Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

31 July 2011

वाढदिवसाची भेट

बायको : अहो, आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला काय भेट द्यावी तेच कळत नाहीये.

नवरा : का बरं ? ही भेट तुझ्या आवडीची देणार आहेस की माझ्या आवडीची?

बायको : अर्थातच तुमच्या आवडीची. तुमचा वाढदिवस आहे ना आज.

नवरा : मग घटस्फोट दे की.


30 July 2011

संताचा निष्कर्ष

संताला संशोधक म्हणून नोकरी मिळते.

कुठलीही गोष्ट घडली की त्यातून काही ना काही निष्कर्ष काढून हा मोकळा होत असे.

एकदा तो खडकवासला धरणाच्या चौपाटीवर फिरायला गेलेला असतो. त्याचवेळी तिथे एक घटना घडते.

एक व्यक्ती पाण्यात उडी मारते, पण बराच वेळ झाला तरी बाहेर काही येत नाही.
मग दोन व्यक्ती उड्या मारतात, पण त्याही बाहेर येत नाहीत.

यावरून संता असा निष्कर्ष काढतो की, माणूस पाण्यात विरघळतो.



चंद्रावर आता फक्त दारूचाच शोध लावायचा बाकी राहिलाय

दोन दारूड्यांमधलं हे संभाषन :

पहिला : अरे तू काल संध्याकाळी सातच्या बातम्या ऐकल्या का?

दूसरा : नाही. काय विशेष?

पहिला : काल संशोधकांनी चंद्रावर पाणी आणि बर्फ सापडल्याचं जाहीर केलं

दूसरा : वा, वा, वा !!! म्हणजे आता आपल्याला फक्त व्हिस्कीच घेऊन जावं लागणार.



29 July 2011

दूरचा नातेवाईक

पोलीस रात्रीच्या गस्तीवर असताना संशयावरून एकाला पकडतात.

दुसर्‍या दिवशी चौकशीसाठी त्याच्या भावाला चौकीवर बोलावून घेतात.

पोलीस : हा तुझा कोण आहे?

आरोपीचा भाऊ : तो माझा दूरचा नातेवाईक आहे.

पोलीस : काय नातं आहे तुझं त्याच्याशी?

आरोपीचा भाऊ : तो माझा सख्खा भाऊ आहे?

पोलीस : (दरडावून) मग दूरचा नातेवाईक काय म्हणतोस?

आरोपीचा भाऊ : अहो म्हणजे, त्याच्या आणि माझ्यात सहा भावांचं अंतर आहे ना म्हणून.



28 July 2011

मुलाचं भविष्य





शिक्षक : (पालकांना) तुमचा मुलगा मोठा झाल्यावर डॉक्टर होणार असं दिसतंय.

पालक : कशावरून?

शिक्षक : त्याच्या हस्ताक्षरावरून.

27 July 2011

मी वाघ आहे वाघ...

दोन मित्रांमधील संभाषण :

पहिला : काय रे, तू ऑफिसमध्ये मोठा वाघ बनून फिरत असतोस. घरात काय असतोस?

दूसरा : मी घरातही वाघच असतो. फक्त फरक एवढाच असतो, की आता त्या वाघावर दुर्गा स्वार झालेली असते.


पुण्यातील लॉज

एकजण बाहेरून पुण्यात काही कामानिमित्त येतो. इथं राहायची व्यवस्था नसल्यानं तो हॉटेलवर राहायचं ठरवतो.
तो एका नामांकित हॉटेलात जातो.

मालकाची नुकतीच दुसर्‍या एका ग्राहकाशी काही कारणावरून (पुणेरी नियमांचं उल्लंघन केल्यावरून) बाचाबाची झालेली असते, त्यात १ वाजलेले म्हणजे जेवणाची वेळ झालेली.

ग्राहक : मला तुमच्याइथे एक खोली मिळेल?

मालक : (तिरसटपणे) तुमच्याइथे म्हणजे कुठे? आमच्या घरी???

ग्राहक : अहो, तुमच्या हॉटेलात आणि ४ थ्या, ५ व्या मजल्यावर असेल तर उत्तमच.

मालक : मिळेल की, पण कशाला पाहिजे? राहायला की उडी मारून जीव द्यायला?

ग्राहक : (भांबावून गेल्याने) बरं, एक पाण्याचा ग्लास मिळेल?

