Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label चोरीचा ऐवज. Show all posts
Showing posts with label चोरीचा ऐवज. Show all posts

02 August 2011

व्यवसाय


एकजण कुत्री विकायचा व्यवसाय करत असतो.

दुकानदार : (ग्राहकास) हा कुत्रा तुम्हाला काय पाहिजे ते देतो.

ग्राहक : मग तुम्ही त्याला का विकत आहात?

दुकानदार : काय सांगू? हरामखोर ssss एका रात्री तो कंदील घेऊन चोरट्यांना रस्ता दाखवत होता.


29 July 2011

दूरचा नातेवाईक

पोलीस रात्रीच्या गस्तीवर असताना संशयावरून एकाला पकडतात.

दुसर्‍या दिवशी चौकशीसाठी त्याच्या भावाला चौकीवर बोलावून घेतात.

पोलीस : हा तुझा कोण आहे?

आरोपीचा भाऊ : तो माझा दूरचा नातेवाईक आहे.

पोलीस : काय नातं आहे तुझं त्याच्याशी?

आरोपीचा भाऊ : तो माझा सख्खा भाऊ आहे?

पोलीस : (दरडावून) मग दूरचा नातेवाईक काय म्हणतोस?

आरोपीचा भाऊ : अहो म्हणजे, त्याच्या आणि माझ्यात सहा भावांचं अंतर आहे ना म्हणून.



23 July 2011

चोरों का राजा...



राष्ट्रकुल घोटाळा झाल्यावर सुरेश कलमाडी पुण्यातून रात्री फेरफटका मारत होते.

त्यांना एका अतिशय कुप्रसिद्ध चोर, लुटारूने अडवले.
त्याने मात्र कलमाडींना ओळखलंच नाही.

चोर : चल ए, काय असेल नसेल सगळे पैसे काढून दे गपचूप. चल चल...

कलमाडी : अहो महाशय, तुम्हाला माहितीये का मी कोण आहे ते?

चोर : मला नाही माहीत. पण त्याच्याशी काय करायचंय मला? गपचूप पैसे काढ.

कलमाडी : मी सुरेश कलमाडी आहे.

चोर : ठीक आहे, ठीक आहे. मला फक्त माझे तरी पैसे द्या.




04 October 2010

मेहनत की रोटी

विश्वासराव : खूप मार लागलेला दिसतोय तुम्हाला. नेमकं सांगा तरी काय झालं?

अशोकराव : काय सांगू, रात्री चोरट्यांनी अडवल.

विश्वासराव : अहो, मग देऊन टाकायचं ना मग सगळं काही. कशाला उगीच मार खाल्ला?

अशोकराव : अहो, मी म्हणालो, माझ्याकडचं सगळं घ्या. मी दागिने, पैसे, चेन, घड्याळ, अंगठी आणि अगदी चष्मासुद्धा काढून दिला हो.

विश्वासराव : आणि तरी मग तुम्हाला कसं काय मारलं?

अशोकराव : अहो, नाही नाही म्हणत असतानाही चोर म्हणतात कसे, "हम मेहनत की रोटी खाते है, फुक्कट की नही."

28 September 2010

चोरी

शेजारी : अहो भटजी महोदय, तुमच्याकडे काल चोरी झाली. तरी तुम्ही पोलिसांकडे तक्रार का नाही केलीत. तुम्ही नेमकी कशाची वाट पाहत आहात ?


भटजी : मुहूर्ताची.

पाकीटमाराचा पाठलाग

ओंकार : चोर माझं पाकीट घेऊन पळाला.

रमेश : अरे, तु तर तरबेज धावपटू आहेस. का नाही पकडलस त्याला.

ओंकार : मी माझ्या परीने प्रयत्न केला. मी धावत त्याच्यापुढेही गेलो, पण मागे वळून पाहतो तर चोर गायब.

24 September 2010

पाहुणा

चोरी करायला आलेल्या चोरांनी तिजोरीवरील पाटी वाचली, अन हसू लागले.

पाटी अशी होती. लक्षात ठेवा, पैसा हा घरचा पाहुणा आहे !

एका चोराला गंमत करण्याची लहर आली. 

त्याने पाटीखाली लिहिले, काळजी करू नका ! तुमचा पाहुणा आमच्याकडे खुशाल आहे.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...