट हाउसमध्ये घेउन गेले.
तीन महिन्यानी चौकशी करण्यासाठी राबडीदेवीनी फोन केला, ‘हमारा ललवा है क्या?’
पलीकडून क्लिंटन बोलले, ‘जी नहीं, हम बिलवा बोल रहे है.’

विन्स्टन चर्चिल

विन्स्टन चर्चिल दुसरया महायुद्धाच्या काळात ब्रिटनचे पंतप्रधान होते. अतिशय हजरजबाबी आणि विनोदबुद्धीचे. एकदा एका जोरदार वादावादीनंतर एक महिला चर्चिलना म्हणाली, ‘तुम्ही माजे पती असता, तर मी तुम्हाला विष दिल असत.’
चर्चिल लगेच म्हणाले, ‘मी तुमचा नवरा असतो, तर मीच विष घेतल असत.’

भातात खडा

पती: (जेवताना भातात खडा लागल्याने संतापून) : देवाने तुला दोन डोळे दिलेत ना? मग तांदलातले खडे काढता येत नाहीत बघून?
पत्नी: (शांतपणे) देवाने तुम्हाला चांगले ३२ दात दिलेत ना? मग भाता बरोबर २-४ खडे चावता येत नाहीत?

भांडण

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार काढतील..?

पायलटची बायको … ” गेलास उडत…”
मंत्र्याची बायको … ” पुरे झाली तुमची आश्वासनं.”
शिक्षकाची बायको … ” मला नका शिकवू…”
रंगारयाची बायको … ” थोबाड रंगवीन.”
धोब्याची बायको … ” चांगली धुलाइ करीन.”
सुताराची बायको … ठोकुन सरळ करीन
तेल विक्रेत्याची बायको … ” गेलात तेल लावत.”
न्हाव्याची बायको … ” केसाने गळा काप्लात की हो माझा.”
डेंटिसची बायको … ” दात तोडुन हातात देइन.”
शिंप्याची बायको … ” मल शिवलंस तर याद राख.”
अभिनेत्याची बायको … ” कशाला नाटक करता?”
वाण्याची बायको … ” नुसत्या पुड्या सोडु नका “
रेल्वे ड्रायव्हरची बायको…. ” आली का गाडी रुळावर/लायनीवर ?”
संगणक अभियंत्याची बायको….. ” तुला डिलीट करून टाकीन
ब्राम्हनाची बायको – “बंद करा तुमचे पोथी-पुराण”

लग्न

पत्नी: काय हो, तुमचे लग्न एखाद्या दुसरया तरुनीशी जाले असते तर फार बरे जाले असते असा विचार कधी मनात येतो?
पती: तस काही नाहीए, पण तुला दूसरा गाढव कोण भेटला असता यावर मात्र मी अनेक वेळा विचार करतो.

नवरा आणि बायको

पत्नी: लक्षात ठेवा, तुम्हाला नरकातसुद्धा जागा मिलनार नाही.
पती: चांगली गोष्ट आहे! नाहीतरी प्रत्येक ठिकाणी मी तुज्यासोबत जाऊ इच्छित नाही.

पोलीस भरती

एक फकीर रोज भीक मागत फिरत असे. पण एक दिवस तो पोलिसात भरती होण्यासाठी गेला. त्याची छाती, बॉडी, उंची वगैरे पोलिस अधिकारयास पसंत पडली. त्याने फकिरास एक प्रश्न विचारला.
“समजा एके ठिकाणी काही कारणास्तव लोकानी गर्दी केली आहे त्यांची पांगापांग करण्यासाठी तू काय करशील?”
फकीर म्हणाला, “मी टोपी काढून उलटी करेन आणि भीक मागायला सुरुवात करेन अनायासे लोकांची पांगापांग होइल.”

पोलीस

एक पोलीस अधिकारयाच्या घरात रात्री चोर शिरला.
आवाज एकून बायको म्हणाली, ‘अहो, उठा लवकर घरात चोर शिरला आहे. ‘
‘मला जोपू दे, मी आता डुटीवर नाहीये,’ पोलीस अधिकारी उत्तरला.

दारूडया

बंड्या: अरे लग्नानंतर तुझं दारू पिणं वाढलं कसं?
गण्या : काय करणार, माझी अजिबात इच्छा नव्हती. पण बायकोचा आग्रह.
बंड्या: काय सांगतोस काय!
गण्या: मग काय… सकाळ संध्याकाळ तीचं आपलं एकच पालुपद… दारू-सोडा, दारू-सोडा.मग काय करणार, तिच्या समाधानासाठी दारू-सोडा घेऊन बसावंच लागायचं ना.

टॉर्च तर चालू आहे

एमबीबीसची परीक्षा पास करून डॉक्टर जयदीप यांनी स्वत:ची प्रक्टिस सुरु केली त्यांनी पहिला पेशंट तपासला टॉर्चने डोळे, जीभ आणि कान पाहिले आणि म्हणाले, “अरे वा, टॉर्च तर चालू आहे!”

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...