Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label sardar. Show all posts
Showing posts with label sardar. Show all posts

06 August 2015

येडा सरदार

एक सरदार त्याच्या मित्रासाठी झोपेचं औषध घ्यायला डॉक्टरांकडे जातो.

डॉक्टर : एक काम करा. हे घ्या औषध. आता एक पन्नास पैशांचं नाणं घ्या आणि त्यावर मावेल एवढं औषध आज रात्री त्याला द्या.

दुसर्‍या दिवशी सरदार घाबरत घाबरत डॉक्टरकडे आला.

डॉक्टर : काय झालं पाजी?

सरदार : काय सांगू डॉक्टर? रात्री मित्राला औषध दिलं पण त्याने तो कायमचाच झोपला.

डॉक्टर : मी सांगितलं तेवढं औषध नक्की दिलं होतंत ना?


सरदार : हो. फक्त पन्नास पैशांचं नाणं नव्हतं म्हणून मी पाच पैशांच्या नाण्याने त्याला १० वेळा ते दिलं.


22 April 2015

ओय पापाजी...!!!


एक सरदार बागेत सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एका जागी न हलता, न डुलता जणू काही खांब जमिनीत रोवल्यासारखा उभा होता.

समोरचा दुकानदार हे बघून हैराण झाला. दुकानदार त्याच्याकडे आस्थेने चौकशी करायला गेला.

दुकानदार : अहो पापाजी, हे काय चाललंय? सकाळपासून बघतोय तुम्ही इथेच उभे आहात?


सरदारजी : अरे पुत्तर, वक्त ने मुझे बरबाद कर दिया, अब मै उसको बरबाद कर रहा हू.


04 January 2014

टॅलेंट तर बघा...

एकदा तीन सरदार एकाच बेडवर झोपलेले असतात.

एका बेडवर अॅडजस्ट होत नसल्याने एक सरदार बेडवरून खाली पडतो.

राहिलेले दोन सरदार : , वर ये बेडवर. जागा झाली बघ.

सरदारजीला भेटला पठाण


एकदा सरदार आणि पठाण असलेले दोन मित्र रस्त्याने चाललेले असताना त्यांना पाचशे रुपयांची नोट सापडते.

ते दोघे खूप आनंदित होतात.

पठाण : असं करू आपण हे पैसे फिफ्टी-फिफ्टी (अर्धे अर्धे) घेऊ.


सरदार : ठीक आहे. पण मग राहिलेल्या चारशे रुपयांचं काय करायचं?

क्रूरकर्मा सरदारजी

एकदा एक पक्षी सरदारजीला फार सतावत होता.
सरदारजीने त्याला धरलं आणि त्याला क्रूरपणे मारायचं ठरवलं.

त्यासाठी तो एका शंभर मजली इमारतीच्या शंभराव्या मजल्यावर गेला.
अगदी वीज नव्हती तर लिफ्ट चालत नाही म्हणूनही तो त्या पक्षावर इतका चिडला होता की सरदार जिने चढून वर गेला.
मग त्याने पक्षाला खूप क्रूरपणे मारले.

कसे माहितीये?


त्याने त्या पक्षाला शंभराव्या मजल्यावरून खाली फेकून दिले, तेव्हा कुठे त्याचा राग शांत झाला.

सरदारजीने केली बिल गेट्सची कानउघाडणी

सरदार Economic Times वाचत होता.

त्यात एक बातमी होती, “मायक्रोसॉफ्टने स्कायपी विकत घेतलं, तब्बल ४ कोटी डॉलरला.”


सरदारजीने लगेच बिल गेटसला फोन लावला आणि त्याला सांगितलं, “कशाला रे असले उद्योग करतोस कसलीच माहिती न घेता. किमान स्वत: बनवलेल्या याहूवर सर्च केलं असतंस तर स्कायपी मोफत डाऊनलोड करता आलं असतं.”

नॉटी सरदार


एकदा दोन सरदार हातगाडीवर दोन समोसे विकत घेतात आणि ते खाण्यासाठी KFC मध्ये जातात. मस्त AC त बसून समोसे खायचा प्लान असतो. ते समोसे बाहेर काढून खायला लागतात.

तेवढ्यात तिथला एक कर्मचारी त्यांना हटकतो, “हे बघा, तुम्ही स्वत:चे समोसे इथे खाऊ शकत नाही.”

मग काय?


सरदार आपल्याकडील समोसे अदलाबदली करतात आणि खाऊ लागतात.

03 January 2014

सरदारजीची व्यावसायिक रणनीती

एका सरदारजीने “पुत्तर दा ढाबा” टाकला.

त्यात कर्मचारी भरतीसाठी त्याने एक सूचनाफलक लावला.

