Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

31 December 2010

Don't Use Mobile Phone

सरदार आपल्या गाडीत पेट्रोल भरायला पंपावर गेला.

तिथे लिहिलं होतं - इथे मोबाईल फोन वापरू नये.

सरदारजीने लगेच आपला मोबाईल काढला आणि सगळ्या मित्रांना सांगितलं, "मला आता इथे फोन करू नका."

खरेदी

ग्राहक : मला शर्टाच चांगलं कापड दाखवा.

दुकानदार : प्लेनमध्ये दाखवू का?

ग्राहक : काय राव, एवढ्यासाठी विमानात जायची काय गरज आहे.

30 December 2010

खराब रेडियो

एका सरदारजीचा रेडियो खराब होतो.

सरदारजी मग रेडियो खोलतो.
त्यात त्याला एक मेलेला उंदीर सापडतो.


सरदार रागाने म्हणतो, "घ्या, कसा काय चालेल हा रेडियो, गाणाराच मेल्यावर"

संधी

मला सांगा, लग्नसमारंभाच्यावेळी नवरदेवाला घोड्यावर का बसवले जाते?




काही माहिती आहे का आपल्याला याबद्दल?





कारण, नवरदेवाला एक शेवटची संधी दिली जाते पळून जाण्याची...

29 December 2010

पठाण आणि गाढव

पठाण आणि गाढवामध्ये कोणत्या दोन गोष्टी सारख्या आहेत?





सांगा पाहू...








१ ली गोष्ट म्हणजे - दोघे लहानपणी सुंदर असतात दिसायला.

आणि

२ री गोष्ट म्हणजे - मोठेपणी दोघेही ट्रान्सपोर्टचा बिझनेस करतात.

घर म्हणजे काय?

पत्नी : अहो, आज तुम्ही अचानक लवकर घरी कसे आलात?



पती : त्याचं काय झालं, आज माझं माझ्या बॉसबरोबर जोराचं भांडण झालं.
          तो वैतागून मला म्हणाला जा नरकात (Go to HELL) म्हणून.
          म्हणून मग मी घरी आलो.

28 December 2010

थोडं थांबा

एकदा लालूजी विमानतळातून बाहेर येत होते.

तेवढ्यात सुरक्षारक्षाकाने त्यांना थांबवित म्हटले, "Wait please."

लालूजी मात्र "८५ किलो ," असे म्हणून पुढे चालते झाले.

27 December 2010

कारट कोणाचं

सरदारजीच्या मुलाला शाळेतील गुरुजी तो गोंधळ घालत असल्याने चांगलच बडवतात.

मुलगा रडत रडत घरी येतो.

सरदारजी : घाबरू नकोस ! तू एका वाघाचा सुपुत्र आहेस.

मुलगा : हो पापा, गुरुजीसुद्धा हेच म्हणत  होते की हे कुठल्यातरी जनावराचच कारट असणार.

26 December 2010

जन्म भारतात की अमेरिकेत

संता : बरं झालं बाबा मी भारतातच जन्माला आलो, तिकडे अमेरिकेत नाही.

बंता : का रे, अमेरिकेत जर तुझा जन्म झाला असता तरी त्याने असा काय फरक पडला असता?

संता : तू पण ना बावळटच आहेस. अरे बाबा, मला इंग्लिश कुठे येतं.

24 December 2010

पंतप्रधान व्हायचं आहे?

जर तुम्ही चोर असाल,

दरोडेखोर असाल,

गुंड असाल,

मवाली असाल,

तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.





तुम्ही तुमच्या या अंगभूत गुणांच्या आधारे पंतप्रधान (पाकिस्तानचे) होऊ शकता.

23 December 2010

वर्दीचा रुबाब

इंग्रज अधिकारी : तुम्ही भारतीय सगळे असे घोड्यासारखे वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालून का आलात? आमच्याकडे बघा, आम्ही सगळे कसे पांढरे दिसतो आहोत एकसारखे.

भारतीय खेडूत : घोडे रंगाने वेगवेगळे असतात पण गाढवं मात्र सगळी एकसारखीच असतात.

22 December 2010

रटाळ लेक्चर

अभियांत्रिकीच्या दुसर्‍या वर्षाच्या वर्गात MATHS चं देशपांडे मॅडमचं रटाळ लेक्चर चालू होतं.

एका मुलाचं लक्ष दुसरीकडेच होतं.

मॅडम : ए, लक्ष कुठं आहे तुझं? सांग बरं 2, 4, 8, 10,... हे जे काही लिहिलय मी बोर्डवर ते काय आहे.

विद्यार्थ्यालाही या कंटाळवाण्या लेक्चरमुळे जरा गंमत करण्याची हुक्की आली.
त्याने उत्तर दिले, "सोनी, झी टीव्ही, झूम, पोगो..."

21 December 2010

चेष्टा

पत्नी : तुम्हाला माझ्यात सर्वात जास्त काय आवडते? माझं सौंदर्य की माझी हुशारी?

पती : मला तर तुझी ही अशी चेष्टा करण्याची सवय जास्त आवडते.

20 December 2010

पोपटाला तुरुंगवास

एकदा एक पोपट चालत्या कारला धडकतो आणि बेशुद्ध होऊन पडतो.

एक माणूस त्याला घरी घेऊन जातो, पिंजर्‍यात ठेवतो, चांगले खाऊ घालतो.

पोपट शुद्धीवर येतो तेव्हा आपण पिंजर्‍यात असल्याचे पाहून म्हणतो, "आयला जेल, कारचा ड्रायव्हर मेला की काय."

19 December 2010

अल्ला के नाम पे !!!

एका भिकार्‍याला १ रुपयाची भीक मिळते.

त्याला प्रश्न पडतो आता १ रुपयात कसं काय भागणार म्हणून.

तो मग १ रुपया कोईन बॉक्समध्ये टाकतो आणि फोन लावतो एका हॉटेलात.
मस्तपैकी ऑर्डर देतो...५ रोटया, १ चिकनहंडी, १ राईस प्लेट, २ आईसक्रीम.

पलीकडून ऑर्डर घेणारा विचारतो, "ठीक आहे साहेब, पण हे सगळं कोणाच्या नावावर पाठवू?"

भिकारी : अल्ला के नाम पे !!!

18 December 2010

वजन १ रुपयात

भिकारी : अहो साहेब, एक रुपया द्या ना...एकच रुपया फक्त.

साहेब : काय रे, तीन दिवसांपासून उपाशी आहेस ना. मग फक्त एका रुपयाचं तू काय करणार?





भिकारी : काय करणार म्हणजे काय साहेब...वजन करणार साहेब, किती कमी झालय.

17 December 2010

बंदरवा का फोटू





लालूजी एका दुकानात जातात.

लालूजी : ये बंदरवा का फोटू कितने मे दिया?

दुकानदार : ये बंदरवा का फोटू नही है साहेब. वो तो शिशा है.

16 December 2010

भीक मागण्यात लाज कसली

भिकारी : साहेब, एक रुपया द्या ना साहेब, द्या ना.

साहेब : काय रे, तुला लाज नाही वाटत अशी रस्त्याच्या मध्ये उभं राहून भीक मागला? नालायक कुठला.

भिकारी : साहेब, मग काय तुमच्या एक रूपयासाठी ऑफिस खोलू?

15 December 2010

भीती

एक माणूस थडग्यावर बसलेला होता.

रस्त्याने जाणार्‍या वाटसरूने त्याला विचारलं, "भीती नाही वाटत असं थडग्यावर बसायला?"

त्यावर तो मनुष्य म्हणाला, "त्यात घाबरण्यासारखं काय आहे, आतमध्ये खूपच गरम होत होतं म्हणून बाहेर येऊन बसलो इतकच."

14 December 2010

ATTITUDE

Attitude कशाला म्हणतात?

तीन मुंग्या थांबलेल्या असतात.
समोरून एक हत्ती येत असतो.

पहिली मुंगी : मी ह्या हत्तीचा पायच मोडेन.

दुसरी मुंगी : मी या हत्तीला मारूनच टाकीन.

तिसरी मुंगी : त्याला आज जाउद्यात. तो एकटा तर आहे आणि आपण मात्र तिघी.

भित्रे वडील

संता : माझे वडील खूपच भित्रे आहेत.

बंता : कसं काय रे?

संता : मी जेव्हा वडिलांबरोबर रोड ओलांडत असतो, तेव्हा ते माझ्या बोटाची करंगळी पकडून ठेवतात आणि म्हणतात, सोडू नकोस म्हणून.

13 December 2010

Placement

कॉलेज अॅडमिशनचे दिवस असतात.

एक विद्यार्थी एका कॉलेजचा फॉर्म भरतो.

फॉर्म भरून परत जाताना तो सहज म्हणून गेटवरील वॉचमनकडे चौकशी करतो.

"का हो, हे कॉलेज चांगलं आहे ना?"