मालक : आमच्याकडे ग्लास पाण्याचा नसतो, काचेचा असतो, देऊ का?


26 July 2011

पुणेरी कंडक्टर

एक माणूस पुण्यात बसने प्रवास करत असतो.

प्रवासी : (वाहकास) अहो, मी बसमध्ये सिगारेट ओढू शकतो का?

वाहक : नाही.

प्रवासी : (एका व्यक्तीकडे बोट दाखवून) तो बघा, तो तर ओढतोय की?

वाहक : ओढत असेल, मग??? त्याने मला विचारलेलं नाहीये.




25 July 2011

फुलासारखी लेक

नवरा : ए, उठ लवकर. सकाळचे आठ वाजलेत. (असं म्हणून बायकोच्या तोंडावर १ ग्लास पाणी ओततो.)

बायको : हे काय हो. रोज रोज तोंडावर पाणी टाकून काय उठवताय?

नवरा : त्याचं काय आहे, आपलं लग्न झालं ना त्यावेळी तुझी आईच म्हणाली होती मला की, "माझी लेक किनई फुलासारखी आहे. तिला कधी कोमेजून देऊ नका."




लग्नाची तयारी

एकदा उंदीर हत्तीकडे येतो आणि त्याला विनंती करतो, "हत्तीदादा, हत्तीदादा, मला तुझी लुंगी दोन दिवसासाठी देशील का?"

हत्तीदादा : का रे ?

उंदीर : अरे, माझ्या मुलाचं लग्न आहे परवा, तेव्हा मंडप टाकावा म्हणतोय.

23 July 2011

टपालखात्याची घोषणा



टपालखात्याने महात्मा सुरेश कलमाडी आणि किंग ए. राजा तसेच महाराणी कनिमोळी यांची टपाल तिकिटे नुकतीच प्रकाशित केली.

परंतु, सर्व नागरिक ही तिकिटे पाहून संभ्रमात आहेत, की ती पत्रावर चिकटविण्यासाठी थुंकी नेमक्या कोणत्या बाजूने लावायची.



एक बातमी : सध्या (कु)प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या महात्मा आणि राजा-राणीच्या महान(?) कार्यांकडे पाहता टपालखाते याबाबत खुलासा करण्यास टाळाटाळ करीत आहे.





चोरों का राजा...



राष्ट्रकुल घोटाळा झाल्यावर सुरेश कलमाडी पुण्यातून रात्री फेरफटका मारत होते.

त्यांना एका अतिशय कुप्रसिद्ध चोर, लुटारूने अडवले.
त्याने मात्र कलमाडींना ओळखलंच नाही.

चोर : चल ए, काय असेल नसेल सगळे पैसे काढून दे गपचूप. चल चल...

कलमाडी : अहो महाशय, तुम्हाला माहितीये का मी कोण आहे ते?

चोर : मला नाही माहीत. पण त्याच्याशी काय करायचंय मला? गपचूप पैसे काढ.

कलमाडी : मी सुरेश कलमाडी आहे.

चोर : ठीक आहे, ठीक आहे. मला फक्त माझे तरी पैसे द्या.




भाकीत (?)

१३ जुलै, २०११ ला मुंबईत खाऊगल्ली, झवेरी बाजार आणि ओपेरा हाऊस इथे जे बॉम्बस्फोट झाले, त्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान झरदारी आणि आपले भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यामध्ये झालेलं हे संभाषन.

झरदारी : हॅलो, नमस्कार मनमोहनसिंगजी. मुंबईत आत्ताच खाऊगल्ली, झवेरी बाजार आणि ओपेरा हाऊस इथे जे बॉम्बस्फोट झाले, त्याबद्दल मला खूप दु:ख वाटते. अनेक निरपराध माणसे यात नाहक मारली गेली आणि वित्तहानीसुद्धा झाली. पण मला इथे आवर्जून एक खुलासा करावासा वाटतोय तो म्हणजे, याहीवेळी तुमची संशयाची सुई आमच्याकडे असेल; परंतु आमचा मात्र याच्याशी काहीही संबंध नाहीये.

मनमोहनसिंग : अहो, कसले बॉम्बस्फोट? कसली वित्तहानी? कसला खुलासा?

झरदारी : (डोकं खाजवत, गडबडून) तुमच्या घड्याळात किती वाजलेत?