“आमच्याकडे आचारी, वेटर, सफाई कर्मचारी, मदतनीस, इ. पदांसाठी भरती चालू आहे. केवळ विवाहित लोकांनीच कामासाठी अर्ज करावा.”


लोकांनी त्याला याचं कारण विचारल्यावर तो म्हणाला,त्याचं काय आहे, विवाहित लोकं त्यांना सांगितलेल्या सूचनांचं पालन करतात आणि कोणतंही काम विनातक्रार करतात. पण अविवाहित लोकं मात्र माजुरडे असतात.

02 January 2014

सरदाजीची मुलाखत

एक सरदारजी मुलाखतीसाठी एका नामांकित मोबाईल कंपनीत जातो.

त्याला बिचार्‍याला मात्र भोळ्या स्वभावाचा खूपच तोटा झाला.

त्याला पहिल्याच प्रश्नात नोकरी नाकारली गेली.

मुलाखतकार : सध्याचं सर्वप्रसिद्ध असं नेटवर्क कोणतं?


सरदारजी : कार्टून नेटवर्क.

01 January 2014

कशी बुडवाल पाणबुडी?


समजा, खूप सार्‍या सरदारांनी भरलेली (खरंतर एक असेल तरी पुरे) पाणबुडी बुडवायची असेल तर कशी बुडवाल, तीही कुठल्याही स्फोटकांविना?

सोप्पं आहे.


फक्त दरवाजावर टिकटिक करायची.


18 August 2013

सरदारजी बसला M.P.S.C. च्या परीक्षेला

सरदारजी M.P.S.C. च्या परीक्षेला बसला होता.

परीक्षेच्या दिवशी परीक्षागृहात सर्व परीक्षार्थिंना उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या.

सरदारजी त्याला उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका मिळताच दरवाजाच्या समोर जाऊन पेपर सोडवायला लागला.


पर्यवेक्षकाने त्याला याचं कारण विचारताच तो म्हणाला, “कारण मी प्रवेशपरीक्षा देतोय ना.”

सरदारजीने भरला पासपोर्टचा अर्ज

एक सरदार पासपोर्ट काढायला गेला.
अर्ज भरताना त्यात पर्याय होते,

१. आपल्याला कधी अटक झालेली आहे का?
सरदारचे उत्तर : नाही.

२. कारण? (हा प्रश्न त्यांच्यासाठी होता, ज्यांना अटक झालेली होती.)

सरदारचे उत्तर : मी पोलिसांना सापडलोच नाही.

27 July 2013

भन्नाट डोक्याचा सरदार

एक उद्योगपती सरदार अमेरिकेत वास्तव्यास असतो.

तो तेथील बँकेत जाऊन आर्थिक अडचणीसाठी दहा हजार डॉलरचं कर्ज मागतो आणि दोन आठवड्यांनंतर भारतातून परत येताना तो ही रक्कम आणून कर्ज फेडण्याचं आश्वासन देतो.

बँक त्याला गॅरंटी म्हणून बँकेकडे काय गहाण ठेवणार म्हणून विचारते?
सरदार त्याची नवी कोरी फेरारी बँकेकडे ठेवण्याचं मान्य करतो.

बँक त्याला कर्ज देते आणि ही महागडी कार सुरक्षितरित्या आपल्या ताब्यात ठेवते. दोन आठवड्यांनी सरदार परत आल्यावर बँकेचे कर्ज म्हणून दहा हजार डॉलर आणि व्याज म्हणून १०० डॉलर अशी रक्कम परत करतो.

बँक त्याला विचारते, “तुम्ही करोडपती असताना केवळ १०००० डॉलरसाठी ही ३ लाख डॉलरची गाडी चक्क गहाण का ठेवलीत?


तेव्हा सरदार म्हणतो, “त्याचं काय आहे, भारतात महत्वाच्या कामासाठी तातडीने जावं लागणार होतं. तेव्हा गाडी कुठे पार्क करणार हा मोठा प्रश्न होता. तो प्रश्न १०० डॉलरमध्ये असा सोडवला.”

07 July 2013

बोधगयातील बॉम्बस्फोटाचा तपास

बोधगयातील विश्वप्रसिद्ध बौद्ध मंदिरात आठ बॉम्बस्फोट झाल्यावर संशयितांना पकडण्यासाठी बिहारच्या
मुख्यमंत्र्यांनी एक पथक नेमायचं ठरवलं. तशा पोलिसांना सूचना दिल्या.

पोलीस महासंचालकांनी नुकतंच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तीन सरदारांना बोलावून घेतलं.
त्यातल्या पहिल्या सरदारला त्यांनी संशयिताचा एक फोटो दाखवून विचारलं, “याला तू शोधू शकतोस?

