Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

26 July 2012

वाढदिवसाची पुणेरी भेट पाहिजे तुम्हाला?

पुणेकरांना कुणी काही विचारत सुटला तर त्याचा फार राग येतो.

जे काय विचारायचं ते सरळ आणि अगदी मोजकंच.

नाही तर...

अपssमान...

तर मग,

एकदा एका नागपूरकर शेजार्‍याने बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने जोशीकाकांना विचारले,"अहो, आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे."

जोशी : मग मी काय करू?

शेजारी : मला सांगा, मी तिला तिच्या हृदयाला स्पर्श करेल अशी कोणती गोष्ट देऊ आज?

जोशी : (मनातल्या मनात - वाढदिवस ह्याच्या बायकोचा, साधं साजरा करायला बोलावणं नाही अन निघालाय फुकटचा सल्ला मागायला...नसता ताप डोक्याला.)

च्यायला मग सरळ गोळीच घाला की.

22 July 2012

पुणेकराचा सल्ला


साठे सरांच्या बाजूला राहणार्‍या नागपूरकर पती-पत्नीत एकेदिवशी जोरदार भांडणे होतात.

तो शेजारचा माणूस दुसर्‍या दिवशी साठे सरांकडे येऊन म्हणतो, “अहो बघा ना. काय बायको आहे. काल आमच्यात भांडणं झाली आणि गेले तब्बल २४ तास ती माझ्याशी एक शब्दही बोलली नाहीये.”

साठे सर : अहो, मग हे मला काय सांगताय? गिनीज बुकवाल्यांकडे जाऊन त्यांना सांगा ना.

15 July 2012

यापेक्षा वाईट ते काय असू शकतं?

तुम्ही जर सफरचंद खात असाल आणि त्यात एखादी अळी सापडली तर?


ठीक आहे हो, ती अळी जिवंत तशीच बाहेर काढून फेकून देता येईल...




पण...




यापेक्षा वाईट ते काय असू शकतं? जेव्हा ती अळी अर्धी खाऊन तुटलेली असेल तर...?


छी...sss

11 July 2012

नवी पिढी


आजकालची पोरं फारच हुश्शार आहेत.

एकदा एका पोराला शाळा बदलावी लागली.

नवीन शाळेत गेल्यावर गुरुजींनी विचारलं, “काय रे, गण्या ना तू?”

पोरगा : हो.
गुरुजी : तुला लिहिता-वाचता येतं का?
पोरगा : लिहिता येतं, पण वाचायला नाही येत.
गुरुजी : मग या कागदावर तुझं नाव लिही पाहू.

पोरगा काहीतरी लिहितो आणि गुरुजींना दाखवतो.

गुरुजी कागदावरच वाचायचा प्रयत्न करतात. शेवटी त्याला विचारतात, “हे काय आहे? वाचून दाखव पाहू.”

पोरगा : गुरुजी, मला फक्त लिहिता येतं. वाचता येत नाही. मी अगोदरच सांगितलं होतं.


09 July 2012

आरपार की आर या पार?

प्रोफेसर संक यांचं विज्ञानाचं लेक्चर चालू होतं.

दोन पोरं नेहमीप्रमाणे धिंगाणा घालताना सरांना सापडली.

प्रोफेसर : नालायकांनो, धिंगाणा घालायचाच असेल तर कॉलेजच्या बाहेर जाऊन घाला ना. काहीतरी शिकून मोठे व्हावयाचे म्हणून पाठवतात ना तुमचे आई-बाप इकडे? तुमच्या थोबाडाकडं बघून तरी वाटत नाही तुम्ही काहीतरी मोठं करून दाखवाल म्हणून.

आपले आई-बाप काढले म्हटल्यावर पोरं जाम उचकतात. ह्या मास्टरची टर कशी उडवायची ते ह्यांना माहीत असते.

पोरं सरांना म्हणतात, "ओ सर, तुम्ही आम्हाला "ढ" समजू नका. आम्ही ना आज एक शोध लावलाय."

प्रोफेसर : कोणता बरं? मास्तर शिकवीत असताना खिडकीतून बाहेर कसं बघायचं ते?

पोरं : नाही सर, पण भिंतीच्या त्या बाजूचं ह्या बाजूला उभं राहूनही आरपार बघता येतं आमच्या प्रयोगाने.

प्रोफेसर : अस्स...मग दाखवा बघू तुमचा प्रयोग.

पोरं : मग चला आमच्या बरोबर आपल्या कॉलेजच्या कंपाऊंडच्या भिंतीसमोर.

कॉलेजचं मैदान बरंच मोठं असल्याने कंपाऊंडची भिंत पण भली लांब. ह्या म्हातार्‍या सरांना ३००-४०० मीटरचं अर्ध-पाऊण मैदान फिरवून पोरं त्यांना एका ठिकाणी नेतात.

पोरं : (भिंतीला पाडलेल्या एका भोकाकडे बोट दाखवीत) हा बघा आमचा शोध. इकडून पाहिलं की पलीकडच सगळं दिसतं...असं म्हणून पोरं पळून जातात...आणि मास्तर आपणच ह्यांना शोधाची आयडिया देऊन आपल्या पायावर कुर्‍हाड मारली म्हणून स्वत:लाच दोष देत निघून जातात.

04 July 2012

आशीर्वाद

बायको : अहो, मी जर हरवले तर तुम्ही काय कराल?

नवरा : उद्याच्या पेपरात जाहिरात देईन आणि त्यात तुझ्यासाठी आशीर्वाद लिहीन, "जिथे कुठे असशील तिथे सुखात रहा."

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...