वॉचमन : चांगलं काय म्हणताय, जबरदस्तच आहे म्हणा ना. मी बघा इथूनच कॉलेज केलं आणि लगेच नोकरी पण मिळाली मला इथे.

बक्षीस भारी

बंड्या : पप्पा पप्पा, तुम्हाला आठवतं का तुम्ही काय म्हणाला होतात ते.

पप्पा : काय बरं?

बंड्या : हेच की मी पास झालो तर तुम्ही मला १०० रुपये द्याल म्हणून.

पप्पा : बरं मग.

बंड्या : एक खुशखबर आहे.

पप्पा : अरे वा वा वा !!!

बंड्या : तुमचे १०० रुपये वाचले.

एक रुपया

भिकारी : अहो साहेब, एक रुपया द्या ना...एकाच रुपया फक्त. तीन दिवसांपासून उपाशी आहे साहेब.

साहेब : अच्छा, तू तीन दिवसांपासून उपाशी आहेस. तर मग मला सांग तू एका रुपयाचं काय करणार?

भिकारी :  (वर-खाली बघत) वजन करणार आहे, किती कमी झालय ते.

12 December 2010

दिवसा अंधार?

गॅलिलिओ एका छोट्याशा दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचा.

ग्राहम बेल मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करायचा.

शेक्सपिअर तर चक्क पदपथावरील दिव्यांच्या खाली बसून अभ्यास करायचा.

ते काहीही असो,

पण मला मात्र एक गोष्ट काळात नाहीये,

मग हे लोक दिवसभर काय झक मारत होते काय...

बाप की बेटा

बंड्याचा बाप त्याला सांगत असतो, "कितीही झालं तरी मुलापेक्षा बापच जास्त हुशार असतो."

बंड्या : अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला?

बाप : ग्राहम बेलने

बंड्या : मग त्याच्या बापाने का नाही लावला?

11 December 2010

अजब प्रेम की गजब कहाणी

एकदा एक डुक्कर आणि कोंबडी एकमेकांच्या प्रेमात पडतात.

ते दोघे लग्नही करतात.

दुसर्‍याच दिवशी त्यांचा मृत्यू होतो.

कोंबडी "बर्ड फ्लू" ने मरते आणि डुक्कर "स्वाइन फ्लू" ने.

डबल बार

एक दारुड्या आपल्या मुलाला दारू खूप वाईट असते आणि म्हणून कधी पिऊ नये हे समजावून सांगत होता.


तो आपल्या मुलाला अजून समजावून सांगतो.

ते बघ समोरून जी २ माणसं चाललीयेत ना ती ४ दिसतात दारू पिल्यावर.

मुलगा : अहो पप्पा, पण तो तर एकच माणूस आहे.

10 December 2010

देणारा देश India

India कधीही Australia बरोबर खेळताना जिंकू शकत नाही.

कारण ते आपण नावावरूनसुद्धा सांगू शकतो.

दोन्ही देशांच्या नावातील शेवटची तीन अक्षरे पहा.

Australia ने lia और हमने dia

मच्छर विकायचाय

एक सिंधी आणि एक चिनी असे दोघे एकमेकांशेजारी बसून प्रवास करीत असतात.

तेवढ्यात एक मच्छर त्यांच्या आजूबाजूला घोंघावू लागतो.

चिनी प्रवासी तो मच्छर पकडून पटकन तोंडात टाकतो आणि मटकावतो.

थोड्या वेळाने मग अजून एक मच्छर त्यांच्यापाशी घोंघावू लागतो.

मग मात्र सिंधी प्रवासी हा मच्छर पकडतो आणि चिनी प्रवाश्याला विचारतो, "विकत घेणार का?"

09 December 2010

Love Letter By A Mathematician

My Dear Luv,

Yesterday I was passing
by your Rectangular House
in Trigonometric Lane.
There I saw you with your Cute Circular Face
Conical Nose & Spherical Eyes
Standing In your Triangular Garden
Before Seeing you My Heart was A Null Set
But when a Vector Of Magnitude(Likeness)
from your eyes at A Deviation Of Theta Radians
made a Tangent to My Heart
It Differentiated.
My Love for you is A Quadratic Equation
With Real Roots..

शांत बसलेले वेडे

वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दहा-बारा वेडे नाचत असतात.

पण बाजूलाच दोन वेडे शांत बसलेले असतात.

डॉक्टरांना वाटते की हे दोघे शहाणे झाले आहेत.

ते त्या दोघा वेड्यांना शांत राहाण्याचे कारण विचारतात.

तेव्हा ते दोघे म्हणतात, "आम्ही दोघे नवरा बायको आहोत."

मानवता

एकदा एक चोर एका धनाढ्य व्यापार्‍याच्या घरात घुसतो.

जिथे तिजोरी ठेवलेली असते, तिथे तो जाऊन पोचतो.

तिजोरीच्या बाजूला लिहिलेले असते...
तिजोरी फोडायची गरज नाही. बाजूलाच ठेवलेली ४२० नंबरची चावी तिजोरीच्या कुलपात घालून दोनदा फिरवा आणि मग समोरील लाल बटन दाबा.

चोर लाल बटन दाबतो तसा अलार्म वाजू लागतो आणि पोलिस येतात.
ते चोराला पकडून नेतात.

पकडून नेत असताना चोर मालकाला म्हणतो, "आज माझा माणुसकीवरचा विश्वासच उडाला."

गोरेपणा कशामुळे

Zarin आणि Katrina दोघी खूपच सुंदर व गोर्‍या आहेत.

का माहितीये?


कधीतरी डोकं लावा.



कारण,


त्यांच्या दोघींच्या नावात Rin आहे ना म्हणून.


Rin दे चौका देनेवाली सफेदी," ही जाहिरात माहितीये ना.

08 December 2010

गझनी २ चा रिमेक

१ ले दृष्य :

आमीर खानचा मुलगा रस्त्याने जात असतो.

मध्येच तो थांबतो आणि डबा उघडतो.

का माहितीये?

कारण,


त्याच्या लक्षात नसतं की तो शाळेत चाललाय की शाळेतून घरी.

07 December 2010

सवय

साठे सरांचं लेक्चर चालू होतं.

तेवढ्यात एक मुलगा मध्येच उठून वर्गाच्याबाहेर निघून गेला.

साठे सर (एका विद्यार्थ्याला): का रे, तो मध्येच उठून बाहेर का निघून गेला?

विद्यार्थी : सर, त्याला झोपेत चालण्याची सवय आहे ना म्हणून.

मुलाखत

एका कंपनीतर्फे एक सरदारजी विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू (मुलाखत) घेण्यासाठी "सीओईपी"त आला.

त्याने मुलाखत घेताना प्रश्न विचारला, "आपल्याला १२ वीत किती मार्क्स मिळाले?"

विद्यार्थी : ९९ टक्के

सरदारजी : (तोंडाला हात लावत) अरे बापरे !!! एवढ्या मार्कांमध्ये तर ३ सरदार पास झाले असते.

06 December 2010

आपण कुठे आहोत?

रात्रीचे दोन दारुडे फुल्ल टाईट होऊन डुलत-डुलत चाललेले असतात.

रस्त्यात त्यांना एक पाण्याचं बर्‍यापैकी मोठं डबक दिसतं.

पहिला दारुड्या : अरे, हे बघ इथं काय आहे.

दूसरा दारुड्या : अरे काय तरीच काय. हा तर चंद्र आहे.

पहिला दारुड्या : अरे बापरे, चल घरी चल लवकर. आपण तर बोलत बोलत चंद्रावर येऊन पोचलो.

फाशी

न्यायाधीश : संता, तुझ्यावरील सर्व आरोप सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे तुला फाशीची शिक्षा देण्यात येत आहे. तुला उद्या संध्याकाळी फाशीवर चढवले जाईल.



संता : ते ठीक आहे, पण उतरवणार केव्हा ते पण सांगा.

मास्तरचं घर

संता : एवढे कमी मार्क? दोन कानाखाली द्यायला पाहिजेत.

मुलगा : हो पप्पा, मी दोन दिवसांपासून त्या मूर्ख, नालायक मास्तरच घर शोधत आहे.


05 December 2010

1 च नंबर

11111111111111111111111111111111111111111111111
1111111111111111111111111111111111
11111111111111111111
111111111
1111
11
1

मेसेज काय 1 नंबर आहे ना...

रिझल्ट

सरदार (आपल्या मुलाला): अरे बाळा तुझा रिझल्ट लागला की नाही.

मुलगा : अहो पप्पा, मला या वर्गात अजून २-३ वर्ष बसावं लागणार आहे.

सरदार : २ वर्ष लागू देत नाही तर ३ वर्ष लागू देत, माझी काही हरकत नाही बेटा. पण फेल मात्र व्हायचं नाही बरं.


सरदारजीच नाव

जर एखादा सरदारजी पाण्याखाली राहत असेल, तर त्याचं नाव काय असेल बरं?








