सरदारजी एकदा रस्त्याने जात असतो.
त्याच्याजवळ एक पुस्तक विक्रेता येतो आणि त्याला एक छानसे पुस्तक विकत घ्यायची विनंती करतो.
सरदारजीला ते पुस्तक आवडतं. तो २००० रुपयांना ते विकत घेतो.
पैसे हातात मिळताच विक्रेता सरदारजीला एक सल्ला देतो, की कुठल्याही परिस्थितीत या पुस्तकाचं शेवटचं पान उचकटून पाहू नका नाहीतर तुमचं मानसिक संतुलन बिघडेल म्हणून.
सरदारजी बिचारा घाबरतो. असेच काही दिवस जातात आणि मग न राहवून शेवटी घाबरत घाबरत का होईना पण मोठ्या धाडसाने शेवटचं पान उचकटतो.
त्यावर लिहिलेलं असतं, पुस्तकाची किंमत २०/- रुपये.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.