Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label engineering jokes. Show all posts
Showing posts with label engineering jokes. Show all posts

31 May 2019

*10 yr challenge..*


2009-
इंजिनिअरिंगला लै स्कोप आहे,
आपण इंजिनीअरिंग करू मग लाईफ सेट.....

2019-
भावा, एक लिंक पाठवतो अँप डाउनलोड कर तुला पन्नास येतील मला पन्नास येतील.

😝😝😝😝😝

24 October 2015

असंय का?


इंजिंनियरिंगच्या वर्गात एक विद्यार्थी मोबाइलवर खेळत बसला होता.

वर्गात लक्ष नसल्याचं पाहून प्राध्यापक वैतागतात आणि त्याला एक प्रश्न विचारतात, “माणूस चंद्रावर गेला तर त्याचं वजन किती भरेल?”

१.     कमी होईल

२.     वाढेल

३.     काहीच फरक होणार नाही

खरंतर हे उत्तर कुणीही शाळकरी मुलगा पण देऊ शकतो. पण हे प्राध्यापक महाशय उगीच त्या बिचार्‍या पोराला काहीतरी विचारायचं म्हणून विचारत असतात.

तो भावी इंजिनियर हे ओळखतो आणि म्हणतो, “कमी होईल.”

प्राध्यापक : का?

विद्यार्थी : कारण, तिथे खायला काही मिळणार नाही म्हणून.

ही. ही. ही. ही......

 

03 August 2015

अतिआदर...


आम्ही इंजिनियरिंगला असताना पेपर रिकामा ठेवायचो कारण,

आपल्या आ.मास्तरांना असं वाटायला नको की,
.
.
.

“बघा, पोरं कशी उत्तरं देतायत आम्हाला.”


03 August 2014

धोका

हॉस्टलमध्ये राहणार्‍या दोन विद्यार्थ्यांमधील हा संवाद.

पहिला विद्यार्थी : अरे माझ्यासोबत फार मोठा धोका झाला.

दूसरा विद्यार्थी : का रे, काय झालं?


पहिला : काय सांगू, पप्पांकडे पुस्तकांसाठी पैसे मागितले तर त्यांनी पुस्तकंचं पाठवून दिली.



20 July 2014

देवा तुला शोधू कुठं...?

एक इंजिनियरिंगचा विद्यार्थी देवाचे असे आभार मानतो.


ए देवा, सर्वेश्वरा, या वाढणार्‍या महागाईच्या जमान्यात एक लिटर पेट्रोल ६० वरून ८० रुपयांवर गेलं;

एक रुपया ४० वरून ६० वर-७० वर गेला;

सगळं काही महागलं;

पण तरीही आमचे पासिंगचे मार्क ४० वरंच ठेवल्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद.


शून्याचा शोध


तुम्हाला हे माहिती आहे का, की शून्याचा शोध कसा लागला?


" 0 "


मग मी सांगतो.

जेव्हा आर्यभट्टाने त्याच्या एका शिष्याचा पेपर चेक केला ना,

तेव्हा त्याला शून्याचा शोध लागला.


30 January 2013

का झोपू शकत नाही???


साठे सर वर्गात शिकवत असतात.

एका मुलाचे डोळे झाकपाक झाकपाक करीत मिणमिणत्या मेणबत्तीप्रमाणे त्यांच्याकडे बघत असतात.

साठे सर (त्या मुलाला) : का रे? झोपतोस? माझ्या लेक्चरला तू झोपू शकत नाहीस.

विद्यार्थी : झोपू शकतो सर. तुम्ही फक्त जोरा-जोरात ओरडून शिकवू नका.

02 January 2013

Bond…or...Parol ???


कॉलेजमधून प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांकडून कामावर रुजू होताना बॉन्डवर सही घेतली जाते.

असाच एक विद्यार्थी एका नामांकित कंपनीत दोन वर्षे काम करून दुसर्‍या कंपनीत मुलाखतीला जातो.

मॅनेजर : तुम्ही पहिल्या कंपनीत तब्बल दोन वर्षे काम केलं आणि आता अशी कोणती गोष्ट घडली की तुम्ही कंपनी सोडली.

विद्यार्थी : अहो काय करू? वर्षभर सोडायची सोडायची म्हणत होतो. शेवटी आता ५० हजार भरून पॅरोलवर सुटून आलोय.

09 July 2012

आरपार की आर या पार?

प्रोफेसर संक यांचं विज्ञानाचं लेक्चर चालू होतं.