मनमोहनसिंग : ६ वाजून १५ मिनिटे.

झरदारी : अरे देवा...माझ्या घड्याळात ६ वाजून ४५ मिनिटे झालेली आहेत. आमचं घड्याळ तुमच्यापेक्षा ३० मिनिटे लवकर आहे, हे मी विसरलोच होतो. माफ करा हं ! त्यामुळेच मी तुम्हाला चुकून अर्धा तास अगोदर फोन केला.



22 July 2011

खोड मोडली

सदाशिव पेठेत राहणार्‍या एका पुणेकराला एका रिक्षाचालकाकडून वाईट अनुभव येतो. जादा पैसे मागणार्‍या ह्याची जमल्यास खोड मोडायची म्हणून तो या रिक्षावाल्याचा चेहरा आणि रिक्षाचा नंबर लक्षात ठेवतो.

काही दिवसांनी हे पुणेकर आपल्या कुटुंबासमवेत फिरायला बाहेरगावी जात असतात.
पुणे स्टेशनपर्यंत रिक्षानेच जावे म्हणून हे रिक्षाला हाक मारतात. तर हा नडलेला रिक्षावालाच समोर येतो.

पुणेकर : दशभुजा गणपतीला जाणार का?

रिक्षावाला : हो, जाणार ना. बसा की.

पुणेकर : मग येताना माझ्यासाठी प्रसाद घेऊन या.

असं म्हणून ते स्मितहास्य करत दुसर्‍या रिक्षात बसून निघून जातात.



21 July 2011

वा रे डॉक्टर...

रुग्ण : डॉक्टर, मला सर्दी झाली आहे. काहीतरी औषध द्या.

डॉक्टर : एक काम करा, घरी जा. थंड पाण्याने आंघोळ करा आणि अंग न पुसताच झोपी जा.

रुग्ण : अहो, तसं केलं तर न्यूमोनिया होईल ना मला.

डॉक्टर : हो. मी तेच तर सांगतोय तुम्हाला. मला न्यूमोनियावर औषध माहीत आहे, सर्दीवर नाही; म्हणूनच तर.



20 July 2011

लय शहाणा...




पुण्यातील सदाशिव पेठेत राहणार्‍या एका पुणेकरासोबत नागपूरकराची काही कारणावरून बाचाबाची होते.

नागपुर्‍या : अहो, तुम्हाला माहीत नाही...मी उडत्या पक्षांचे पाय मोजणारा माणूस आहे.

पुणेकर : ए येडया...मग त्यात काय एवढं? शेंबड्या पोरालाही माहीत असतं की पक्षाला दोनच पाय असतात ते.




19 July 2011

देवाचंच अपहरण

एक छोटा मुलगा एका चित्रपटात पाहतो की, त्यातल्या एका लहान मुलाला काही गुंड पळवून नेतात आणि त्याच्या आई-वडिलांना पैसे मागतात. मग आई-वडील पैसे देऊन आपल्या मुलाची सुटका करून घेतात.

हा पण मग अशीच भन्नाट युक्ती वापरुन सायकल मिळवायची असं ठरवतो.

तो शंकराच्या देवळात जातो आणि प्रार्थना करतो, "हे महादेवा, मला एक सायकल दे."

तो १ दिवस वाट पाहतो, पण सायकल काही मिळत नाही. मग दुसर्‍या दिवशी पुन्हा देवळात जातो.

आता मात्र तो देवळातली गणपतीची मूर्ती उचलून घेऊन घरी येतो.

देवळातून बाहेर पडण्यापूर्वी मात्र तो एक चिठ्ठी शंकराच्या पुढे ठेवून येतो.

ती अशी...

"जर तुला तुझा मुलगा सुरक्षित हवा असेल, तर उद्या सायकल घेऊन देवळाच्या मागे ये."

17 July 2011

बदला

एक मुंगी रिक्षाने प्रवास करत असते.

रिक्षावाला : मॅडम तुमचा पाय आतमध्ये घ्या.

मुंगी : नाही हो. मला जर रस्त्यात हत्ती भेटला ना, तर एक जोरदार लाथ घालायची आहे त्याच्या केपटात; काल मला डोळा मारून गेला तो.

15 July 2011

मिळतेजुळते शब्द





शिक्षक : मुलांनो मी आता जे शब्द सांगतो आहे, त्याच्याशी मिळतेजुळते तीन शब्द सांगा पाहू. आयकर, विक्रीकर,   भूमिकर.

