एकदा एका भव्य चित्रकला स्पर्धेसाठी विख्यात चित्रकारांना राज्या-राज्यांतून आमंत्रित केलं जातं.
जिंकणार्या चित्रकाराला एक लाखाचं बक्षीस देण्यात येणार असतं.
एक गावचा शाळकरी पोरगा या स्पर्धेत भाग घेतो.
त्याची आधीची चित्रे पाहून स्पर्धेचे आयोजक त्याची टर उडवतात.
पण हा मुलगा अतिशय विनवणी करत असल्याने आयोजक त्याला लगेच तिथेच एक चित्र काढायला सांगतात. हे चित्र बघून काय तो निर्णय घेण्यात येईल म्हणूनही सांगतात.
मुलगा काय ते ओळखून घेतो.
मग त्यालाही ह्याची फिरकी घ्यायची लहर येते.
तो एक गोल काढून त्यात एक बिंदु काढतो.
आयोजक : अरे हट... हे काय चित्र आहे का? ह्या चित्राचा अर्थ काय?
मुलगा : हा माझा Point of View (म्हणजे दृष्टीकोन) आहे.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.