एक उद्योगपती सरदार अमेरिकेत
वास्तव्यास असतो.
तो तेथील बँकेत जाऊन आर्थिक
अडचणीसाठी दहा हजार डॉलरचं कर्ज मागतो आणि दोन आठवड्यांनंतर भारतातून परत येताना तो
ही रक्कम आणून कर्ज फेडण्याचं आश्वासन देतो.
बँक त्याला गॅरंटी म्हणून
बँकेकडे काय गहाण ठेवणार म्हणून विचारते?
सरदार त्याची नवी कोरी
फेरारी बँकेकडे ठेवण्याचं मान्य करतो.
बँक त्याला कर्ज देते
आणि ही महागडी कार सुरक्षितरित्या आपल्या ताब्यात ठेवते. दोन आठवड्यांनी सरदार परत
आल्यावर बँकेचे कर्ज म्हणून दहा हजार डॉलर आणि व्याज म्हणून १०० डॉलर अशी रक्कम परत
करतो.
बँक त्याला विचारते, “तुम्ही
करोडपती असताना केवळ १०००० डॉलरसाठी ही ३ लाख डॉलरची गाडी चक्क गहाण का ठेवलीत?”
तेव्हा सरदार म्हणतो, “त्याचं
काय आहे, भारतात महत्वाच्या कामासाठी तातडीने जावं लागणार होतं. तेव्हा
गाडी कुठे पार्क करणार हा मोठा प्रश्न होता. तो प्रश्न १०० डॉलरमध्ये असा सोडवला.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.