Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label student. Show all posts
Showing posts with label student. Show all posts

03 August 2014

धोका

हॉस्टलमध्ये राहणार्‍या दोन विद्यार्थ्यांमधील हा संवाद.

पहिला विद्यार्थी : अरे माझ्यासोबत फार मोठा धोका झाला.

दूसरा विद्यार्थी : का रे, काय झालं?


पहिला : काय सांगू, पप्पांकडे पुस्तकांसाठी पैसे मागितले तर त्यांनी पुस्तकंचं पाठवून दिली.



04 February 2013

पप्पांची भविष्यवाणी


बंड्या : पप्पा, तुम्ही ज्योतिषी आहात.
पप्पा : कसा काय?

बंड्या : सहा महिन्यांपूर्वी तुम्ही सांगितलं होतंत की मी कधी पास होऊ शकत नाही म्हणून.

14 November 2012

संधीसाधू



प्रोफेसर साठे वर्गात किचकट विषय शिकवत असतात.
(अर्थातच; विषय सोपा असतो, पण तो किचकट करून शिकवण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नसतं.)

ते मुलांना शिकवताना सारखे सारखे प्रश्न विचारत असतात.
ह्या मास्तराच्या अशा वागण्याने सगळी पोरं वैतागलेली असतात.
साठे मग एक अभिनव कल्पना अमलात आणण्याचं ठरवतात.

ते मुलांना म्हणतात, “हे बघा, जो कोणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल, त्याला एक लेक्चर ऑफ घेता येईल.”

तेवढ्यात एक मुलगा हातातला पेन साठे सरांच्या दिशेने भिरकावतो.
साठे सर : कुणी फेकला रे पेन?

मुलगा : सर, मी. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता मला एक लेक्चर ऑफ लावा पटकन.

09 July 2012

आरपार की आर या पार?

प्रोफेसर संक यांचं विज्ञानाचं लेक्चर चालू होतं.

दोन पोरं नेहमीप्रमाणे धिंगाणा घालताना सरांना सापडली.

प्रोफेसर : नालायकांनो, धिंगाणा घालायचाच असेल तर कॉलेजच्या बाहेर जाऊन घाला ना. काहीतरी शिकून मोठे व्हावयाचे म्हणून पाठवतात ना तुमचे आई-बाप इकडे? तुमच्या थोबाडाकडं बघून तरी वाटत नाही तुम्ही काहीतरी मोठं करून दाखवाल म्हणून.

आपले आई-बाप काढले म्हटल्यावर पोरं जाम उचकतात. ह्या मास्टरची टर कशी उडवायची ते ह्यांना माहीत असते.

पोरं सरांना म्हणतात, "ओ सर, तुम्ही आम्हाला "ढ" समजू नका. आम्ही ना आज एक शोध लावलाय."

प्रोफेसर : कोणता बरं? मास्तर शिकवीत असताना खिडकीतून बाहेर कसं बघायचं ते?

पोरं : नाही सर, पण भिंतीच्या त्या बाजूचं ह्या बाजूला उभं राहूनही आरपार बघता येतं आमच्या प्रयोगाने.

प्रोफेसर : अस्स...मग दाखवा बघू तुमचा प्रयोग.

पोरं : मग चला आमच्या बरोबर आपल्या कॉलेजच्या कंपाऊंडच्या भिंतीसमोर.

कॉलेजचं मैदान बरंच मोठं असल्याने कंपाऊंडची भिंत पण भली लांब. ह्या म्हातार्‍या सरांना ३००-४०० मीटरचं अर्ध-पाऊण मैदान फिरवून पोरं त्यांना एका ठिकाणी नेतात.

पोरं : (भिंतीला पाडलेल्या एका भोकाकडे बोट दाखवीत) हा बघा आमचा शोध. इकडून पाहिलं की पलीकडच सगळं दिसतं...असं म्हणून पोरं पळून जातात...आणि मास्तर आपणच ह्यांना शोधाची आयडिया देऊन आपल्या पायावर कुर्‍हाड मारली म्हणून स्वत:लाच दोष देत निघून जातात.

21 April 2012

न थकण्याचं रहस्य…


हॉस्टलवर एक मुलगा कधीही बघावं तेव्हा अतिशय उत्साहात असतो. चेहर्‍यावर कधीच थकल्याचे भाव नसायचे.

पण एक दिवस त्याचा एक मित्र झोपलेला पाहून विचारती, “काय रे, तू तर कधीच थकत नाहीस ना. मग आता कसा काय झोपलाय?

मुलगा : न थकण्याचं तेच तर रहस्य आहे...

30 March 2012

पुन्हा शाळा??? नको रे बाबा...


