एकदा जगातील प्रख्यात वादक मंडळी, बॅंडवाले जमले आणि त्यांनी एक मधुर संगीत बनवलं.
ते संगीत इतकं भुरळ पाडणारं होतं की कुणालाही ते ऐकताक्षणीच झोप यावी.
हे संगीत आमच्या इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना ऐकवलं, पण आम्हावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
वाजवून वाजवून वादक मंडळींच्या पिपाण्या फुटल्या, ड्रम फाटले, काहीजण तर चक्क चक्कर येऊन पडले.
पण,
पण,
त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
शेवटी आमच्या प्राध्यापकांनी त्यांचं लेक्चर चालू केलं आणि आम्ही सर्व विद्यार्थी शांतपणे झोपी गेलो. (अनेकजण तर चक्क डोळे उघडे ठेवून झोपले.)
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.