बंडू : सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर.



14 July 2011

काळजी करण्याचं काही कारण नाही...


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश जेव्हा भारताला भेट देतात, त्यावेळी आपले पंतप्रधान मा.वाजपेयी यांच्याशी आंतरराष्ट्रीय दहशतवाद या गहन प्रश्नावर चर्चा करत असतात.

जिथे बॉम्बस्फोट झाले अशा ठिकाणी मुंबईच्या रस्त्यावरून पाहणी करत फिरत असतानाही ही चर्चा चालूच असते.

बुश : आम्हालाही माहीत आहे, की हा दहशतवाद पाकिस्तान पोसत असून त्यांचाही यात फार मोठा हात आहे. पण आंतरराष्ट्रीय दबाव असल्याने अगदीच थेट कारवाई करण्यासाठी विचार करावा लागतो.

वाजपेयी : त्यात काय एवढं, ते पाकिस्तानी आहेत तरी किती...फार फार तर १४-१५-२० कोटी. जगातले एवढे लोक मारले तरी त्याची कुणाला पर्वा वाटण्याचं कारण नाही.

बुश : असं कसं म्हणता येईल? आजकाल अगदी सामान्य माणूसही लगेच पेटून उठतो अशा कृत्यांविरुद्ध.

रस्त्याने जाणार्‍या एका चहावाल्याला वाजपेयी हाक मारतात. त्याच्याकडून दोन कटींग घेतात.

वाजपेयी : (चहावाल्याला) हे बघ हे मि. बुश. अमेरिकेचे अध्यक्ष. आपल्याकडे आलेत परवा ते बॉम्बस्फोट झाले ना त्याची पाहणी करायला. आता आम्ही ३ र्‍या महायुद्धाची तयारी करत आहोत. १५-२० कोटी पाकिस्तानी आणि एक सायकलवाला मारण्याचा विचार सुरू आहे.

चहावाला : (आश्चर्याने) एक सायकलवाला?

वाजपेयी लगेच बुश यांना म्हणतात, पाहिलंत? मी म्हणालो होतो ना, ह्या पाकिस्तान्यांची काळजी करत नाही कुणी.





दिल टुट जाता है

मुलगा : तू माझ्या तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील की हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील?

मुलगी : तू माझ्या तुटलेल्या चप्पलने मार खाशील की चप्पल तुटेपर्यंत मार खाशील?



13 July 2011

शाळेला सुट्टी




बंड्याचे आजोबा त्याच्या शाळेत बंड्याला भेटायला जातात.

आजोबा : (शिक्षकांना) जरा बंड्याला बोलवता का?

शिक्षक : अहो, तो तर आज तुमच्या दहाव्याला गेला आहे.

भांडणानंतरचं पती-पत्नीतील प्रेम

एकदा नवरा बायकोची जोरदार चकमक होते.
नवरा घायाळ होऊन निघून जातो.

पण शेवटी नवराच तो. त्याला बायकोची दया येते.
संध्याकाळी तो बायकोला फोन करतो.

नवरा : अगं, आज जेवणात काय मेनू बनवते आहेस?

बायको : विष.

नवरा : चालेल. हो, पण आज मला घरी यायला उशीर होईल. तेव्हा तू ते पिऊन झोपी जा. वाट नको बघूस माझी.

12 July 2011

सेल लागलाय

बायको : अहो, चला ना बाजारात जाऊया. एक साडी आणायची आहे.

नवरा : आता साडी कशाला? एवढ्या आहेत ना?

बायको : तसं नाही. काल तुम्हीच तर म्हणत होतात ना की, "तुझ्याजवळ रुमाल नाहीये." आज बघा वर्तमानपत्रात एक सेलची जाहिरात आहे. "एका साडीवर एक रुमाल अगदी मोफत."



जरा हटके, जरा बचके



एका मुलीचं लग्न ठरतं.

पण सगळ्या मैत्रिणी तिला एक गोष्ट विचारतात ती म्हणजे, "त्या मुलाचे दात कित्ती पुढे आलेले आहेत !!! तो हसताना एवढा विचित्र दिसतो तरी तू त्याच्याशी का लग्न करते आहेस?"

