एकदा एक खेडूत आणि प्रोफेसर यांची आगगाडीत भेट झाली.
वेळ घालवण्यासाठी एकमेकांना त्यांनी कोडं घालायचं ठरवलं.
प्रोफेसर : तुझं कोडं मला सांगता आलं नही तर मी तुला दोन रुपये देईन.
खेडूत : पण मी तुमच्या एवढा शिकलेला नाहीय. म्हणून तुमचं कोडं मला सोडवता आलं नाही तर मी तुम्हाला एकच रुपया देईन. कबूल आहे?
प्रोफेसर : ठीक आहे, चालेल. सांग काय आहे तुझं कोडं?
खेडूत : असा कोणता प्राणी आहे, की जो साडेतीन पायावर चालतो?
प्रोफेसर : (विचार करून) अरे, मला तर याचं उत्तर काही येत नाही बुवा. जाऊ दे, हे घे २ रुपये आणि तूच सांग त्याचं उत्तर.
खेडूत : हा घ्या १ रुपया, मलाही त्याचं उत्तर येत नाही.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.