एक व्यक्ती : साहेब, १० रुपये द्या. माझं गाव खूप लांब आहे. गावाला जायचंय अर्जंट, पोरगा आजारी आहे. माझ्याकडे बिलकुल पैसे नाहीयेत.
पुणेकर : अच्छा कुठे आहे तुझं गाव?
व्यक्ती : सातारा.
पुणेकर : अरे मग १० रुपयांनी काय होणार? तुला जास्त पैसे लागतील.
व्यक्ती : (हा वेडा फसल्याचं पाहून मनातल्या मनात खुश होतो.) हो, हो.
पुणेकर : बरं, ठीक आहे. (शंभराची नोट दाखवून) एक पन्नास आहे?
व्यक्ती : हो, हो, आहे की.
पुणेकर : ए हुकलेल्या, मग जा की गप का शंभर देऊ ठेवून कानाखाली.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.