मुलगी : असू देत की. मी लग्नानंतर त्याला थोडंच हसून देणार आहे?



वा रे पोलीस...

एका पोलीसाच्या घरात चोर शिरतात.

त्याच्या बायकोला याची चाहूल लागते.

बायको : अहो, उठा. उठा की. चोर शिरलेत घरात.

पोलीस : च्यायला, गप ए. मी आत्ता ड्युटीवर नाहीये.

11 July 2011

जरा ऐका यांचंही...

एक बाई दुकानात जाते आणि म्हणते, "तुमच्याकडे Fair & Handsome क्रीम आहे का?"




दुकानदार : हो, हो, आहे की.




बाई : अहो, मग रोज थोडीशी लावत जा की स्वत:च्या तोंडाला. आमची मुलं तुमच्या काळ्या तोंडाला घाबरून येत नाहीत दुकानात.

10 July 2011

भारताची तंत्रज्ञानातील झेप

आपल्याकडे आहे त्या तंत्रज्ञानाचीही मोडतोड करून पुन्हा तेच तंत्रज्ञान वेगळ्याप्रकारे, चित्र-विचित्रपद्धतीने जो वापरात आणतो, त्यालाच कदाचित "भारतीय" म्हटले जात असावे...काहीही असो, सुधारणार नाही आम्ही...आम्ही लय भारी ना !!!

किसका फॅन कौन?

राबडीदेवीचा मृत्यू होतो आणि त्या यमसदनी जाताच तेथे त्या पाहतात की तेथे भिंतींवर खूप घड्याळे लावलेली असतात.

एवढी घड्याळे पाहून आपण यमसदनीच आलोय की घड्याळाच्या दुकानात असा त्यांना प्रश्न पडतो.

राबडीदेवी : अहो यमराज, ही कसली घड्याळे आहेत?

यमराज : ही घड्याळे मायावी आहेत. पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसासाठी आमच्याकडे एक घड्याळ याठिकाणी आहे. तो तो मनुष्य जेवढ्या वेळा खोटं बोलेल, तेवढ्या वेळा या घड्याळाचे काटे फिरतात.

राबडीदेवी : (एका घड्याळाकडे बोट दाखवून) हे कुणाचं घड्याळ आहे?

यमराज : गौतम बुद्धांचं. ते आयुष्यात कधीही खोटं बोलले नाहीत म्हणून त्यांच्या घड्याळावरचे काटे आजपर्यंत कधीच फिरले नाहीत.

राबडीदेवी : (दुसर्‍या एका घड्याळाकडे बोट दाखवून) आणि हे कुणाचं घड्याळ आहे?

यमराज : हे आहे अब्राहम लिंकन यांचं. ते आयुष्यात केवळ दोनदा खोटं बोलले म्हणून त्यांच्या घड्याळाचे काटे केवळ दोनदाच फिरलेत.

राबडीदेवी : अय्या, गंमतच आहे. (जिज्ञासेने) मग आमच्या लालूंचं घड्याळ कुठे आहे?

यमराज : हा हा हा. ते माझ्या शयनकक्षात आहे. मी त्याचा “सीलिंग फॅन” म्हणून वापर करतो.

09 July 2011

कौतुक





नवरा रोज डाराडूर झोपणार्‍या आपल्या बायकोला तोंडावर ग्लासभर पाणी ओतून उठवत असतो.

बायको : हे काय हो. जरा झोपू द्या की. तोंडावर एवढं पाणी ओतून उठवायची काय गरज आहे?

नवरा : अगं आपलं लग्न झालं ना, त्यावेळी तुझीच आई मला म्हणाली होती की ,"माझी मुलगी अगदी गुलाबाच्या फुलासारखी आहे, तिला कोमेजून देऊ नका," म्हणून.

अशक्य गोष्ट

एक नागपूरकर आमच्या पुणेरी मित्राशेजारी राहत असतात.

स्वत:ला टक्कल असल्याने ते खूप हुशार समजत असतात.

असेच ते एक दिवस बढाई मारत असतात.

नागपूरकर : अहो तुम्हाला सांगतो, माझं खूप वजन आहे. मला कुठलीही गोष्ट अशक्य नाही.

पुणेकर : एक गोष्ट अशक्य आहे.

नागपूरकर : कोणती?

पुणेकर : तुम्हाला केसांचा भांग पाडता येत नाही.



मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...