एक नागपूरकर : काय हो
तुम्हाला मेंदू आहे का?
पुणेकर : हो, आहे
की.
नागपूरकर : मग काय त्याच्यापर्यंत
तुमच्या शरीरातलं रक्त पोहोचत नाही का?
पुणेकर : नाही ना.
नागपूरकर : तरीच...तुम्ही
असे तिरसट स्वभावाचे आहात.
पुणेकर : हो, असेल
कदाचित. काय हो, याचा अर्थ तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा चांगलाच होतोय म्हणायचं
की.
नागपूरकर : (पुणेकराने
एवढ्या सहजपणे आपली लाज घालवून घेतली या खुशीत) म्हणजे काय???
पुणेकर : म्हणजे काय माहितीये? याचं
तुम्हाला वैज्ञानिक उत्तर देतो बघा. याचा अर्थ असा की द्रव पदार्थ हा नेहमी रिकाम्या
जागेकडे वाहतो, हा नियम इथे लागू पडतो.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.