Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label santa banta. Show all posts
Showing posts with label santa banta. Show all posts

17 November 2016

संताचा शोध

संता : मी एक शोध लावलाय.

बंता : कोणता?


संता : जेव्हा जेव्हा फाटक बंद होतं ना, तेव्हा तेव्हा आगगाडी जरूर येते.


04 November 2016

ओ संताजी...

संता : बटाटे घ्या बटाटे.

बंता : ह्या तर जिलब्या आहेत.

संता : गप रे. उगाच जिलब्या, जिलब्या करू नकोस. ऐकलं तर माश्या येतील.



13 August 2016

आपल्या देशात बॉम्बस्फोट झाल्यावर...



मुख्यमंत्री : आम्ही सरकारतर्फे प्रत्येक जखमीला ३ लाख रुपये तर प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये देण्याची घोषणा करतो आहोत.


संता : मुख्यमंत्री साहेब, माझा बाप आधी जखमी झाला आणि नंतर मेला. आमचे १३ लाख होतात.


04 May 2015

देवा रे देवा, ये देखो हलकट

संता ऑफिसला निघाला.

चुकून तो रस्त्याच्या उलट्या दिशेने गाडी चालवू लागला. त्याच्या लक्षातच आले नाही.


संता : अरे बापरे, आज पण खूप उशीर झालेला दिसतोय. सगळे लोक ऑफिसमधून परत घरी चाललेत.


02 August 2014

निशाणा...तुला दिसला ना

एक खगोलशास्रज्ञ आकाशाकडे दुर्बिण लावून बसला होता.

संता तिथून जात असताना त्याला हे दृश्य दिसलं.

तेवढ्यात आकाशातून एक उल्का दूर डोंगरावर पडताना दिसते.


संता : वा, वा. काय अचूक नेम आहे तुमचा.



08 June 2013

ओये संता...संता ओये

संता एकदा आपल्या एका पायात सफेद तर दुसर्‍या पायात काळा बूट घालून शाळेत जातो.

शिक्षक : अरे, काय रे हे संता? जा घरी जाऊन बूट बदलून ये.


संता : त्याचा काहीच उपयोग नाही सर. कारण, घरी पण असलेच दोन बूट अजून आहेत.

12 November 2012

वाचलो बुवा

संता एकदा रस्त्याने जात होता.

त्याच्या अंगावर विजेची तार पडते.

तो आता तडफडून तडफडून मरणार, तोच त्याच्या लक्षात येतं कि अरेच्चा; दोन दिवसांपासून गावात वीजच नाहीये.


मग तो उठून बसला, स्वत:शीच हसला आणि म्हणाला, “च्यायला, वीज गेलीय हे माझ्या वेळीच लक्षात आलं नसतं तर मेलो असतो. वाचलो बुवा.


17 October 2012

कल्पना करा...



संता : अरे, तू माझ्याकडून घेतलेले ६०००० रुपये कधी परत करणार आहेस?

बंता : हे तू मला का विचारतो आहेस? मी काय ज्योतिषी आहे का?

02 September 2012

शेक्सपियरला ई-मेल


संता एकदा शेक्सपियरला ई-मेल पाठवतो.

त्याचा मित्र म्हणतो, “अरे मूर्खा शेक्सपियर तर मेलेलाय ना.”

संता : मग त्यात घाबरायचं काय एवढं? त्यानेही मला परत उत्तर नाही पाठवलेलं.

पैसे सुट्टे नाहीत...


संता एकदा केस कापायला जातो. अगदी निग्रोसारखे बारीक केस कापून येतो.

केस कापून आल्यावर त्याचा मित्र त्याला विचारतो, “तू केस एवढे बारीक करून का आलास?

संता : काय करणार? वरचे तीन रुपये सुट्टेच नव्हते. मग न्हाव्याला म्हणालो, अजून तीन रुपयांचे काप.

संताचं भविष्य

संता एकदा ज्योतिषाला आपला हात दाखवतो आणि आपलं भविष्य विचारतो.
ज्योतिषी : ठीक आहे. मला तुझी कुंडली दाखव.

संता ज्योतिषाच्या हाती एक पुस्तक देतो.
ज्योतिषी त्या पुस्तकाचे समोरचे, मधले आणि सगळ्यात मागचे पान उघडून वाचतो.

मग संताला म्हणतो,तुला एक मुलगा आहे आणि तू आताच ५ किलो गहू घेऊन आला आहेस.
संता खुश होतो आणि म्हणतो,काका, तुम्ही तर अंतर्यामी आहात.