दोन पोरं नेहमीप्रमाणे धिंगाणा घालताना सरांना सापडली.

प्रोफेसर : नालायकांनो, धिंगाणा घालायचाच असेल तर कॉलेजच्या बाहेर जाऊन घाला ना. काहीतरी शिकून मोठे व्हावयाचे म्हणून पाठवतात ना तुमचे आई-बाप इकडे? तुमच्या थोबाडाकडं बघून तरी वाटत नाही तुम्ही काहीतरी मोठं करून दाखवाल म्हणून.

आपले आई-बाप काढले म्हटल्यावर पोरं जाम उचकतात. ह्या मास्टरची टर कशी उडवायची ते ह्यांना माहीत असते.

पोरं सरांना म्हणतात, "ओ सर, तुम्ही आम्हाला "ढ" समजू नका. आम्ही ना आज एक शोध लावलाय."

प्रोफेसर : कोणता बरं? मास्तर शिकवीत असताना खिडकीतून बाहेर कसं बघायचं ते?

पोरं : नाही सर, पण भिंतीच्या त्या बाजूचं ह्या बाजूला उभं राहूनही आरपार बघता येतं आमच्या प्रयोगाने.

प्रोफेसर : अस्स...मग दाखवा बघू तुमचा प्रयोग.

पोरं : मग चला आमच्या बरोबर आपल्या कॉलेजच्या कंपाऊंडच्या भिंतीसमोर.

कॉलेजचं मैदान बरंच मोठं असल्याने कंपाऊंडची भिंत पण भली लांब. ह्या म्हातार्‍या सरांना ३००-४०० मीटरचं अर्ध-पाऊण मैदान फिरवून पोरं त्यांना एका ठिकाणी नेतात.

पोरं : (भिंतीला पाडलेल्या एका भोकाकडे बोट दाखवीत) हा बघा आमचा शोध. इकडून पाहिलं की पलीकडच सगळं दिसतं...असं म्हणून पोरं पळून जातात...आणि मास्तर आपणच ह्यांना शोधाची आयडिया देऊन आपल्या पायावर कुर्‍हाड मारली म्हणून स्वत:लाच दोष देत निघून जातात.

21 April 2012

न थकण्याचं रहस्य…


हॉस्टलवर एक मुलगा कधीही बघावं तेव्हा अतिशय उत्साहात असतो. चेहर्‍यावर कधीच थकल्याचे भाव नसायचे.

पण एक दिवस त्याचा एक मित्र झोपलेला पाहून विचारती, “काय रे, तू तर कधीच थकत नाहीस ना. मग आता कसा काय झोपलाय?

मुलगा : न थकण्याचं तेच तर रहस्य आहे...

12 April 2012

कॉलेजची परीक्षा


दोन मित्र परीक्षा संपवून परीक्षा हॉलमधून बाहेर येत असतात.

पहिला : काय मग? आजचा पेपर कसा गेला?

दूसरा : अं...पण आजचा पेपर कोणता होता?

पहिला : मला वाटतंय की तो गणिताचाच पेपर होता. कारण, तो माझ्या समोरचा जोश्या कॅल्क्युलेटरवर काहीतरी बटणं दाबीत होता.

10 October 2011

अपमान ssss

स्थापत्य अभियांत्रिकीच्या भूगर्भशास्राचा तास चालू असतो.

वर्गात प्रोफेसर बोर्डवर एक मोठा नकाशा लावून हातातील छडीने भारतात आढळणारे विविध खडकांचे प्रकार समजावून सांगत असतात.

एकजण नेहमीप्रमाणे पहिल्या बाकावर बसून झोपलेला असतो.

प्रोफेसर त्याला उठवतात आणि पुढे बोलावतात.

प्रोफेसर त्या मुलाकडे आपल्या हातातील छडीचे एक टॉक करून त्याला उद्देशून इतर मुलांना म्हणतात, "बघा, या छडीच्या एका टोकाकडे. तुम्हाला एक धोंडा दिसतोय ना."

खाली बसलेल्यांपैकी एक विद्यार्थी : कोणत्या टोकाकडे सर?

08 June 2011

प्रामाणिकपणाचं एक उदाहरण


प्रामाणिकपणा कशाला म्हणाल? त्याचं एक उदाहरणच सांगतो ना तुम्हाला.

- तुम्ही परीक्षेत पेपर लिहीत आहात.

