Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label लहान मुलांचे जोक्स. Show all posts
Showing posts with label लहान मुलांचे जोक्स. Show all posts

12 April 2012

मृत्यूदर


शिक्षक : बंड्या ऊठ. सांग बरं आपल्या देशाचा मृत्यूदर किती आहे?

बंड्या : १०० टक्के.

शिक्षक : कसं काय?

बंड्या : कारण, जो जन्माला येतो तो मरतोच ना.

19 July 2011

देवाचंच अपहरण

एक छोटा मुलगा एका चित्रपटात पाहतो की, त्यातल्या एका लहान मुलाला काही गुंड पळवून नेतात आणि त्याच्या आई-वडिलांना पैसे मागतात. मग आई-वडील पैसे देऊन आपल्या मुलाची सुटका करून घेतात.

हा पण मग अशीच भन्नाट युक्ती वापरुन सायकल मिळवायची असं ठरवतो.

तो शंकराच्या देवळात जातो आणि प्रार्थना करतो, "हे महादेवा, मला एक सायकल दे."

तो १ दिवस वाट पाहतो, पण सायकल काही मिळत नाही. मग दुसर्‍या दिवशी पुन्हा देवळात जातो.

आता मात्र तो देवळातली गणपतीची मूर्ती उचलून घेऊन घरी येतो.

देवळातून बाहेर पडण्यापूर्वी मात्र तो एक चिठ्ठी शंकराच्या पुढे ठेवून येतो.

ती अशी...

"जर तुला तुझा मुलगा सुरक्षित हवा असेल, तर उद्या सायकल घेऊन देवळाच्या मागे ये."

10 June 2011

आयुष्याचे ४ टप्पे


१. वय : १ ते १५ – तुमचा सांताक्लोजवर विश्वास असतो.

२. वय : १६ ते २५ – तुमचा सांताक्लोजवर विश्वास नसतो.

३. वय : २५ ते ३५ – तुम्ही सांताक्लोज होता.

४. वय : ३६ पासून पुढे – तुम्ही सांताक्लोजसारखे दिसू लागता.

एका लहान मुलीची प्रार्थना


नाताळचा सण असतो.

ती लहान मुलगी सांताक्लोजला प्रार्थना करते.

“सांताक्लोज, मला यावर्षी मला काहीही नको. फक्त माझ्या पप्पांच्या कॉम्प्युटरमधल्या गरीब मुलींना कपडे दे.”

23 May 2011

आवाजातलं रहस्य

संता एक दिवस आपल्या लहान बाळाचा आवाज रेकॉर्ड करत बसला होता.

तेवढ्यात बंता तिथे आला.

बंता : अरे बाळाचा आवाज का रेकॉर्ड करतोय?

संता : कारण, तो काय बोलतोय हेच कळत नाहीये. तेव्हा मोठा झाल्यावर मी त्याला याचा अर्थ विचारीन म्हणतो.

21 April 2011

घरचा अभ्यास

शिक्षक : का रे बंडू, तू घरचा अभ्यास का नाही केलास?

बंडू : गुरुजी, मी वसतिगृहात राहतो.

28 February 2011

हुशार बंड्या


शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत होती की चोरी करणे म्हणजे पाप आहे, गुन्हा आहे, वाईट आहे, वगैरे, वगैरे...

हे मुलांना समजलं की नाही हे तपासून पाहण्यासाठी तिने मुलांना प्रश्न केला.

"सांगा पाहू, मी जर एखाद्या माणसाच्या खिशात त्याच्या नकळत हात घालून त्यातले पैसे काढून घेतले तर तुम्ही मला काय म्हणाल?"

बंड्या हात वर करतो.

शिक्षिका : तू सांग पाहू.

बंड्या : त्या माणसाची बायको.


23 February 2011

वाहतुकीचे नियम पाळा

बंड्या आज शाळेत उशिरा पोचतो.

शिक्षक : का रे बंड्या, आज उशीर कसा काय झाला?

बंड्या : सर, कारण मी आज वाहतुकीचा नियम पाळला म्हणून.

शिक्षक : ते कसं काय?