जरा विचार करा.









थोडं डोकं खाजवा.








अजून थोडं.





ठीक आहे, त्याचं नाव असेल, "Jal-andar Singh"

04 December 2010

आपकी एक मूस्कुराहट

सुना है की आपकी एक मूस्कुराहट पे लोग मरते है.







मुझे भी एक बंदा मरवाना है,









जरा टाइम निकालके आना और उसके सामने मुस्कुराना...

ओपनर

एकदा जवागल श्रीनाथ पेप्सीची बाटली कुंबळेला देतो.

मग कुंबळे ती सेहवागला देतो.


का बरं देतो?


सांगता येईल का?


कारण,

सेहवाग ओपनर असतो ना म्हणून.

03 December 2010

असाही विवाह

एकदा काय होतं, एका माणसाच्या डोक्यावरचे दोन केस एकमेकांच्या प्रेमात पडतात.

पण ते लग्न करू शकत नाहीत.

आता सांगा बरं का?




विचार करा.





कारण,



हिंदू कायद्यानुसार "बाल विवाह"गैर आहे म्हणून.

पाणी का वाढले?

एका तलावात २० मासे असतात.

त्यातला एक मासा मरतो.
त्यामुळे पाण्याची पातळी वाढते.

सांगा बरं का?




कारण,



बाकीचे मासे रडतात म्हणून.

02 December 2010

विनंती


कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे (COEP) मध्ये इंजिनियरिंगची परीक्षा चालू असते.

MIII चा पेपर असतो.

एका विद्यार्थ्याला काहीच येत नसते.

बिचारा २-३ वर्षांपासून हा विषय सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण आता याही वेळेस काही आशा नाही म्हणून पेपर सोडून देतो.

शेवटी जाताना विनंती करतो,


Dear Maths,

Please grow up as soon as possible and

solve your problems yourself…!!!

01 December 2010

U & I

तू आणि मी

ज्याने A, B, C, D, E.......Z चा शोध लावला ती व्यक्ती किती महान असेल नाही.
पण त्या व्यक्तीने मात्र एक छोटीसी चूक केली.
त्याने तुला (U) आणि मला (I) एकमेकांपासून दूर ठेवले.


पण तरीही मी तुला (U) आणि मला (I) एकमेकांजवळच ठेवले. इतकं की अगदी शेजारी शेजारीच म्हणा ना.

तुला माहितीये तू (U) आणि मी (I) कुठे एकत्र असू शकतो, अगदी एकमेकांच्या शेजारी-शेजारी...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
विचार कर पाहू...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हा हा हा............खाली की-बोर्ड वर बघ बरं.

वाटचाल कुणीकडे...

नवीन लग्न झालेल्या नवरा त्याच्या बायकोचा मोबाईल नंबर "My Life" असा save करतो.

एका वर्षाने त्याला तो "My Wife" असा लिहावा लागतो.

दोन वर्षांनी मग "Home" असा लिहावा लागतो.

पाच वर्षांनी तो "Hitler" असा लिहितो.

आणि लग्नानंतर दहा वर्षांनी "Wrong Number" असा लिहितो.

30 November 2010

आमंत्रण

संता : अरे मी तुला माझ्या लग्नाचं आमंत्रण पाठवलं होतं, तू का आला नाहीस?

बंता : अरे पण मला ते आमंत्रण पत्र मिळालच नाही.

संता : असं कसं...मी त्यात लिहिलं होतं ना, पत्र मिळो वा न मिळो; तू लग्नाला यायचस म्हणजे यायचस !

29 November 2010

सरदारजीची बॅटिंग

एकदा सरदारजी क्रिकेट खेळायला जातो.

सुदैवाने, तो बर्‍यापैकी खेळतो.

त्याच्या ३५ धावा होतात आणि तो लगेच आपली बॅट उंचावून सगळ्या प्रेक्षकांना अभिवादन करतो.

कुणाच्याच काही लक्षात येत नाही, हा मध्येच असा काय करतोय. त्याचं अर्धशतकही झालं नाही.

समोरचा फलंदाज त्याला विचारतो, तर सरदारजी म्हणतो, "तुला ३५ म्हणजे काय माहीत नाही?"

फलंदाज : नाही.

सरदारजी : मला तर शाळेत असल्यापासून माहिती आहे.

फलंदाज : पण काय?

सरदारजी : अरे, ३५ गुण मिळाल्यावर आपण पास होतो ना...

जुना प्राणी

शिक्षक : सांगा बरं मुलांनो, सगळ्यात जुना प्राणी कोणता?

बंड्या : झेब्रा

शिक्षक : (गोंधळून, विचार करत) कसं काय रे बंड्या.

बंड्या : कारण, तो ब्लॅक अँड व्हाईट असतो ना; गुरुजी.

28 November 2010

परीक्षा

एकदा एका वेड्यांच्या इस्पितळातील डॉक्टर ठरवतात, की आठ वेड्यांची परीक्षा घ्यायची.
जो पास होईल, त्याला सोडून देण्यात येईल.

डॉक्टर खोलीच्या एका भिंतीवर खडूने दरवाजा काढतात.
आठ जणांना सांगितले जाते की, दरवाजा उघडायचा आणि खोलीच्या बाहेर पडायचं.

सात जणांनी दरवाजातून बाहेर जायचा खूप प्रयत्न केला, पण कुणालाच ते जमलं नाही.
एकजण मात्र नुसता बघत बसला होता.

डॉक्टरांनी त्याला विचारले, "का रे, तू बसून नुसती गंमत काय बघतोयस."

तर वेडा म्हणाला, "कारण, त्या दरवाजाच्या कुलूपाची चावी माझ्याकडे आहे."

अंगभूत गुण

सासरेबुवा आपल्या नववधूला म्हणाले, "तू फारच नशीबवान आहेस. माझ्या पश्चात तुला १० लाख रुपये मिळणार आहेत."

नववधू : पण मामंजी, मला तर घरचे म्हणत होते की तुझ्या अंगभूत गुणांमुळे विवाहानंतर तुला ते लगेचच मिळतील म्हणून.

27 November 2010

पत्र

एकदा सरदारजीने आपल्या मित्राला फोन केला आणि सरळ पत्र लिहून ते मित्राच्या पत्त्यावर पाठवून दिले.

मित्राने विचारले, "अरे, फोन असताना तू पत्र का पाठवलेस?"

सरदारजी : होय, मी फोन केला होता तुला. पण फोनमधली बाई म्हणाली ट्राय लेटर, म्हणून मी पत्रच पाठवलं.

26 November 2010

नवीन घड्याळ

साठे : अहो, मी हे जे नवीन घड्याळ इतकं अचूक आहे ना, की ते एक मिनीटसुद्धा पुढे जात नाही किंवा मागे राहत नाही.

जोशी : अरेच्चा, कमाल आहे. गेल्याच महिन्यात तर तू ते खरेदी केलं होतस ना? मग इतक्या लवकर ते कसं काय बंद पडलं?

25 November 2010

भीती

बंड्या : पोलीस काका, तुम्हाला कसली भीती वाटते?

पोलीस : कसलीच नाही.

बंड्या : मग तुम्ही बंदूक घेऊन का उभे राहता?

24 November 2010

नोकरी हवीय?

BSNL ची नोकरीसाठी दिलेली जाहिरात :

 Walk-In Interview

वेगवेगळ्या पदांसाठी BSNL मध्ये भरती चालू आहे.
 उमेदवारांना आकर्षक पगाराची सुवर्णसंधी.

दि. ३०/१२/२०२० पर्यंत आपला बायोडाटा jobs@bsnl.in येथे पाठवावा.
 तसेच मुलाखतीसाठी येताना तुमचा बायोडाटा घेऊन स्वत: हजर राहावे.

पात्रता : इंजिनियर
पगार : रू. ३०,००० प्रती महिना

कामाचे स्वरूप : टॉवरवर बसून कावळे हाकलणे.




22 November 2010

लुकडे ओबामा

बराक ओबामांचं वजन कमी झालं तर त्यांना काय म्हणाल?


विचार करा...



..


...


...


अहो, सोप्पं आहे,

बारीक ओबामा



---जोशीकाका

21 November 2010

एक विचित्र जीवनचक्र

झुरळाला उंदराची भीती वाटते,

उंदराला मांजरीची,

मांजरीला कुत्र्याची,

कुत्र्याला माणसाची,

माणसाला त्याच्या GIRL FRIEND ची,

आणि GIRL FRIEND ला झुरळाची.........

मी आणि बराक ओबामा

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि माझ्यात काय साम्य आहे, माहितीये?

ते कधीही माझ्या घरी येत नाहीत,

आणि

मीसुद्धा कधीही त्यांच्या घरी जात नाही;

कारण



Ego Problem, दुसरं काय...