ज्योतिषी : “अरे गाढवा, पुढच्यावेळेस येताना रेशनकार्ड घरी ठेऊन ये आणि कुंडली आण.

03 April 2012

काम एवढुसं आणि मेहनत मात्र केवढी?

संताचा ट्रक रस्त्यात बंद पडलेला असतो.

संता जवळच्या गॅरेजमध्ये जातो आणि त्याचा ट्रक ओढून नेण्यासाठी दूसरा ट्रक घेऊन येतो.

त्याच्या ट्रकला तो जाड कासरा बांधून तो ह्या ट्रकला बांधून त्याचा ट्रक ओढून नेण्याचा प्रयत्न करत असतो.

तेवढ्यात तिकडून बंता येतो.

संताचं हे थेर बघून तो पोट धरून जमिनीवर लोळून लोळून हसू लागतो.

चिडलेला संता त्याच्याकडे येऊन त्याला विचारतो, “काय रे काय झालं हसायला?

बंता : हा हा हा हा...एवढीशी दोरी ओढून न्यायला दोन दोन ट्रक...हा हा हा हा !!!

30 July 2011

संताचा निष्कर्ष

संताला संशोधक म्हणून नोकरी मिळते.

कुठलीही गोष्ट घडली की त्यातून काही ना काही निष्कर्ष काढून हा मोकळा होत असे.

एकदा तो खडकवासला धरणाच्या चौपाटीवर फिरायला गेलेला असतो. त्याचवेळी तिथे एक घटना घडते.

एक व्यक्ती पाण्यात उडी मारते, पण बराच वेळ झाला तरी बाहेर काही येत नाही.
मग दोन व्यक्ती उड्या मारतात, पण त्याही बाहेर येत नाहीत.

यावरून संता असा निष्कर्ष काढतो की, माणूस पाण्यात विरघळतो.



26 June 2011

व्यसनाधीन संता


संता आपल्या वडिलांसमोर सिगारेट पित बसला होता.

बंता : अरे, तू तुझ्या वडिलांसमोर सिगारेट ओढतोस?

संता : मग काय झालं? ते माझे वडील आहेत, पेट्रोल पंप नाहीत.

11 June 2011

डिश करो, खुश रहो



संता : तुझी आवडती डिश (जेवणाची) कोणती?

बंता : टाटा स्काय.

04 May 2011

बिनडोक संत्या, च्यामारी !!!



संता : अरे, माझं डोकं एकदम खराब झालंय बघ.

बंता : का? काय झालं?

संता : एक तास झाला मला कुणीतरी सारखा Battery Low नंबरवरुन मिस्ड कॉल करतंय.

02 May 2011

जास्त ज्ञान शिकवू नका


संता एके दिवशी दोन चपात्या खात बसलेला असतो.

बंता : का र, तू एकाच वेळी दोन चपात्या एकसाथ का खात आहेस?

संता : कारण, डॉक्टर म्हणाले की रोज दोन चपात्या खात जा.

22 April 2011

शर्यत




संता : मी त्या समोरच्या ३० मजली उंच इमारतीवर न दमता २ मिंनिटांमध्ये चढू शकतो.

बंता : शक्यच नाही.

संता : का नाही? मी नक्कीच चढू शकतो.

बंता : नाही नाही, ते शक्यच नाही?

संता : का शक्य नाही? चल मग पैज लाव. मी चढलो तर काय देशील?

बंता : एक धक्का.

14 April 2011

संता तो संताच



एकदा संता बँकेच्या ATM मध्ये पैसे काढायला जातो.

तो कार्ड मशीनमध्ये घालतो आणि पासवर्ड टाइप करतो.

तेवढ्यात त्याला मागून आवाज येतो, “मी तुझा पासवर्ड पहिला आहे, तो १२३४...”

संता : नाही रे नाही. चुकला तू. तो १२३४ नाही, १८२५ आहे.

18 March 2011

प्रार्थना संताची

एकदा संताचं गाढव हरवतं.

मग संता देवळात जातो आणि देवाला प्रार्थना करू लागतो.

तिथे बंताही त्याच्यासोबत असतो.

बंता संताला म्हणतो, "तू देवाला हीच प्रार्थना करत असशील ना की तुझं गाढव तुला परत मिळू दे म्हणून."

संता : नाही रे, उलट मी देवाचे आभार मानत आहे की, मी त्यावेळी गाढवावर बसलो नव्हतो म्हणून, नाहीतर मीसुद्धा हरवलो असतो ना.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...