- त्याचवेळी तुम्ही हळूच कॉपी लिहिलेला कागद काढता

- हवा असलेला मजकूर वाचता

- आणि

- तो लक्षात ठेवून, कॉपीकडे न बघता आठवून आठवून लिहिता.

शुभेच्छा !!!


परीक्षेअगोदर कॉलेजमधील हे वातावरण...

मुलगा : (मुलीस) ऑल द बेस्ट !!!

मुलगी : (मुलास) तुलाही ऑल द बेस्ट.

परीक्षा होते. निकाल लागतो. मुलीस ८०% मिळतात आणि मुलगा नापास होतो.


तात्पर्य : मुले स्वच्छ मनाने, हृदय भरून शुभेच्छा देतात.


06 June 2011

No Challenge to PrOfEsSoRs.


एकदा जगातील प्रख्यात वादक मंडळी, बॅंडवाले जमले आणि त्यांनी एक मधुर संगीत बनवलं.

ते संगीत इतकं भुरळ पाडणारं होतं की कुणालाही ते ऐकताक्षणीच झोप यावी.

हे संगीत आमच्या इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना ऐकवलं, पण आम्हावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

वाजवून वाजवून वादक मंडळींच्या पिपाण्या फुटल्या, ड्रम फाटले, काहीजण तर चक्क चक्कर येऊन पडले.

पण,

पण,

त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

शेवटी आमच्या प्राध्यापकांनी त्यांचं लेक्चर चालू केलं आणि आम्ही सर्व विद्यार्थी शांतपणे झोपी गेलो. (अनेकजण तर चक्क डोळे उघडे ठेवून झोपले.)

01 June 2011

जरा डोक्याने पैसा कमवा


फेसबूक वापरुन तुम्हाला पैसा कमवायचा आहे का?

मग एक काम करा............

फेसबूकच्या Settings मध्ये जा.

नंतर Account Settings मध्ये जा.

आता Deactivate your account वर क्लिक करा.
.
.
.
आणि चला बघू आता कामाला लागा.

30 May 2011

परीक्षेचे नवे नियम


आता IPL T20 च्या धर्तीवर T20 चे नियम हे परीक्षेत आणायला हवेत असं आमचं प्रामाणिक मत आहे.

ते नियम कसे असावेत ते थोडक्यात लिहिलं आहे खाली.

नियम १ : परीक्षेचा वेळ ३ तासांवरून १ तास करण्यात यावा.

नियम २ : परीक्षा १०० गुणांऐवजी ४० गुणांची करण्यात यावी.

नियम ३ : पॉवरप्ले – पहिल्या पंधरा मिंनिटांमध्ये एकही परीक्षक परीक्षा हॉलमध्ये असता कामा नये.

नियम ४ : चीयर लीडर्स – प्रत्येक बरोबर उत्तर लिहिल्यावर नाचून आनंद व्यक्त करण्यासाठी.

नियम ५ : स्ट्रटेजिक टाइम आऊट – हा वेळ विद्यार्थ्यांना आपापसांत चर्चा करण्यासाठी उपलब्ध व्हावा.

28 May 2011

एका इंजिनियरची कहाणी


एका इंजिनियर माणसाच्या स्नानगृहातील एक पाइप गळत असतो. तो प्लंबरला बोलावून तो ठीक करून घेतो.

प्लंबर : साहेब, मी पाइप बदलून त्याजागी नवीन बसवला आहे. आता काही काळजी करू नका.

इंजिनियर : बरं ठीक आहे. तुझी मजुरी किती द्यायची?

प्लंबर : ८५० रुपये साहेब.

इंजिनियर : एवढे? अरे दिवसाला एवढा पगार तर मलाही मिळत नाही.

प्लंबर : बरोबर आहे तुमचं. मी इंजिनियर होतो न तेव्हा पण मला एवढे पैसे दिवसाला मिळत नव्हते.

24 May 2011

स्थापत्य अभियंता : चित्रपट निर्माता


स्थापत्य अभियंते चित्रपट बनवायला लागले, तर चित्रपटांची नावे काय असतील???

Curing हो ना हो
जानम Dewatering करो
आ अब Concreting करे
कभी M20, कभी M30
हमारा Tape आपके पास है
पत्थर तोडा तो डरना क्या
RCC नं १
Execution कोई खेल नही
थापीवाले ओळंबा ले जायेंगे
मैने Execution क्यु किया?
Honeycombing ना मिलेगी दोबारा
Plaster को Putty से प्यार हो गया
हम Concrete डाल चुके सनम
साहब है कि मानता नही
मैने Checking किया


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...