20 November 2010

प्रिंटर सापडत नाहीये

सरदारजी एकदा आपल्या हार्डवेअरच्या माणसाला फोन करतो.

त्याला तो आपला प्रॉब्लेम सांगतो.

"हॅलो, मला प्रिंटरमधून प्रिंट काढता येत नाहीये. मी जेव्हा तसा प्रयत्न करतो, तेव्हा माझा कम्प्युटर मला सांगतो की प्रिंटर सापडत नाहीये (Can't find printer).

मी तर प्रिंटर उचलून मॉनिटर जवळ नेला, त्यावर ठेवला तरीपण काही उपयोग होत नाहीये."

19 November 2010

ठिकाण

राजू (लव्ह गुरुस) : सर, मुलींना प्रपोज करायला चांगलं ठिकाण कोणतं?

लव्ह गुरु : मंदिर

राजू : मंदिर? का?

लव्ह गुरु : हो, कारण तिथं मुली चप्पल घालून जात नाहीत.

डोकं लढवा

शिवाजी महाराजांनी आपल्या किल्ल्यांचा वापर कशासाठी केला?







विचार करा,








विचार करा,






अहो, सोप्पं आहे,



कुलूप उघडायला...

सुविचार

जर तुम्हाला काही काळासाठी सुखी व्हायचं असेल, तर - पेग घ्या.

जर तुम्हाला जास्त काळासाठी सुखी व्हायचं असेल तर - प्रेमात पडा.

जर तुम्हाला कायमचं सुखी व्हायचं असेल तर - वरील दोन्ही गोष्टींचा विचारही करू नका.

18 November 2010

रेडिओ स्टेशन्स

एक ग्राहक मोबाइल घ्यायला दुकानात जातो.

दुकानदार एक चांगला मोबाइल ग्राहकास देतो.

ग्राहक : या मोबाईलवर सगळी स्टेशन्स मिळतात ना.

दुकानदार : हो. फक्त दोनच मिळत नाहीत.

ग्राहक : कोणती?

दुकानदार : रेल्वे स्टेशन आणि पोलिस स्टेशन.

इंजिनियरिंगचा परिणाम

इंजिनियरिंग शिकत असताना तांत्रिक बाबींशी जास्त निगडीत असल्याचा परिणाम बघा कसा होतो ते...

एक सॉफ्टवेअर इंजिनियर एका इमारतीच्या गच्चीवरून चुकून तोल जाऊन पडतो.

पडताना तो वाचवा, वाचवा, मदत करा; म्हणण्याऐवजी ओरडतो,


F1
F1
F1
F1

उंदरांचा सुळसुळाट

उंदरांचा खूपच सुळसुळाट झालाय हो,
...
...
..
..
..
..
..
..
..
...
...
...

...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...

...
....
....
....
....



बघा ना, सगळा मजकूरच खाऊन टाकला उंदीरमामाने...

17 November 2010

BE चा लोंगफॉर्म

BE म्हणजे काय?

८० GB अभ्यासक्रम
८० MB शिकवलं जातं
८० KB आपल्या लक्षात राहतं
८० Bytes आपल्याला उत्तरं देता येतात

आणि आपल्याला

BINARY मार्क्स मिळतात

आणि त्यानंतर शेवटी आपल्याला पदवी मिळते,

BE म्हणजे (Brain Empty)...

16 November 2010

Assumption

प्रश्न : हे सिद्ध करा की पोपट हत्तीवर बसतो आणि त्यामुळे हत्ती मरतो.

इंजिनियरिंगचा विद्यार्थी : असं गृहीत धरा की, पोपटाचं नाव 'हत्ती' आहे आणि हत्तीचं नाव 'पोपट' आहे.

म्हणजेच सिद्ध होते.

सरदारजीची टोटल

एका सरदारजीला त्याच्या मुलाच्या शाळेत बोलावून घेतलं जातं.

शिक्षक म्हणतात, "तुमच्या मुलाचे प्रगतीपुस्तक बघा. गणित १०, इंग्रजी ५, हिंदी ४, विज्ञान ५, आणि टोटल २४."

यावर सरदारजी म्हणतो, "टोटलला २४ कसे काय पडले? या विषयाची शिकवणीसुद्धा लावली नव्हती. मग याला जास्त मार्क कसे काय पडले?"

15 November 2010

शिकवणी

शिक्षक : का रे, दोन दिवसांपासून शिकवणीला का आला नाहीस?

बंड्या : त्याचं काय आहे गुरुजी, माझ्याकडे एकाच कुर्ता-पायजमा आहे आणि परवा तो धुवायला टाकला होता. म्हणून आलो नाही.

शिक्षक : मग काल का आला नाहीस?

बंड्या : आलो होतो गुरुजी. पण अंगणात तुमचा कुर्ता-पायजमा वाळताना दिसला, म्हणून परत गेलो.

संपत्ती

दोन मित्रांची चर्चा -

पहिला : अरे, मी जन्माला आलो तेव्हा माझ्याकडे काहीही नव्हतं.

दूसरा :हो, माझ्याकडे पण. पण...आता मी लग्न केलय त्यामुळे, मी मरेन तेव्हाही माझ्याकडे काहीही नसेल.

सरदारजीची डायरी

बुधवार : एका जोडे विक्रेत्याला मूर्ख बनविले. एकाच बुटाच्या किमतीत दोन विकत घेतले. (त्याने एकाच बुटावर किंमत लिहिली होती, बहुधा तो दुसर्‍या बुटावर लिहिण्याचे विसरला असावा.)

गुरुवार : औषधाच्या दुकानातून मालकाने कामावरून काढून टाकले. त्याने बॉटल्सचे लेबल्स प्रिंट करण्यासाठी सांगितले होते. पण मी तरी काय करणार, बॉटल प्रिंटरमध्ये जातच नव्हती.

शुक्रवार : रात्री खूप हसलो, बुधवारी पांडेजीने सांगितलेला विनोद फारच छान होता.

शनिवार : दिवसभर पाऊस होता, पण तरीही शेवटी पावसात भिजून का होईना संध्याकाळी झाडांना पानी दिलंच.

रविवार : वॉटर स्कीईंगसाठी घराच्या बाहेर पडलो. सगळं गाव पालथ घातलं, पण उतार असलेला एकही तलाव सापडला नाही.

14 November 2010

प्रेम

सखूबाईचे आपल्या नवर्‍यावर अतिशय प्रेम होते.

पण त्यांचा नवरा वारला.

सर्वजण आता म्हणू लागले, "सखूबाई आता नवर्‍याशिवाय जगू शकत नाही."

आणि झालेही तसेच.

त्यांनी आठवडाभरात दुसरं लग्न केलं.

मंदीचा काळ

रामराव : काय हो, तुम्हाला मुलं किती?

शामराव : मला सहा मुलं.

रामराव : अरे वा. काय करतात ती?

शामराव : थोरला सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, दूसरा फॉरेन बँकेत आहे, तिसरा शेअर ब्रोकर आहे, चौथा मल्टीनॅशनल कंपनीत आहे, पाचवा एयरवेजमध्ये आहे आणि सहावा पानवाला आहे. सध्या तोच आमचं घर चालवतो.

स्वर्गसुख

बायको : काय हो, स्वर्गात म्हणे  नवरा-बायकोला एकत्र राहून देत नाहीत. खरे आहे का हे?

नवरा : हो, हे अगदी खरं आहे.

बायको : पण का हो असे?

नवरा : अगं त्यामुळेच तर त्याला स्वर्ग म्हणतात.

आईचा फोन

एका मोबाईलच्या दुकानात खूपच गर्दी होती.

गर्दीत चुकून कुणीतरी आपला मोबाइल काऊंटरवर विसरून गेला.

थोड्या वेळाने दुकानदाराला सुचलं की त्यातल्या एखाद्या नंबरवर फोन करून त्या व्यक्तीला कल्पना द्यावी की त्याचा मोबाइल इथे विसरला आहे.

म्हणून दुकानदाराने मोबाइलमधले सर्व नंबर तपासले. एक नंबर आई या नावानेहोता.

दुकानदाराने आईला फोन करून मोबाइल त्याच्याकडे असल्याचे संगितले.

थोड्या वेळाने आईचा फोन आला व तिने सांगितलं, बेटा तू तुझा फोन या दुकानात विसरला आहेस.

13 November 2010

शब्दाचा पक्का

कंत्राटी कर्मचारी : साहेब, तुम्ही मागच्याच महिन्यात सांगितलं होतं ना, की पुढच्या महिन्यात पगार वाढवतो म्हणून.

साहेब : मी माझा शब्द कधीच फिरवत नाही. मागच्या महिन्यात जे सांगितलं होतं, तेच आताही सांगतो.

कन्फ्युज?

सरदारजीला कन्फ्युज कसे कराल?


त्याला एका गोल खोलीत घेऊन जा,

आणि



एका कोपर्‍यात बसायला सांगा.

