एक कैदी त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी २ वर्षांचा तुरुंगवास भोगत असतो.
त्याची बायको त्याला सारखी पत्र पाठवून मी हे करू का, ते करू का, कधी काय करू, वगैरे गोष्टी विचारत असते.
अशीच ती एकदा नवर्याला पत्र लिहिते आणि विचारते, “मला घरासमोरील बागेत झेंडू, गुलाब, सदाफुली आणि रातराणीची फुलझाडं लावावीशी वाटताहेत. तर मग कधी लावू?”
कैदी मात्र हुशार असतो. त्याला माहीत असतं की आपलं पत्र नक्कीच जेलरनी वाचलेलं असणार.
कैदी लिहितो, “तू बागेत कसलीही फुलझाडं लाव. माझी कसलीही हरकत नाही. पण घरासमोरील बागेत नव्हे तर घरामागील बागेत लाव. कारण, घरासमोरील बागेत मी खूप पैसा पुरून ठेवलाय.”
काही दिवसांनी पुन्हा कैदयाच्या बायकोचं पत्र येतं. ती लिहिते, “अहो, २ दिवसांपूर्वी काही लोक कुदळ-फावडी घेऊन आले आणि त्यांनी घरासमोरील आणि घरामागील बाग पूर्ण खणून काढली.”
कैदी लिहितो, “होय, मग हीच योग्य वेळ आहे फुलझाडं लावायची, आणि हो घरामागील बागेतही झाडं लाव बरं.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.