हॉट एयर बलूनमधून फेरफटका मारताना एका तरुणीला जाणवलं की आपण हरवलो आहोत. तिन काही बटनं दाबून बलून कसाबसा काही अंतरावर खाली आणला. खाली एक तरुण उभा होता. ती ओरडून म्हणाली, “हॅलो यंग मॅन, मला मदत कराल का?”
तरुण : काय झाल?
ती : तासाभरापूर्वी मी माझ्या मित्राला भेटण्याच वचन दिल आहे, पण मी हरवले आहे. मला मी कुठे आहे तेच समजत नाहीये.
तरुण : ओह, तुम्ही आत्ता जमिनीपासून २० मीटर उंचीवर, उत्तरेला ३० ते ४० अक्षांशावर आणि पश्चिमेला ६० ते ६२ रेखांशावर आहात.
ती : तुम्ही नक्कीच इंजिनीयर असणार.
तरुण : हो, बरोबर. पण तुम्ही कस काय ओळखल?
ती : कोणतीही कामाची नसलेली पण अतिशय बरोबर अशी तांत्रिक माहिती तुम्ही सांगितली म्हणून. ते जाउद्या. मला वेळ वाया घालवून चालणार नाही. मला मदत करा हो.
तरुण : तुम्ही मॅनेजमेंटमध्ये उच्च पदावर काम करीत असणार.
ती : अय्या, तुम्ही कस काय ओळखल?
तरुण : तुम्ही कुठ आहात, तुम्हाला कुठं जायचय, याची तुम्हाला माहिती नाही. शिवाय तुम्ही कुणाला तरी वचन देऊन बसलात जेव्हा की तुम्हाला वचनपूर्ती काशी करायची हेही तुम्हाला ठाऊक नाही. इतकच नाही, तर तुम्ही निर्माण केलेला हा प्रश्न खालच्या माणसानं सोडवावा, अशी तुमची अपेक्षा आहे, यावरून...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.