Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

17 October 2012

कल्पना करा...



संता : अरे, तू माझ्याकडून घेतलेले ६०००० रुपये कधी परत करणार आहेस?

बंता : हे तू मला का विचारतो आहेस? मी काय ज्योतिषी आहे का?

16 October 2012

सिगारेट...आवडती / नावडती


बायको : मला ना सिगारेटचा खूप तिरस्कार आहे. मी तिला हातही लावू शकत नाही.

नवरा : हो मीसुद्धा सिगारेटचा खूप तिरस्कार करतो. म्हणूनच मी सिगारेट पेटवून पुर्णपणे राख होईपर्यंत फुकून फुकून जाळतो.

15 October 2012

भिकार्‍याचं व्यावसायिक कौशल्य


एक भिकारी अगदी व्यावसायिकरित्या भीक मागत होता.
तो रेल्वेस्टेशनच्या बाहेर एक कटोरा घेऊन आणि एक बोर्ड लावून बसलेला होता.

त्या बोर्डवर लिहिले होते, “मी दिलेला शब्द पाळतो. कृपया मला जमेल तेवढी भीक द्यावी नाहीतर मी पुढच्या निवडणुकीत माझ्या सहकारी बांधवांसोबत कॉंग्रेसला मतदान करीन.”

12 October 2012

हॉटेलमालकाची माफी



एकदा वेटरच्या हातून चुकून एका ग्राहकाच्या शर्टवर चहा सांडला आणि त्यामुळे तो ग्राहक जाम चिडला.

मालकाने त्या वेटरला चांगलेच झापले.
तरीही तो ग्राहक काही शांत होईना. मग तो मालकावरही तशाच प्रकारे भडकला.
मालक आपले पुणेरी.

वेटरला त्यांनी शांतपणे बोलावून घेतलं.

वेटरला आपल्या तिरसट आणि करड्या आवाजात म्हणाले,हे बघ, हे फार मोठे शेठ आहेत. यापुढे ह्यांचा कुत्राजरी आपल्या हॉटेलात आला, तरी साक्षात हे साहेबच आलेत असं समजून ह्यांचा पाहुणचार करायचा. समजलं?

08 October 2012

खरा देशभक्त



पुण्यात एक नागपूरकर एका पुणेकराशी खरा देशभक्त कोण या विषयावर भांडत असतो.

तेवढ्यात तिथे नागपूरकरांच्या बाजूलाच राहणारे जोशीकाका येतात.
ते यांचं भांडण शांतपणे ऐकत असतात.

शेवटी नागपूरकर बोलता बोलता बोलून जातो की, “बरं बाबा तुम्ही पुणेकरच खरे देशभक्त. तुम्हालाच सगळ्या जगाची माहिती असते.”

आता आला का पुणेकराच्या इज्जतीचा सवाल?

जोशीकाका जरा पुढे होऊन म्हणतात,अहो साठे कशाला निष्कारण वाद घालताय? तुम्हाला काय बक्षीस मिळणारेय? खरे देशभक्त तर हे नागपूरकर आहेत. म्हणून तर सकाळी संडासात इंग्लिश टॉयलेट सीटवर ते मस्तपैकी आपली भारतीय बैठक मारून बसतात.

02 October 2012

सत्यवादी बेवडा



एकदा एका बेवड्याला एक हवालदार समजावत असतो की दारू पिण्याने संसार कसा उध्वस्त होतो ते.

पण बेवडा मात्र याच्या उलट दारू पिण्याने संसार कसा टिकतो ते हवालदाराला सांगत होता.

हवालदार : मला सांग, तुला बायको महत्वाची वाटते की दारू?
बेवडा : (एक क्षणही विचार न करता) दारू.

हवालदार : का?

बेवडा : कारण, जेव्हा बायको मला मारते, तेव्हा दारू पिलेला असल्यानेच मला लागत नाही. म्हणजे साहजिकच मी तिच्यावर हात उगारत नाही, रागवत नाही आणि आमचा संसार टिकून राहतो. आलं लक्षात?

हुशार नव्हे स्मार्ट...बंड्या...!!!


एका शाळेचे मुख्याध्यापक स्वत:ला खूप (अति) शहाणे समजत असत.

ते एकदा दहावी “अ”मध्ये येऊन मुलांना म्हणतात,मी आज तुमची परीक्षा घेणार आहे. बघूया कोण हुशार आहे तुमच्यापैकी.

बंड्याला उभं राहायला सांगून त्याला विचारतात, “मला सांग बंड्या, गाढवा, जर आपल्या शाळेसमोर बॉम्ब दिसला तर तू काय करशील?

बंड्या : मास्तर, मी जरा वेळ वाट बघीन. कुणी उचलून नेला तर ठीक, नाही तर तो उचलून मी तुमच्या केबिनमध्ये आणून ठेवीन.

01 October 2012

पुणेरी पाहुणचार

एकदा साठेंकडे एक दूरचा पाहुणा अचानक येतो. महाशय येतात, बसतात, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू होते. तेवढ्यात चहा येतो.

पाहुणा गरम गरम चहाचा एक मस्त फुरका मारतो.
तेवढ्यात साठे पाहुण्याला विचारतात, “काय हो उपवास वगैरे धरता की नाही?

पाहुणा : नाही हो. आपल्याला पोटभर दाबून जेवण लागतं. दिवसातून तीन वेळा.
साठे : बरं, बरं. आपण मांसाहारी की शाकाहारी?

पाहुणा मनातल्या मनात खुश होतो. त्याला वाटतं, आज मस्त मेजवानी मिळणार.

पटकन म्हणतो,म्हणजे काय? चिकन-कोंबडी हा तर आपला न धरलेल्या उपवासाचा फराळ आहे फराळ.

साठे : नाही. त्याचं काय आहे. हिने बनवलेल्या चहात माशी पडली होती. उगाच तुमचा उपवास मोडायला नको म्हणून विचारलं.

nOnStOp...


दोन बायकांना एका गुन्ह्यात १२ वर्षांचा तुरुंगवास होतो.

तुरुंगवास भोगून जेव्हा त्या जेलच्या बाहेर येतात,

तेव्हा
आपल्या घरी जाताना त्या म्हणतात, “चल, बाकी नंतर फोनवर बोलू.”

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...