“नासा” म्हणजे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था मंगळावर एक माणूस पाठवायचं ठरवते.
त्यासाठी ते संपूर्ण जगभरातील लोकांचे अर्ज मागवतात.
मंगळवारी करण्यासाठी मात्र एक अट ठेवलेली असते, ती म्हणजे, तिकडे गेलेल्या व्यक्तीला परत पृथ्वीवर येता येणार नाही. याचाच अर्थ त्या व्यक्तिचं आयुष्यच जणू अर्पण करायचं होतं.
आता कोण होणार यासाठी? असा विचार कदाचित तुम्ही कराल, पण तीन व्यक्ती यासाठी तयार होतात.
पहिली व्यक्ती असते, ऑस्ट्रेलियाचा एक प्रख्यात डॉक्टर.
दुसरी व्यक्ती असते, जपानचा एक प्रख्यात इंजिनियर.
तिसरी व्यक्ती असते, भारताचा एक प्रख्यात राजकारणी म्हणजे खुद्द – लालूप्रसाद यादव.
धक्का बसला ना?????????????
या तिघांची मुलाखत घेतली जाते आणि त्यांना प्रत्येकी एक प्रश्न विचारला जातो की ते या मोहिमेसाठी किती पैसे घेणार?
डॉक्टर : १ अब्ज रुपये, कारण मी हा पैसा संशोधनास देऊ इच्छितो.
इंजिनियर : २ अब्ज रुपये, कारण मी हा पैसा शैक्षणिक दर्जा सुधारणेसाठी एका संस्थेस देऊ इच्छितो.
लालूप्रसाद यादव : ३ अब्ज रुपये.
नासा : का हो, तुम्ही सगळ्यात जास्त रक्कम मागताय. तुम्ही काय करणार आहात या पैशांचं?
लालूप्रसाद यादव : मी १ अब्ज तुम्हाला देणार. १ अब्ज डॉक्टरला देऊन त्याला मंगळावर पाठवणार आणि १ अब्ज मी घेणार.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.