झुरळांची पावडर

जोशी एकदा तुळशीबागेत जातात.

एक कीटकनाशकं विकणारा माणूस त्यांना हाक मारतो.

विक्रेता : ओ साहेब, घ्या की काहीतरी विकत.

जोशी : छे, छे, मला काही नकोय.





विक्रेता : अहो, झुरळांची पावडर तरी घ्या की. एकदम भारी आहे.

जोशी : ती तर अजिबातच नको. आम्ही आमच्या झुरळांचे इतके लाड करत नाही. त्यांचा काय नेम, आज पावडर दिली; तर उद्या डिओडरंट मागतील.

12 November 2010

साक्ष

वकील (साक्षीदारास) : तू म्हणतोस की भिंत ८ फुट उंच आणि तू जमिनीवर उभा होतास. भिंतीवर किंवा शिडीवर चढला नव्हतास.

साक्षीदार : बरोबर.

वकील : आता तुझी उंची ५ फुट आणि भिंतीची उंची ८ फुट. मग पलीकडे तो माणूस काय करत होता, हे तुला कसं काय दिसलं?

साक्षीदार : भिंतीला भगदाड होतं ना साहेब.

11 November 2010

भविष्य

शिक्षिका : मुलांनो, कोणी एखाद्या कागदाकडे बघून भविष्य सांगू शकतं का?

बंड्या : हो ताई.

शिक्षिका : कोण बरं?

बंड्या : माझी आई.

शिक्षिका : ते कसं काय?

बंड्या : माझ्या प्रगतीपुस्तकाकडे बघून आई सांगू शकते की बाबा घरी आल्यावर काय होणार.

काय झालं?

सदाशिव पेठेत एक मुलगा सायकल चालवता चालवता एका दिव्याच्या खांबाला जाऊन धडकतो.

जोशी काका धावत धावत बाहेर येतात.

शेजारच्या कुलकर्णींना विचारतात, "काय हो, काय झालं?"

कुलकर्णी : अहो तुमचा राजू सायकल चालवत होता.

जोशी : हो, मग.

कुलकर्णी : तो दिव्याचा खांब दिसतोय का?

जोशी : हो हो, दिसतोय की.

कुलकर्णी : तुमच्या मुलाला नाही दिसला.

10 November 2010

तब्येतीत सुधारणा

जोशीकाका हॉस्पिटलमध्ये बेडवर पडले होते.

चार दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये असल्याने ते जाम वैतागलेले होते.

एक दूरचा नातेवाईक त्यांची चौकशी करायला आला.

त्याने विचारले, "काय काका, तुम्ही कालच्या तुलनेत आज बरेच चांगले खोकताय. सुधारणा दिसतेय तब्येतीत."

जोशीकाका : हो ना, सुधारणा होणारच. काल रात्रभर खोकण्याचा सराव करत होतो ना.

फाशी

राजाची परवानगी न घेता एका शिपायाने त्याच्या बागेतली द्राक्षे खाल्ली. राजाने शिपायाला फासावर लटकवण्याची आज्ञा केली.

फाशी देण्यासाठी त्याला नेट असताना, त्या शिपायाने द्राक्षे पुन्हा तोडून खाल्ली.

तेव्हा त्याच्याबरोबरच्या दुसर्‍या शिपायाने त्याला विचारले, "एवढे होऊनही तू द्राक्षे का खातोस?"

शिपाई : का नाही खाणार? त्यासाठीच तर मी माझा प्राण देत आहे.

दानशूर बंड्या

बंड्या : आजोबा, आजोबा, दोन रुपये द्या ना त्या गरीब म्हातार्‍या बाईला.

आजोबा : हे घे. मला तुझा हा दानी स्वभाव बघून खूप आनंद झाला. पण ती बाई कुठे आहे.

बंड्या : ती बघा तिथे कुल्फी विकते आहे.

09 November 2010

गोड बोलणं

पत्नी : नवीन लग्न झालं तेव्हा माझं बोलणं तुम्हाला किती गोड वाटत होतं. तुझं बोलणं म्हणजे थंडगार गंगाजलच असे म्हणायचा तुम्ही. आणि आता?

पती : अजूनही मी तसेच म्हणतो. पण आता त्या प्रवाहाला पूर आलाय आणि तो माझ्या डोक्यावरुन जाऊन आपण त्यात वाहून जाऊ की काय, असे वाटायला लागले आहे.

08 November 2010

स्मरणशक्ती

सीमा आपले पती सोमदेवांना म्हणाली, "आज आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस. एक तपापुर्वी तुम्ही जे जे म्हणाला होतात, ते सगळं आठवतंय मला."


सोमदेव : बरं मग सांग तरी.

सीमा : तुम्ही म्हणायचात, तुम्ही माझे पती होण्यालायक नाही आहात.

सोमदेव : हो हो, पण ते इतक्या वर्षांनतरही आठवते तुला? तुझी स्मरणशक्ती चांगली आहे.

सीमा : हो, कारण आता माझ्या लक्षात येतय की तुम्ही कसेही असलात तरी खोटं कधी बोलला नाहीत.

कर्ज

एका माणसाने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं.

कर्ज फेडता न आल्याने बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले.

यावर तो माणूस म्हणाला, "मला माहीत नव्हतं, नाहीतर मी लग्नासाठी पण कर्ज घेतलं असतं."

07 November 2010

पंचनामा

रस्त्यात पडलेल नाणं उचलताना एकाचा गाडीखाली येऊन मृत्यू झाला.

पंचनाम्यात नैसर्गिक मृत्यु अशी नोंद होती.

पुढे खटला चालविल्यावर तपासात ते नाणं नसून थंडपेयाचं चकाकणारं झाकण असल्याचं निष्पन्न झालं.

तेव्हा अहवाल देण्यात आला, "मानसिक धक्क्याने मृत्यु."

06 November 2010

स्वागत

                                    संजयकडे त्याचे काका, काकू, मामा, मामी, त्यांची तीन-तीन मुले, दोन मावश्या, त्यांची चार मुले अशी पाहुणेमंडळी अचानक येऊन टपकली.

संजयच्या आईला फार आनंद झाला. तिने आपल्या दीर, भाऊ, बहिणीचे, त्यांच्या मुलांचे चांगले स्वागत केले.
चहापाणी, नाश्ता झाला.

तेवढ्यात संजयचे बाबा त्याला म्हणाले, "संजय, जा बरं पाहुण्यांसाठी काहीतरी घेऊन ये."

हे ऐकून सर्वजण खुश झाले.


संजय बाहेर गेला आणि पाहुण्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी दोन-तीन रिक्षा घेऊन आला.

हरकत

कुलकर्णींच्या शेजारी नव्यानेच राहायला आलेले नाडकर्णी आपल्या सामायिक भिंतीवर खिळा मारत होते. बराच वेळ चाललेल्या ठोकाठोकीने कुलकर्णी थोडेसे वैतागले. काहीसे नाराजीच्या सुरात ते नाडकर्णींकडे गेले.

नाडकर्णी : आमच्या ठोकाठोकीने तुम्हाला त्रास झाला असेल नाही. त्याचं काय आहे, मला एक पेंटिंग भिंतीवर लावायचं होतं ना म्हणून एक खिळा ठोकावा म्हटलं.

कुलकर्णी : अहो काही हरकत नाही आमची, खुशाल ठोका की. मला फक्त एवढं विचारायचं होतं की खिळ्याच्या दुसर्‍या टोकाला आम्ही फ्रेम लटकवली, तर तुमची काही हरकत तर नाही ना...

04 November 2010

फोटो कुणाचा?

दोन दारुडे फुल्ल पिऊन रस्त्याने चाललेले असतात.

त्यांना रस्त्यात एक आरसा सापडतो.

पहिला दारुड्या तो आरसा घेतो आणि त्यात पाहतो. आरशात पाहून म्हणतो, "अरे ए, हा बघ बरं कुणाचा फोटो आहे."

दूसरा दारुड्या : बघू बरं.

तो आरशात पाहतो आणि म्हणतो, गधड्या एवढं पण समजत नाही का? हा तर माझाच फोटो आहे.

03 November 2010

मी आंधळा होईल

एकदा खेड्यातील एका गावात दरोडा पडतो.

दरोडेखोर एका घरात घुसतात आणि मालकाला धमकावतात.

दरोडेखोर : चल मुकाट्याने जे काही जवळ असेल ते काढून दे, नाहीतर तुझे दोन्ही कानच कापून टाकीन.

मालक : असं नका करू हो, नाहीतर मी आंधळा होईल.

दरोडेखोर : कान कापल्याने तू फार तर बहिरा होशील पण आंधळा कसा काय होशील रे.

मालक : अहो, कान कापल्यावर मी चश्मा कुठे लावू?.

02 November 2010

Longform

एकदा एक सरदार कौन बनेगा करोडपतीचा रिमेक असलेल्या कार्यक्रमात भाग घेतो.

