Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label begger. Show all posts
Showing posts with label begger. Show all posts

30 August 2015

बस्स दोन मिनिटं

एकदा एक भिकारी त्याच्या लहान मुलाला घेऊन सोसायटीत भीक मागायला गेला.

भिकारी : (एका महिलेला) काहीतरी भीक द्या माई. दोन दिवसांपासून उपाशी आहे.

महिला : थांबा हं...दोन मिनिटात आलेच.

आणि ती महिला काहीतरी आणण्यासाठी घरात जाते.

भिकार्‍याचा लहान मुलगा : पप्पा, त्या काकू मॅगी आणायला तर गेल्या नसतील ना?


भिकारी : हो रे बाळा, असू शकतं. भागो...


19 July 2014

फुकटचा सल्ला जपून द्या.

एक माणूस रस्त्याने चाललेल्या भिकार्‍याला थांबवत विचारतो, “का रे, भीक का मागतोस? ही खूप वाईट गोष्ट आहे.”

भिकारी : साहेब, तुम्ही कधी भीक मागितली आहे का?

माणूस : नाही. का?


भिकारी : मग तुम्हाला कसं माहीत की ही वाईट गोष्ट आहे ते?

14 April 2013

हाजमोला...


एक भिकारी एका पुणेकराकडे भीक मागायला येतो.
भिकारी भलताच प्रामाणिक असतो.

भिकारी : साहेब, आपल्या शेजार्‍याने मला पोटभर जेवू घातलंय. तुम्हीही काहीतरी खाऊ घाला ना.

पुणेकर : हा घे, हाजमोला.

15 October 2012

भिकार्‍याचं व्यावसायिक कौशल्य


एक भिकारी अगदी व्यावसायिकरित्या भीक मागत होता.
तो रेल्वेस्टेशनच्या बाहेर एक कटोरा घेऊन आणि एक बोर्ड लावून बसलेला होता.

त्या बोर्डवर लिहिले होते, “मी दिलेला शब्द पाळतो. कृपया मला जमेल तेवढी भीक द्यावी नाहीतर मी पुढच्या निवडणुकीत माझ्या सहकारी बांधवांसोबत कॉंग्रेसला मतदान करीन.”

09 July 2011

लायकी बघून माग

भिकारी : साहेब, १ रुपया द्या ना. फक्त १ च रुपया.

साहेब : ए, माझी लायकी बघून तरी माग. १ रुपया काय मागतोस sss

भिकारी : १० रुपये द्या साहेब. १० रुपये द्या.

साहेब : अबे, जरा तुझी लायकी बघून माग की.

07 July 2011

खरा आंधळा भिकारी कसा ओळखावा


भिकारी : हे सुंदरी, या आंधळ्याला १ रुपया दे ना. उपाशी आहे दोन दिवसांपासून.


नवरा : देऊन टाक गं.

बायको : असं कसं देऊन टाक? पैसे काय झाडाला लागतात? आणि हे लोकं फक्त आंधळा असल्याची नाटकं करतात, माहितीये?

नवरा : नाही गं, ज्याअर्थी तो तुला सुंदरी म्हणाला; त्याअर्थी तो नक्कीच आंधळा आहे. देऊन टाक.

06 July 2011

च्यामारी...


एकदा काय होतं, बसस्टॉपवर बरेच लोक बसची वाट पहात उभे असतात.
वरून पाऊस धो-धो कोसळत असतो.

तेवढ्यात एक भिकारी तुमच्याकडे येतो आणि हातापाया पडू लागतो.

तुम्ही त्याला खूप दया दाखवून भीक म्हणून १० रुपयांची नोट देता.

आजूबाजूचे लोक तुमच्याकडे बघू लागतात. तुम्ही कॉलर टाईट करून पुन्हा ताटकळत बसची वाट बघत 
उभे राहता.

तेवढ्यात तो भिकारी एका टॅक्सीला आवाज देतो,

आणि

आणि काय,

तो टॅक्सीत बसून निघून जातो...तुमचा पोपट करून.

हे लक्षात ठेवा


एक व्यक्ती : साहेब, १० रुपये द्या. माझं गाव खूप लांब आहे. गावाला जायचंय अर्जंट, पोरगा आजारी आहे. माझ्याकडे बिलकुल पैसे नाहीयेत.

पुणेकर : अच्छा कुठे आहे तुझं गाव?

व्यक्ती : सातारा.

पुणेकर : अरे मग १० रुपयांनी काय होणार? तुला जास्त पैसे लागतील.

व्यक्ती : (हा वेडा फसल्याचं पाहून मनातल्या मनात खुश होतो.) हो, हो.

पुणेकर : बरं, ठीक आहे. (शंभराची नोट दाखवून) एक पन्नास आहे?

व्यक्ती : हो, हो, आहे की.

पुणेकर : ए हुकलेल्या, मग जा की गप का शंभर देऊ ठेवून कानाखाली.

03 May 2011

वरदान



बेंजोचा व्यवसाय असणारा एक व्यावसायिक डी.जे आल्याने तोट्यात गेलेला असतो. 
मग तो एक दिवस शंकराच्या देवळात जातो आणि म्हणतो, "देवा माझा बेंजोचा व्यवसाय पार बुडाला बघ. मला डी.जे. दे, देवा."

