प्रोफेसर संक यांचं विज्ञानाचं लेक्चर चालू होतं.
दोन पोरं नेहमीप्रमाणे धिंगाणा घालताना सरांना सापडली.
प्रोफेसर : नालायकांनो, धिंगाणा घालायचाच असेल तर कॉलेजच्या बाहेर जाऊन घाला ना. काहीतरी शिकून मोठे व्हावयाचे म्हणून पाठवतात ना तुमचे आई-बाप इकडे? तुमच्या थोबाडाकडं बघून तरी वाटत नाही तुम्ही काहीतरी मोठं करून दाखवाल म्हणून.
आपले आई-बाप काढले म्हटल्यावर पोरं जाम उचकतात. ह्या मास्टरची टर कशी उडवायची ते ह्यांना माहीत असते.
पोरं सरांना म्हणतात, "ओ सर, तुम्ही आम्हाला "ढ" समजू नका. आम्ही ना आज एक शोध लावलाय."

प्रोफेसर : कोणता बरं? मास्तर शिकवीत असताना खिडकीतून बाहेर कसं बघायचं ते?
पोरं : नाही सर, पण भिंतीच्या त्या बाजूचं ह्या बाजूला उभं राहूनही आरपार बघता येतं आमच्या प्रयोगाने.
प्रोफेसर : अस्स...मग दाखवा बघू तुमचा प्रयोग.
पोरं : मग चला आमच्या बरोबर आपल्या कॉलेजच्या कंपाऊंडच्या भिंतीसमोर.
कॉलेजचं मैदान बरंच मोठं असल्याने कंपाऊंडची भिंत पण भली लांब. ह्या म्हातार्या सरांना ३००-४०० मीटरचं अर्ध-पाऊण मैदान फिरवून पोरं त्यांना एका ठिकाणी नेतात.
पोरं : (भिंतीला पाडलेल्या एका भोकाकडे बोट दाखवीत) हा बघा आमचा शोध. इकडून पाहिलं की पलीकडच सगळं दिसतं...असं म्हणून पोरं पळून जातात...आणि मास्तर आपणच ह्यांना शोधाची आयडिया देऊन आपल्या पायावर कुर्हाड मारली म्हणून स्वत:लाच दोष देत निघून जातात.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.