त्याला प्रश्न विचारला जातो, "बताईये, SMS का लोंगफॉर्म क्या है?"

कम्प्युटरवर विविध पर्याय दिले जातात. पण सरदारजी हे सर्व पर्याय नाकारतो.
नाइलाजाने सूत्रसंचालक त्यालाच उत्तर द्यायला सांगतो.

सरदारजी : S.M.S. म्हणजे सरदार मनमोहन सिंग

सगळे लोक सरदारजीला हसू लागतात.
आता दूसरा प्रश्न, "M.M.S. म्हणजे काय?"

सरदारजी : मिसेस मनमोहनसिंग

नदीच्या पल्याड

संता आणि बंता दोघे नदीच्या दोन काठांवर उभे होते.

संता : ए बंता, मला नदीच्या पलीकडे यायचं आहे.


बंता : अरे, कशाला येतोस इकडे; तू आधीच नदीच्या पलीकडे आहेस.

01 November 2010

साठे सरांच्या घरी चोरी

साठे सरांच्या घरी चोरी होते. तक्रार देण्यासाठी ते पोलिस चौकीत जातात.

पोलिस निरीक्षक त्यांना विचारतात, "कधी झाली चोरी?"

साठे सर : १९५० ला

पोलिस निरीक्षक : १९५० ला? (टिंगल उडवीत) वा, आपण फारच लवकर आलात मग.

साठे सर : हो मग, आपण कुठल्याही कामाला अजिबात वेळ घालवत नाही. आता बघा १९५० ला चोरी झाली आणि आता २०१० ला तुमच्यासमोर आहे.
केवळ २० मिनिटांत आलो बघा इथे.

ब्लॅंक एसएमएस

एकदा एका सरदारजीला चुकून कोणाकडून तरी कोरा एसएमएस आला.

सरदारजीने त्याला लगेच कॉल केला आणि म्हणाला, "ओय, तुला माहिती आहे का? अरे, तुझ्या मोबाईलची शाई संपली आहे."

29 October 2010

नातेवाईक

एकदा पती आणि पत्नी फिरायला जातात.

वाटेत त्यांना एक गाढव गवत खाताना दिसतं.

पत्नी : अहो, तो बघा तुमचा नातेवाईक कसा गवत खातोय. त्याला नमस्ते वगैरे म्हणा की.

पती : नमस्ते सासरेबुवा.

28 October 2010

एप्रिल फूल

तो दिवस होता, १ एप्रिलचा.

सरदारजी कोणाला एप्रिल फूल करायचं म्हणून बराच वेळ विचार करून मग ऑफिसकडे जायला निघाला.

बसने जाताना त्याने कंडक्टरकडून तिकीट घेतले आणि म्हणाला, "एप्रिल फूल."

कंडक्टरच्या काही लक्षात आले नाही. त्याने विचारले का?

तर सरदारजी म्हणतो कसा, "माझ्याकडे ऑलरेडी बसचा पास आहे."

फायनल

संता : डॉक्टर साहेब, मला रात्री ना स्वप्नं पडतात की काही माकडे फूटबॉल खेळताहेत.

डॉक्टर : मग असं करा, रोज रात्री झोपण्यापूर्वी हे औषध घ्या.

संता : ठीक आहे, पण मी आज नाही घेणार.

डॉक्टर : का बरं?

संता : आज रात्री फायनल आहे ना !!!

coin box

एकदा संता मंदिरात जातो, देवाच्या पाया पडायला.

संता पाहतो की लोक, तिथे लोक देवासमोरील पेटीत नाणे ( coin ) टाकतात आणि देवाला प्रार्थना करतात.

तो आश्चर्याने उद्गारतो, "अरे वा, किती छान. लोकं देवाशी coin फोनवरून बोलताहेत आणि तेही receiver शिवाय."

27 October 2010

नंदू सबका बंधू

नंदू समोरून येणार्‍या गाढवासमोर चुकून पडला.

तेवढ्यात तेथून जाणार्‍या एका मुलीने त्याला टोचून विचारले, "काय रे, आपल्या लाडक्या बंधूंच्या पाया पडत होतास काय, हां."

नंदू : हो, वहिनी.

नात्याने भाऊ

संता : तुझाबरोबरचा हा मुलगा तुझा कोण लागतो?

बंता : तो माझा लांबून भाऊ लागतो.

संता : कसा काय?

बंता : त्याच्या आणि माझ्यामध्ये ९ बहीण-भाऊ अजून आहेत.

१ लिटर दूध

गिर्हाइक : एक लिटर गाईचं दूध द्या.

दुकानदार : अहो, तुम्ही आणलेल पातेलं खूपच लहान आहे.

गिर्हाइक : ठीक आहे, मग बकरीचं द्या.

पैज

एकदा एक खेडूत आणि प्रोफेसर यांची आगगाडीत भेट झाली.
वेळ घालवण्यासाठी एकमेकांना त्यांनी कोडं घालायचं ठरवलं.

प्रोफेसर : तुझं कोडं मला सांगता आलं नही तर मी तुला दोन रुपये देईन.

खेडूत : पण मी तुमच्या एवढा शिकलेला नाहीय. म्हणून तुमचं कोडं मला सोडवता आलं नाही तर मी तुम्हाला एकच रुपया देईन. कबूल आहे?

प्रोफेसर : ठीक आहे, चालेल. सांग काय आहे तुझं कोडं?

खेडूत : असा कोणता प्राणी आहे, की जो साडेतीन पायावर चालतो?

प्रोफेसर : (विचार करून) अरे, मला तर याचं उत्तर काही येत नाही बुवा. जाऊ दे, हे घे २ रुपये आणि तूच सांग त्याचं उत्तर.

खेडूत : हा घ्या १ रुपया, मलाही त्याचं उत्तर येत नाही.

25 October 2010

स्वातंत्र्यसैनिक

एकदा प्रौढ शिक्षण वर्ग भरतो.

शिक्षक विचारतात, "सांगा पाहू, स्वातंत्र्यसैनिक कोणाला म्हणतात?"

एक म्हातारा उठतो आणि म्हणतो, "मास्तर, लग्नानंतर प्रत्येक माणसाला स्वातंत्र्यसैनिक म्हणतात."

मतदान

एकदा आमदारपदाची निवडणूक होते. मतदान मोजणी झाल्यानंतर एका आमदाराला धक्काच बसतो.

तो विचारात पडतो. त्याला समजतच नाही,


तो म्हणतो, "च्यामारी, कोण होता तो ज्याने एकट्याने मला मत दिलं."

24 October 2010

Google



गुगल फार वेगवान search engine असेलही, पण ते काही तुम्हाला तुमची देवळात हरवलेली चप्पल शोधून देऊ शकत नाही.



दात आणि जीभ

एकदा दात जिभेला म्हणतो, "मी जर तुला जोरात चावलो, तर तुझे तुकडे होतील."

जीभ दाताला म्हणते, "मी जर एखादयाबद्दल एक चुकीचा शब्द उच्चारला तर एकाच वेळी तुम्ही सर्व ३२ च्या ३२ बाहेर याल."

शहाणे कोण ?

प्राध्यापक : मूर्ख लोक खूपच प्रश्न विचारतात आणि काही वेळा इतके की शहाणासुद्धा वेड्यात निघतो.



विद्यार्थी : तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे सर, परीक्षेच्या वेळी आम्हाला याचा अनुभव येतो.

23 October 2010

अवघड विषय

परीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका पाहून असे वाटले की हा पेपर खूपच अवघड आहे, तर एक काम करा.

शांतपणे डोळे मिटा.

मनातल्या मनात स्वत:ला सांगा,

"हा विषय खूप खूप रोचक आणि चांगला आहे;

आणि म्हणूनच,



मला तो पुन्हा द्यायचा आहे."

22 October 2010

MATHS म्हणजे काय ?

प्राध्यापक : MATHS म्हणजे काय ?

















विद्यार्थी : Mentally Affected Teacher Harassing Students.

20 October 2010

अंडे

एकदा एका पोल्ट्री फार्मचा मालक तावातावाने पोल्ट्रीत जातो आणि कोंबड्यांना म्हणतो, "तुम्ही जर रोज २-२ अंडी नाही दिलीत तर मी तुम्हा सगळ्यांना कापून टाकीन."

दुसर्‍या दिवशी तो जाऊन बघतो तर काय, सगळ्या कोंबड्यांनी २-२ अंडी दिलेली. एकानेच फक्त १ अंड दिलेलं.
तो रागाने विचारतो, "तु एकाच अंड का दिलस?"

प्रतिक्रिया : अहो बॉस, हे जे १ अंड दिलय न ते पण तुमच्या भीतीने दिलय. मी तर एक कोंबडा आहे.

17 October 2010

दोन हात

एकजण आपल्या मित्रांना सांगत होता, "अरे, काल काय झालं माहितीये; काल माझी बायको चक्क आपल्या गुडघ्यांवर चालत आली माझ्याकडे."