बंड्या : मी शाळेत येत असताना शाळेजवळ आल्यावर इथे बाजूलाच एक बोर्ड दिसला. त्यावर लिहिलं होतं, "हळू जा, पुढे शाळा आहे."





शाळेचा पहिला दिवस

एका मुलाचा आज शाळेचा पहिला दिवस असतो.

मुलगा संध्याकाळी शाळेतून परत घरी येतो.

त्याची आई त्याला विचारते, "काय रे बाळा, आज काय शिकलास शाळेत?"

मुलगा : फारसं काही नाही, म्हणून तर त्यांनी परत बोलावलंय उद्या.





21 February 2011

हस्ताक्षर

शिक्षक : काय रे बंड्या, काय आहे हे? एवढं घाणेरडं अक्षर मी आयुष्यात कधी पाहिलं नाही.

बंड्या : अहो गुरुजी, आहे हेच चांगलंय. मी अक्षर चांगलं काढलं तर तुम्हाला स्पेलिंगपण चुकीची दिसतील.





05 February 2011

शिक्षण...

शिक्षक : बंड्या मला इंग्रजीतलं असं एक वाक्य सांग जे "I" ने चालू होतं.

बंड्या : I is the...

शिक्षक : अरे मूर्खा थांब, थांब. I नंतर कधी is लावतात का? I नंतर am लावायचा समजलं?

बंड्या : I am the ninth letter of alphabet.





पप्पांचा राग

बंड्याचे पप्पा : हे बघ बंड्या, नालायका, पास झाला नाहीस ना तर मला पप्पा म्हणू नकोस. मला लाज वाटेल तुझा बाप म्हणून घ्यायची. समजलं?

काही दिवसांनी...

बंड्याचे पप्पा : का रे आज निकाल होता ना? काय झालं?

बंड्या : सॉरी यार मोहनशेठ, मी नापास झालो.





04 February 2011

सर्वांत लांबलचक शब्द

शिक्षक : मुलांनो, सांगा पाहू, इंग्रजीतला सर्वांत लांब शब्द कोणता?

बंड्या : सर, Smiles.

शिक्षक : अरे मूर्खा हा तर केवळ ६ अक्षरीच आहे.

बंड्या : नाही सर, या शब्दातल्या पहिल्या आणि शेवटच्या अक्षरामध्ये तब्बल १ मैल (mile)अंतर आहे.





बंड्याचा शोध

बंड्या : सर, आमच्याकडे एक अशी गोष्ट आहे जिच्यातून भिंतीच्या पलीकडलं पाहता येतं.

शिक्षक : अरे हळू बोल. मला सांग पाहू कोणती आहे ती गोष्ट?

बंड्या : खिडकी.









बंड्याचा प्रश्न

बंड्या : पप्पा, तुम्ही इंजिनीयर कसे काय झालात?


पप्पा : अरे, त्यासाठी डोकं लागतं.


बंड्या : अहो, म्हणूनच तर मला प्रश्न पडलाय की तुम्ही इंजिनीयर कसे काय झालात.





25 January 2011

भावाचं प्रेम

शिक्षक : जर मी रस्त्याने जात आहे आणि मला तेवढ्यात एक व्यक्ती एका गाढवाला मारत असलेली दिसली. मी त्या व्यक्तीला थांबविले, तर मी कोणत्या भावनेचं दर्शन घडवतो आहे?

बंड्या : बंधुप्रेम





23 January 2011

प्रश्न सरांचा, उत्तर मुलांचे

शिक्षक : मुलांनो, सांगा बरं गांधीजींनी कठोर परिश्रम, मेहनत करून १५ ऑगस्टला आपल्याला काय मिळवून दिले?

बंड्या : सुट्टी.





बंड्याचं ज्ञान

शिक्षक : बंड्या, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. योगायोग म्हणजे काय, त्याचं एक उदाहरण दे पाहू.

बंड्या : सर, योगायोग म्हणजे माझ्या वडिलांचं माझ्या आईशी एकाच वेळी, एकाच ठिकाणी लग्न झालं.





19 November 2010

डोकं लढवा

शिवाजी महाराजांनी आपल्या किल्ल्यांचा वापर कशासाठी केला?







विचार करा,








विचार करा,






अहो, सोप्पं आहे,



कुलूप उघडायला...

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...