Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label attitude. Show all posts
Showing posts with label attitude. Show all posts

08 June 2013

संशोधन म्हणजे काय?

जेव्हा आपण एखाद्या ठिकाणाहून किंवा मुळची एखाद्याची असलेली कल्पना चोरतो, तेव्हा तो कॉपीराईट कायद्याचा भंग ठरतो.


तर जेव्हा आपण अनेक ठिकाणांहून अशा अनेक कल्पना चोरतो, तेव्हा त्याला म्हणतात संशोधन.

17 July 2011

बदला

एक मुंगी रिक्षाने प्रवास करत असते.

रिक्षावाला : मॅडम तुमचा पाय आतमध्ये घ्या.

मुंगी : नाही हो. मला जर रस्त्यात हत्ती भेटला ना, तर एक जोरदार लाथ घालायची आहे त्याच्या केपटात; काल मला डोळा मारून गेला तो.

02 July 2011

अशीही माणसं असतात?

एक कंजूष मारवाडी असतो.

तो एकदा अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचं काम असल्यानं आणि ताबडतोब करायचं असल्यानं नाईलाज म्हणून विमानप्रवास करत असतो.

विमानाने उड्डाण करून काही अंतर पार केल्यावर विमान वादळात भरकटत. पायलटचं त्यावरील नियंत्रण सुटतं. आता कुठल्याही क्षणी विमान पडणार असतं.

विमानातील सगळे प्रवासी घाबरून जातात. पण फक्त मारवाडीच हसत असतो.

सगळे लोक त्याच्यावर जाम वैतागतात. इथे बाकीच्यांना जिवाची पडलीये आणि हा हसतोय???
ते त्याला कारण विचारतात.

मारवाडी : कारण, मी परतीच्या प्रवासाचं तिकिटच काढलं नव्हतं. तेवढे पैसे वाचले माझे.

08 June 2011

दृष्टीकोन महत्वाचा


नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीला ग्लास पाण्याने अर्धा रिकामा दिसेल,

तर

नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीला ग्लास पाण्याने अर्धा भरलेला दिसेल.

परंतु,

व्यावहारिक दृष्टिकोन असलेली व्यक्ती त्यात ६० मिलिलिटर व्हिस्की टाकून म्हणेल,चीयर्स !

03 May 2011

वरदान



बेंजोचा व्यवसाय असणारा एक व्यावसायिक डी.जे आल्याने तोट्यात गेलेला असतो. 
मग तो एक दिवस शंकराच्या देवळात जातो आणि म्हणतो, "देवा माझा बेंजोचा व्यवसाय पार बुडाला बघ. मला डी.जे. दे, देवा."

देव : अरे मूर्खा, माझ्याकडे डी.जे असता, तर मी डमरू घेऊन कशाला फिरलो असतो?

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...