आजकालची पोरं फारच हुश्शार आहेत.
एकदा एका पोराला शाळा बदलावी लागली.
नवीन शाळेत गेल्यावर गुरुजींनी
विचारलं, “काय रे, गण्या ना तू?”
पोरगा : हो.
गुरुजी : तुला लिहिता-वाचता येतं का?
पोरगा : लिहिता येतं, पण वाचायला नाही
येत.
गुरुजी : मग या कागदावर तुझं नाव लिही
पाहू.
पोरगा काहीतरी लिहितो आणि गुरुजींना
दाखवतो.
गुरुजी कागदावरच वाचायचा प्रयत्न
करतात. शेवटी त्याला विचारतात, “हे काय आहे? वाचून दाखव पाहू.”
पोरगा : गुरुजी, मला फक्त लिहिता येतं.
वाचता येत नाही. मी अगोदरच सांगितलं होतं.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.