दोन मित्र एकाच वर्गात दुसर्‍यांदा नापास होतात.

पहिला : काय कटकट आहे ही. चल आपण आत्महत्या करू.

दूसरा : नको रे बाबा. नाहीतर पुढच्या जन्मी पुन्हा जूनियर के.जी. पासून सुरुवात करावी लागेल.

10 October 2011

अपमान ssss

स्थापत्य अभियांत्रिकीच्या भूगर्भशास्राचा तास चालू असतो.

वर्गात प्रोफेसर बोर्डवर एक मोठा नकाशा लावून हातातील छडीने भारतात आढळणारे विविध खडकांचे प्रकार समजावून सांगत असतात.

एकजण नेहमीप्रमाणे पहिल्या बाकावर बसून झोपलेला असतो.

प्रोफेसर त्याला उठवतात आणि पुढे बोलावतात.

प्रोफेसर त्या मुलाकडे आपल्या हातातील छडीचे एक टॉक करून त्याला उद्देशून इतर मुलांना म्हणतात, "बघा, या छडीच्या एका टोकाकडे. तुम्हाला एक धोंडा दिसतोय ना."

खाली बसलेल्यांपैकी एक विद्यार्थी : कोणत्या टोकाकडे सर?

03 May 2011

दृष्टी

प्राध्यापक : दृष्टी कुणाची चांगली असते? माणसाची की प्राण्यांची?

विद्यार्थी : अर्थातच, प्राण्यांची.

प्राध्यापक : का?

विद्यार्थी : कारण, त्यांना तुमच्यासारखा चष्मा घालावा लागत नाही.



08 March 2011

झोपेचा वेळ





प्रोफेसर : तुम्हा विद्यार्थ्यांना दिवसाला कमीत कमी ७ तास झोप आवश्यक आहे.

विद्यार्थी : सर, हे कसं शक्य आहे? कॉलेज तर ६ तासांचं असतं.

01 November 2010

साठे सरांच्या घरी चोरी

साठे सरांच्या घरी चोरी होते. तक्रार देण्यासाठी ते पोलिस चौकीत जातात.

पोलिस निरीक्षक त्यांना विचारतात, "कधी झाली चोरी?"

साठे सर : १९५० ला

पोलिस निरीक्षक : १९५० ला? (टिंगल उडवीत) वा, आपण फारच लवकर आलात मग.

साठे सर : हो मग, आपण कुठल्याही कामाला अजिबात वेळ घालवत नाही. आता बघा १९५० ला चोरी झाली आणि आता २०१० ला तुमच्यासमोर आहे.
केवळ २० मिनिटांत आलो बघा इथे.

08 October 2010

बहिरा

जीवशास्राचे प्राध्यापक मोठ्या जोशात मुलांना शिकवत असतात.

ते मध्येच एका मुलाला एक प्रश्न विचारतात. बिचारा मुलगा गोंधळलेला असतो.

प्राध्यापक : ऐकू येत नाही अशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणाल?

मुलगा : सर, त्याला तुम्ही काहीही म्हणा. त्याला ऐकुच येणार नाही.

24 September 2010

भांडण

एकदा एका इतिहासाच्या प्राध्यापक आणि गणिताच्या प्राध्यापकांचे भांडण जुंपले.

इतिहासाचे प्राध्यापक : मी अख्ख औरंगजेबाचे सैन्य पाठवून तुम्हाला गाडून टाकीन.
 
गणिताचे प्राध्यापक : त्यापूर्वीच मी तुम्हाला कंसात टाकून अख्ख्या कंसाला शून्याने गुणीन.

16 August 2010

विसरभोळे साठे सर

साठे सर खूपच विसरभोळे होते. ते आपले घड्याळ नेहमी कोटाच्या डाव्या खिशात ठेवत असत. एकदा चुकून त्यांनी ते उजव्या खिशात ठेवले आणि वेळ पाहण्यासाठी म्हणून नेहमीप्रमाणे डाव्या खिशात हात घातला. घड्याळ मिळाले नाही. ते लगेच आपल्या एका विद्यार्थ्याला म्हणाले, ‘जा घरी जाऊन माझे घड्याळ घेऊन ये.’
आणि उजव्या खिशातून घड्याळ काढून घेत ते म्हणाले, ‘हे बघ आता १७-२० झालेत, बरोबर १७-४० पर्यन्त परत ये.’

प्राध्यापक साठे

प्राध्यापक साठे घाईघाईने वर्गात आले आणि पुस्तक उघडून त्यांनी विचारले, ‘तर मी काल कुठ आलो होतो ?’
‘इथच या वर्गात सर !’ एका मुलाने उत्तर दिले.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...