पहिला सरदार : हो, नक्कीच. कारण, याला एकच डोळा आहे. तेव्हा एक डोळा असलेला माणूस सहज पकडून आणीन.

पोलीस : अरे मूर्खा, तो त्याचा एका बाजूने काढलेला फोटो होता.
ते हाच फोटो दुसर्‍याला दाखवतात.

दूसरा सरदार : हो, नक्कीच. कारण, याला एकच कान आहे. तेव्हा एक कान असलेला माणूस सहज शोधून आणीन.

पोलीस साहेब आपल्या कपाळाला हात मारतात. ते हाच फोटो तिसर्‍या सरदारला दाखवून म्हणतात, “ऐकलंस ना. तू तरी शहाण्यासारखं विचार करून उत्तर दे.”

तिसरा सरदार : हो, नक्कीच. कारण, हा डोळ्यांत कॉनटॅक्ट लेन्सेस घालतो. तेव्हा याला सहज शोधून आणीन.

साहेब हे उत्तर ऐकून आश्चर्यचकित होतात. ते त्या संशयिताचा बायोडेटा तपासतात, तर काय आश्चर्य ते खरंच असतं. हे तिसर्‍या सरदारची हुशारी पाहून त्याला विचारतात, काय रे? तुला फोटो पाहून हे कसं कळलं?”

तिसरा सरदार : अहो साहेब, त्याला एकच कान आहे म्हणजे तो चष्मा घालू शकत नाही. म्हणजेच तो लेन्स वापरत असणार ना.

06 July 2013

सरदारची इंग्रजी

सरदारजी इंग्रजीचा क्लास लावतो आणि थोडंफार शिकलेला असतो.

तो एकदा हॉटेलात जातो. जेवण वगैरे झाल्यावर तो हात धुवायला वॉश बेसीन कडे जातो.

पण, तिथे तो हात धुण्याऐवजी ते वॉश बेसीनच धुवायला लागतो.

हॉटेलचा मालक धावत जाऊन त्याला थांबवतो आणि विचारतो, “पाजी, हे काय करताय तुम्ही?


सरदार म्हणतो, “अहो मालक, तुम्हीच तर इथे बोर्ड लावलाय ना? WASH BASIN.

05 July 2013

SARDAR IS ALWAYS COOL…

एक सरदार पेट्रोल पंपावर आपल्या स्कूटीमध्ये पेट्रोल भरायला जातो.

तिथे भाव वाढल्याने एक माणूस सहज त्या सरदारला म्हणतो, “पाजी ये पेट्रोल दिन ब दिन महंगा होता जा रहा है. हमारे जैसे आम आदमी का तो बॅंड बज गया है.”

सरदार : लेकीन हमको कुछ फरक नही पडता सर जी. हम हमेशा १०० रु का ही पेट्रोल डालता हू गाडी मे.

04 April 2013

सरदार का पुत्तर


एकदा एका माणसाने एका सरदारला पत्र लिहिलं.

त्यात लिहिलेलं होतं की “जर तू हुशार असशील तर १०० रुपये खालील पत्त्यावर पाठव. जर तू जास्त हुशार असशील तर ३०० रुपये पाठव आणि जर तू खूपच हुशार असशील तर ६०० रुपये पाठव.”

सरदारने मात्र त्या माणसाला १००० रुपयांची नोट पाठवली. त्या पत्रात सरदारने लिहिले की “मी सगळ्यांचा बाप आहे. मी अतिशहाणा आहे.

04 February 2013

सरदारजीचा अपघात


दोन सरदारजींच्या गाड्यांची समोरासमोर टक्कर होते.

दोघे भांडू लागतात.

पहिला सरदार : आंधळा कुठला? दिसत नाही का?

दूसरा सरदार : , टक्कर मी तुला मारलीय. मग मी आंधळा कसा?

31 January 2013

दोन गंडलेले सरदार


पहिला सरदार : तुझा फोन नंबर सांग.

दूसरा सरदार : त्या टेलिफोन डिरेक्टरीत बघ.

पहिला सरदार : तुझं नाव सांग.

दूसरा सरदार : अरे मूर्खा, त्या डिरेक्टरीतच आहे माझ्या फोन नंबरसमोर.

30 January 2013

सरदार आणि वाघ


सरदारजीला एकदा प्राणिसंग्रहालयात नोकरी मिळते.

सरदार एके दिवशी वाघाच्या पिंजर्‍याला कुलूपच लावत नाही. तसाच मोकळा सोडून येतो.

तिथल्या अधिकार्‍याला हे समजतं तेव्हा तो सरदारला विचारतो, का रे, तुला एवढं कळत नाही का? कुलूप का नाही लावलंस?

सरदार : अहो साहेब, एवढ्या हिंस्र प्राण्याला कोण कशाला चोरी करून नेईल?

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...