मित्र : कसं काय रे, हे कसं शक्य आहे? आम्ही तर वहिनींना चांगलच ओळखतो. बरं मग पुढं काय झालं?

पहिला  : अरे, ती आली अन मला म्हणते कशी, "मुकाट कॉटखालून बाहेर या आणि चांगलं माणसासारख दोन हात करा माझ्याशी."

16 October 2010

सरदारजी बनतो शिक्षक

एक सरदारजी एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू होतो.

पी.टी. चा तास चालू असताना त्याच्या लक्षात येतं की सर्व मुले फूटबॉल खेळत आहेत, परंतु एक मुलगा मात्र बाजूला शांतपणे उभा आहे.

सरदारजी त्या मुलाकडे जाऊन त्याला विचारतो, "का रे बाळा, तू का खेळत नाहीयेस?"

तेव्हा तो मुलगा मात्र सरदारजीकडे नाराजीने, वैतागलेल्या सुरात पाहत म्हणतो, "सर, मी गोलकीपर आहे."

किती वाजले

एकदा रस्त्याने जाणारा सरदार एका वाटसरुला वेळ विचारतो.

वाटसरु : आता बघा, ४ वाजून ३० मिनिटे झाली आहेत.


सरदार (वैतागून) : काय पण लोकं आहेत, सकाळपासून मी जवळजवळ २०-२५ लोकांना हा प्रश्न विचारला, पण प्रत्येकाने वेगवेगळं उत्तर दिलं.

15 October 2010

न्यूटनचे नियम

सफरचंदाची कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण न्यूटनने २ रा आणि ३ रा नियम कसा शोधला माहितीये ?


तो शेळ्या वळत असताना त्याने एका शेळीला "F" एवढा force लावला तर शेळी जोरात ओरडली, mA.
म्हणून न्यूटनने निष्कर्ष काढला : F = mA


पण लगेच शेळीने त्याला लाथ मारली.

तेव्हा न्यूटनला समजलं : For every action, there is equal & opposite reaction.

14 October 2010

तुम्ही वेडे आहात...

तुम्हाला जर कुणी वेडा म्हणाले, 

तर अजिबात दु:खी होऊ नका,
अजिबात रडू नका,
अजिबात घाबरू नका,
अजिबात रागाऊ नका,
अजिबात नाराज होऊ नका,



फक्त एकच करा,
एक ग्लास थंड पाणी घ्या,
आणि विचार करा,








च्यायला, ह्याला कसं काय कळलं.

कॉम्प्लिमेंट

एकदा एका पती-पत्नीला चांगला मराठी चित्रपट पाहायला जायचे होते.
पत्नी बराच वेळ मेकअप करीत होती. पण तिचं मन काही समाधानी नव्हतं.

पत्नी (आरशात बघत) : अहो, आजकाल का कुणास ठाऊक पण मला अगदीच जाड झाल्यागत, वयस्कर आणि ठेंगण असल्यागत वाटतय. माझा तर मुडच गेलाय अगदी. माझा मूड ठीक करण्यासाठी एखादी कॉम्प्लिमेंट द्या की मला.

पती : अरे वा, तुझी नजर अगदी छान आहे या वयात.

13 October 2010

अंतिम इच्छा

एकदा एक कंजूस मारवाडी मरतो.

मरण्यापूर्वी तो आपल्या तीनही मुलांना जवळ बोलवतो आणि त्यांना म्हणतो, "मुलांनो, असं म्हणतात की मरताना माणूस आपल्याबरोबर काहीही घेऊन जात नाही. ही भावना मात्र मी आता खोटी ठरवणार आहे. माझ्याकडे ३ लाख रुपये आहेत. मी ते १ - १ लाख असे तीन लिफाफ्यांत भरले आहेत. मी प्रत्येकाला १-१ लिफाफा देणार आहे. माझी अंतिम इच्छा आहे, की तुम्ही माझे दफन करताना ते लिफाफे माझ्या थडग्यात टाकावेत."

वडिलांच्या अंतिम इच्छेप्रमाणे ते तिघेही आपापले लिफाफे अंतिम विधीच्यावेळी थडग्यात टाकतात.

परत येताना  थोरला मुलगा म्हणतो, "मला मुलांच्या शिक्षणासाठी ४०००० लागत होते, म्हणून मी थडग्यात केवळ ६०००० रुपयेच टाकले."

मग मधला मुलगा म्हणतो, "मला नवीन धंद्यासाठी ६०००० रु हवे होते, म्हणून मी थडग्यात केवळ ४०००० टाकले."

नंतर धाकटा मुलगा म्हणतो, "तुम्ही वडिलांना दिलेला शब्द पाळला नाहीत, पण मी मात्र पाळला. मी थडग्यात पूर्ण १ लाखांचा चेक टाकून आलोय."

कशी जिरवली

नागपूरची एक वृद्ध व्यक्ती आपल्या मुलाकडे पुण्यात राहायला येते.

रोज सायंकाळी तो वृद्ध आपल्या बाजूला राहणार्‍या नाडकर्ण्यांसोबत सारसबागेतफिरायला जातो.
तो वृद्ध नेहमी आपल्या नागपुरी स्टाइलमध्ये सगळ्यांना बोलून बोलून बेजार करतो.

एक दिवस तो बोलता बोलता म्हणतो, "अहो, तुम्हाला माहीत आहे काय, जगातले सगळे शास्रज्ञ यावर संशोधन करत आहेत की माणूस मेंदूशिवाय किती काळ जिवंत राहू शकतो."

यावर नाडकर्णी म्हणतात, "अहो, मग त्यात संशोधन करण्यासारख काय आहे? तुम्ही त्यांना तुमचं वय का नाही सांगत."

छगनचं धाडस

एकदा वेड्यांच्या इस्पितळातील डॉक्टर ठरवतात की वेड्यांची मानसिक स्थिती टवटवीत राहण्यासाठी एक सहल काढायची.
ठरल्याप्रमाणे सहल जाते निसर्गरम्य अशा ठिकाणी. ते जातात धरण पाहायला.

पण तिथे भलतेच घडते. बबन नावाचा वेडा पाण्यात पडतो. त्यावेळी छगन नावाचा वेडा पाण्यात उडी मारून त्याचे प्राण वाचवतो.

सर्व डॉक्टर छगनचे कौतुक करतात. त्याला नीट झाल्याचे समजून इस्पितळातून घरी सोडतात.

ही बातमी जेव्हा सिनीयर डॉक्टरांना समजते, तेव्हा ते छगनच्या घरी जातात.

ते छगनला म्हणतात, "अरे छगन, तू तर अतिशय धाडसाचं काम केलंस. पण त्या बिचार्‍या बबनचं नशीबच खराब म्हणावं लागेल, तू त्याला वाचवलस आणि त्याने फाशी घेऊन आत्महत्या केली बघ."

त्यावर छगन म्हणतो, "अहो डॉक्टर, मीच त्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सुकण्यासाठी खुंटीला टांगल होतं."

11 October 2010

काहीच नाही

भिकारी : साहेब, एक रुपया द्या की.
साहेब : नाहीयेत, पुढे जा.
भिकारी : साहेब, मग एक भाकरीचा तुकडा द्या ना.
साहेब : ए बाबा, सांगितलं ना एकदा नाही म्हणून.










भिकारी : साहेब, मग एक वाडगा हातात घ्या, आणि चला माझ्याबरोबर.

10 October 2010

मीटर बंद

एकदा एक कंजूस मारवाडी रिक्षातून प्रवास करीत असतो.

अचानक रिक्षाचे ब्रेक फेल होतात.

रिक्षा ड्रायव्हर : सर, रिक्षाचे ब्रेक फेल झालेत. काय करू?


मारवाडी : अरे मूर्खा, पहिलं मीटर बंद कर.

तिकीट तिकीट

एक साधू रेल्वेने प्रवास करत असतो. तेवढ्यात तिकीट चेकर येतो.


चेकर साधूला विचारतो, "कुठे जायचय?"
साधू : जिथे रामाचा जन्म झाला होता, तिथे; अयोध्येला.


चेकर : बरं ठीक आहे, तिकीट दाखवा.
साधू : तिकीट तर नाहीय.




चेकर : चला मग.
साधू : कुठे?


चेकर : जिथे कृष्णाचा जन्म झाला होता, तिथे; जेलमध्ये.

09 October 2010

वाचन

एकदा एक वाचक लायब्ररीत जातो. तो लायब्ररीयनला विचारतो, "अहो, आत्महत्येवरचं पुस्तक मिळेल का?"

लायब्ररीयन : हो, मिळेल की. पण ते मी तुम्हाला नाही देऊ शकत.

वाचक : का हो, का ?

लायब्ररीयन : कारण मला ते परत मिळणार नाही म्हणून.

