कुलकर्णींच्या शेजारी नव्यानेच राहायला आलेले नाडकर्णी आपल्या सामायिक भिंतीवर खिळा मारत होते. बराच वेळ चाललेल्या ठोकाठोकीने कुलकर्णी थोडेसे वैतागले. काहीसे नाराजीच्या सुरात ते नाडकर्णींकडे गेले.
नाडकर्णी : आमच्या ठोकाठोकीने तुम्हाला त्रास झाला असेल नाही. त्याचं काय आहे, मला एक पेंटिंग भिंतीवर लावायचं होतं ना म्हणून एक खिळा ठोकावा म्हटलं.
कुलकर्णी : अहो काही हरकत नाही आमची, खुशाल ठोका की. मला फक्त एवढं विचारायचं होतं की खिळ्याच्या दुसर्या टोकाला आम्ही फ्रेम लटकवली, तर तुमची काही हरकत तर नाही ना...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.