संता एकदा ज्योतिषाला आपला हात दाखवतो आणि आपलं भविष्य विचारतो.
ज्योतिषी : ठीक आहे. मला तुझी कुंडली दाखव.
संता ज्योतिषाच्या हाती एक पुस्तक देतो.
ज्योतिषी त्या पुस्तकाचे समोरचे, मधले आणि
सगळ्यात मागचे पान उघडून वाचतो.
मग संताला म्हणतो, “तुला एक मुलगा आहे आणि तू आताच ५ किलो गहू
घेऊन आला आहेस.”
संता खुश होतो आणि म्हणतो, “काका, तुम्ही तर अंतर्यामी आहात.”
ज्योतिषी : “अरे गाढवा, पुढच्यावेळेस
येताना रेशनकार्ड घरी ठेऊन ये आणि कुंडली आण.”