लग्नाला विरोध

एकदा हत्ती बकरीच्या प्रेमात पडतो.

पण बकरीच्या घरचे या लग्नाला कडाडून विरोध करतात.

का?


कारण,



मुलाचे दात बाहेर आलेले आहेत म्हणून.

08 October 2010

उपचार

रुग्ण : डॉक्टर साहेब, मला नक्की निमोनियाच आहे ना.

डॉक्टर : हो, हो, तुम्हाला नक्की निमोनियाच आहे. एवढं घाबरून जाऊ नका.

रुग्ण : अहो डॉक्टर, मी एका रुग्णाबद्दल असं ऐकलंय, की त्याला निमोनिया होता. डॉक्टर तसा उपचार करत होते, पण नंतर डॉक्टरांच्या लक्षात आले की, त्याला टायफॉइड होता. तो रुग्ण मग मेला.

डॉक्टर : काही काळजी करू नका,माझ्यासोबत असं होत नाही कधी. माझ्या रुग्णाला निमोनिया झाला असेल, तर तो निमोनियानेच मरतो.

रिक्षाचे भाडे

एकदा एक कंजूस मारवाडी रिक्षाने प्रवास करतो.

रिक्षाचे भाडे होते १०० रुपये.

रिक्षावाला : साहेब, १०० रुपये झाले.
मारवाडी ५० रुपयांची एक नोट काढतो आणि रिक्षावाल्याच्या हातावर टेकवतो.

रिक्षावाला : साहेब, ही तर गुंडगिरी आहे. मीटरप्रमाणे १०० रुपये झालेत.

मारवाडी : ए भाय, तू पण या रिक्षात माझ्याबरोबर बसून आले ना. मग तुझा पैसा पण मीच द्यायचे काय.

अपघात

एक मोठ्ठा अपघात होतो.

तिथे पडलेला एक माणूस जोरजोराने ओरडत असतो. देवा रे देवा, माझा डावा हात गेला रे.

तेवढ्यात संता त्याला म्हणतो, "अरे ओरडू नकोस, तुझा तर फक्त डावा हातच गेलाय. तिकडे बघ त्या माणसाचं डोकच गेलय, तरी तो एक शब्दही बोलत नाहीये."

बहिरा

जीवशास्राचे प्राध्यापक मोठ्या जोशात मुलांना शिकवत असतात.

ते मध्येच एका मुलाला एक प्रश्न विचारतात. बिचारा मुलगा गोंधळलेला असतो.

प्राध्यापक : ऐकू येत नाही अशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणाल?

मुलगा : सर, त्याला तुम्ही काहीही म्हणा. त्याला ऐकुच येणार नाही.

05 October 2010

धन्यवाद

एक दारुड्या फुल्ल दारू पिऊन रस्ता आणि फुटपाथवर एक एक पाय टाकत, डुलत डुलत चालला होता.





एका हवालदाराने त्याला दरडावून विचारले, "चालता येत नाही एवढी दारू कशाला पिलास रे मूर्खा ?"

दारुड्या : धन्यवाद हवालदार साहेब, तुम्ही मला सांगितल्याबद्दल.
              मला वाटले, मी लंगडा झालोय.

04 October 2010

मोठ्ठं आव्हान

संता : सगळ्यात मोठ्ठं आव्हान कोणतं?




बंता : पूर्ण पेपर कोरा ठेवायचा आणि त्याखाली लिहायचं, "हिम्मत असेल तर पास करून दाखवा."

मेहनत की रोटी

विश्वासराव : खूप मार लागलेला दिसतोय तुम्हाला. नेमकं सांगा तरी काय झालं?

अशोकराव : काय सांगू, रात्री चोरट्यांनी अडवल.

विश्वासराव : अहो, मग देऊन टाकायचं ना मग सगळं काही. कशाला उगीच मार खाल्ला?

अशोकराव : अहो, मी म्हणालो, माझ्याकडचं सगळं घ्या. मी दागिने, पैसे, चेन, घड्याळ, अंगठी आणि अगदी चष्मासुद्धा काढून दिला हो.

विश्वासराव : आणि तरी मग तुम्हाला कसं काय मारलं?

अशोकराव : अहो, नाही नाही म्हणत असतानाही चोर म्हणतात कसे, "हम मेहनत की रोटी खाते है, फुक्कट की नही."

03 October 2010

कमाई

तीन मित्र असतात. एकाचे वडील वकील, दुसर्‍याचे डॉक्टर आणि तिसर्‍याचे मंत्री असतात.
त्यांची आपल्या वडिलांच्या दिवसभरातील कमाईबाबत चर्चा चालू असते.

वकिलाचा मुलगा : माझे वकील सकाळी कोर्टात जातात, संध्याकाळी येताना ते जवळपास ३००० रुपये कमवून  आणतात.

डॉक्टरचा मुलगा :  माझे वडील एक ऑपरेशन करतात आणि केवळ तीन तासात १०००० रुपये कमवून आणतात.

मंत्र्याचा मुलगा : हे तर काहीच नाही, माझे वडील केवळ २० मिनिटांचे भाषण देतात आणि एवढा पैसा गोला करतात की तो घरी आणायला ४ माणसे पुरत नाहीत.

01 October 2010

देव कुठे आहे ?

गुरुजी मुलांना विचारतात, "सांगा पाहू, देव कुठे आहे ?"


सगळी मुलं विचार करू लागतात.
तेवढ्यात बंड्या म्हणतो, "सर, माझ्या वडिलांनी पाहिलाय. ते रोज सकाळी उठून बाथरूमसमोर थांबतात आणि म्हणतात; "अरे देवा लवकर बाहेर ये."

दान


एका मारवाड्याकडे पैसे नसल्याने तो जाम वैतागला होता. त्याने कळवळून देवाची प्रार्थना केली.

हे भगवान, मला शंभर रुपये दिलेस, तर त्यातले पन्नास रुपये मी तुझ्या दानपेटीत टाकीन.

थोडे पुढे गेल्यावर त्या मारवायाला पन्नास रुपयांची नोट सापडते.

नोट उचलत मारवाडी म्हणाला, हे भगवान, माझ्यावर एवढाही विश्वास नाही? आपले पन्नास रुपये आधीच कापून घेतलेस !

मित्राचा खून


न्यायाधीश : का रे, तु तुझ्या मित्राचा खून दगडाने ठेचून ठेचून का केलास?

आरोपी : सायब, आमी गरीब माणसं ! आमच्याकडं रायफल, बंदूक कशी असणार? दगड फुकटात मिळत्यात. म्हणूनशान मी त्याला ठेचूनच मारला बगा.

सारेगमप



एक छोटा डास त्याच्या आईला विचारतो, मी गाण्याच्या कार्यक्रमाला जाऊ का?

आई : कोणता कार्यक्रम आहे?

छोटा डास : पल्लवी जोशींचा सारेगमप कार्यक्रम.

आई : जा, पण जरा सांभाळून रहा. कारण तिथे लोक सारखे टाळ्या वाजवित असतात.

मी भारतीय


काळोखातून आवाज आला, “थांब, कोण आहे रे तिकडे?”

उत्तर आले, “मी भारतीय.”

मग ‘जण-गण-मन’संपूर्ण म्हणा.


“मला संपूर्ण येत नाही.”




“ठीक आहे, म्हणजे तुम्ही नक्कीच भारतीय आहात; तुम्ही जाऊ शकता.”

रात्री


शिक्षक : मुलांनो, सांगा पाहू एका वर्षात कोटी रात्री येतात? बंड्या तु सांग.

बंड्या : सर, दहा !

शिक्षक : दहा? फक्त दहा? कशा ते सांग पाहू.

बंड्या : सर, नऊ नवरात्री आणि एक महाशिवरात्र !!!

गावचा सरपंच

पहिला वेडा : मी आपल्या गावचा सरपंच आहे.

दूसरा वेडा : तुला कोणी केल सरपंच?

पहिला वेडा : कोणी म्हणजे काय, प्रत्यक्ष परमेश्वरान केल.

दूसरा वेडा : काहीतरीच काय, मी कधी केल तुला सरपंच?

मुंग्या


तीन मुंग्या होत्या. त्या रस्त्याने चालल्या होत्या.

पहिली मुंगी : माझ्या मागे दोन मुंग्या आहेत.

दुसरी मुंगी : माझ्या पुढे एक आणि मागे एक मुंगी आहे.

तिसरी मुंगी माझ्या मागे दोन मुंग्या आहेत.

सांगा पाहू, कसे काय?

कारण, तीनही मुंग्या गोल गोल फिरत होत्या.

श्रेष्ठ


संता : सांग बर, हत्ती श्रेष्ठ की मुंगी श्रेष्ठ ?

बंता : मुंगी.

संता : कसे काय?
 
बंता: : मुंगी हत्तीच्या पायाखालून जाऊ शकते, पण हत्ती मुंगीच्या पायाखालून जाऊ शकतो का?

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...