Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label funny pictures. Show all posts
Showing posts with label funny pictures. Show all posts

12 April 2012

जरा शहाणे व्हा...

बंड्या : पप्पा, पप्पा, कार बनवायला काय काय लागतं?

पप्पा : (वैतागून) बंड्या, मी तुझ्या सारख्या सारख्या प्रश्न विचारण्याने हैराण झालोय. तुला माहिती आहे का, जर हाच प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारला असता तर काय झालं असतं?

बंड्या : हो माहितीये. किमान म्हणून तरी तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं देता आली असती.

05 April 2012

दृष्टीकोन


एकदा एका भव्य चित्रकला स्पर्धेसाठी विख्यात चित्रकारांना राज्या-राज्यांतून आमंत्रित केलं जातं.

जिंकणार्‍या चित्रकाराला एक लाखाचं बक्षीस देण्यात येणार असतं.

एक गावचा शाळकरी पोरगा या स्पर्धेत भाग घेतो.

त्याची आधीची चित्रे पाहून स्पर्धेचे आयोजक त्याची टर उडवतात.

पण हा मुलगा अतिशय विनवणी करत असल्याने आयोजक त्याला लगेच तिथेच एक चित्र काढायला सांगतात. हे चित्र बघून काय तो निर्णय घेण्यात येईल म्हणूनही सांगतात.

मुलगा काय ते ओळखून घेतो.

मग त्यालाही ह्याची फिरकी घ्यायची लहर येते.

तो एक गोल काढून त्यात एक बिंदु काढतो.

आयोजक : अरे हट... हे काय चित्र आहे का? ह्या चित्राचा अर्थ काय?

मुलगा : हा माझा Point of View (म्हणजे दृष्टीकोन) आहे.

10 July 2011

भारताची तंत्रज्ञानातील झेप

आपल्याकडे आहे त्या तंत्रज्ञानाचीही मोडतोड करून पुन्हा तेच तंत्रज्ञान वेगळ्याप्रकारे, चित्र-विचित्रपद्धतीने जो वापरात आणतो, त्यालाच कदाचित "भारतीय" म्हटले जात असावे...काहीही असो, सुधारणार नाही आम्ही...आम्ही लय भारी ना !!!

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...