देव : अरे मूर्खा, माझ्याकडे डी.जे असता, तर मी डमरू घेऊन कशाला फिरलो असतो?

24 March 2011

बहिणीची माया




मल्लिका शेरावत एका चित्रपटाच्या शूटिंगला जात असते.

तेवढ्यात एक भिकारी येऊन म्हणतो, “बहेनजी, १० रुपया दे दो इस गरीब को। भुखा हूं दो दिन से।”

मल्लिका : ये लो। (असं म्हणून ती त्याच्या हातात १०० रुपयांची नोट टेकवते.)

सचिव : अहो मॅडम, तो फक्त दहा रुपयेच मागत होता. त्याला १०० ची नोट का दिली?

मल्लिका : कारण, आज मला पहिल्यांदा कुणीतरी बहीण म्हणलं.

23 March 2011

एक भिकारी SMS








जसं १-२ मच्छर मारून तुम्ही होत नाही शिकारी,

तसंच १-२ SMS करून तुम्ही होत नाही भिकारी.

22 March 2011

विद्येसाठी...

गुरुजी : बंड्या, तू शाळेत कशासाठी येतोस?

बंड्या : विद्येसाठी.

गुरुजी : मग मूर्खा झोपतो का आहेस?

बंड्या : ती आज आली नाही ना म्हणून.

21 March 2011

याला कंजूष म्हणावं की भिकारी

भिकारी : साहेब, १ रुपया द्या हो. तीन दिवस झाले, उपाशी आहे.

मारवाडी : (हळूच) मी तुला १ नाही १० रुपये देतो. पण मला एक गोष्ट सांग.

भिकारी : कोणती?

मारवाडी : १ रुपयात जेवण कुठं मिळतं?

20 March 2011

अभिमान आहे भिकारी असल्याचा...

दोन मुलांमधलं संभाषन.

पहिला : तुझे पप्पा काय करतात रे?

दूसरा : ते सगळ्यांना आशीर्वाद देतात.

पहिला : ते काय देव आहेत का?

दूसरा : नाही ते भिकारी आहेत.

भिकार्‍याचा आशीर्वाद

एका घरात नवरा-बायकोची जोरदार भांडणं चालू असतात.

जरा कुठे शांतता झालेली असते की भिकारी दारात येतो.

भिकारी : ताई, रोज १ रुपयांचं दान करत जा मला. तुझं सौभाग्य १०० वर्षे राहील.

बाई : मुडदया, रोग बसला नेऊन तुझ्यावर. तुला तर आता फुटकी कवडी पण मिळणार नाय. चल फुट.

03 January 2011

आयटी इंजिनियर आणि भिकारी

आयटी इंजिनियर आणि भिकारी या दोघांचा व्यवसाय / नोकरी तशी वेगळी.


पण तरीही त्यांच्यात एक साम्य आहे.


जेव्हा दोन आयटी इंजिनियर आणि दोन भिकारी एकमेकांना भेटतात, तेव्हा ते एकमेकांना विचारतात.








"तू सध्या कोणत्या "प्लॅटफॉर्म"वर काम करतो आहेस?"

19 December 2010

अल्ला के नाम पे !!!

एका भिकार्‍याला १ रुपयाची भीक मिळते.

त्याला प्रश्न पडतो आता १ रुपयात कसं काय भागणार म्हणून.

तो मग १ रुपया कोईन बॉक्समध्ये टाकतो आणि फोन लावतो एका हॉटेलात.
मस्तपैकी ऑर्डर देतो...५ रोटया, १ चिकनहंडी, १ राईस प्लेट, २ आईसक्रीम.

पलीकडून ऑर्डर घेणारा विचारतो, "ठीक आहे साहेब, पण हे सगळं कोणाच्या नावावर पाठवू?"

भिकारी : अल्ला के नाम पे !!!

18 December 2010

वजन १ रुपयात

भिकारी : अहो साहेब, एक रुपया द्या ना...एकच रुपया फक्त.

साहेब : काय रे, तीन दिवसांपासून उपाशी आहेस ना. मग फक्त एका रुपयाचं तू काय करणार?





भिकारी : काय करणार म्हणजे काय साहेब...वजन करणार साहेब, किती कमी झालय.

16 December 2010

भीक मागण्यात लाज कसली

भिकारी : साहेब, एक रुपया द्या ना साहेब, द्या ना.

साहेब : काय रे, तुला लाज नाही वाटत अशी रस्त्याच्या मध्ये उभं राहून भीक मागला? नालायक कुठला.

भिकारी : साहेब, मग काय तुमच्या एक रूपयासाठी ऑफिस खोलू?

11 October 2010

काहीच नाही

भिकारी : साहेब, एक रुपया द्या की.
साहेब : नाहीयेत, पुढे जा.
भिकारी : साहेब, मग एक भाकरीचा तुकडा द्या ना.
साहेब : ए बाबा, सांगितलं ना एकदा नाही म्हणून.










भिकारी : साहेब, मग एक वाडगा हातात घ्या, आणि चला माझ्याबरोबर.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...