Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label god. Show all posts
Showing posts with label god. Show all posts

05 July 2015

बाबाजी का ठुल्लू


एक १५० वर्षांचे आजोबा मृत्युनंतर स्वर्गात जातात.

तिथे सुंदर अप्सरांचे नृत्य पाहून अतिशय दु:खी होतात.

एक देव त्यांना विचारतो,का हो आजोबा, तुम्ही तर स्वर्गात आलात. तरीपण दु:खी का?


आजोबा : काय सांगू, पृथ्वीतलावर त्या बाबा रामदेवच्या नादी लागलो नसतो तर कधीचा इथे आलो असतो.


03 August 2014

देवाला धमकी

एक बेवडा गटारीच्या दिवशी फुल्ल टाईट होऊन चालला होता.

हलत-डुलत चाललेला असताना जोरात पाऊस चालू होतो.

बेवडा चिखलात पाय घसरून पडतो आणि तेवढ्यात वीज चमकते.


बेवडा : (घाबरून) हे महादेवा, मी चिखलात पडलो तर तू माझा फोटो काढून घेतलास? खबरदार माझ्या बायकोला दाखवला तर? मी गणपतीला किडनॅप करीन. 


26 April 2012

हरवलेली चप्पल शोधायचीय?


एकदा एक सरदार गुरुद्वारात पाया पडून आपल्या एका मित्राबरोबर मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी जातो.

दर्शन घेऊन बाहेर येतो आणि बघतो तर काय?

त्याची चप्पल चोरीला गेलेली असते.
सरदार रागाने लालबुंद होऊन थेट स्मशानात जाऊन बसतो.

सरदारचा मित्र : जाऊ दे यार. एवढं मनाला कशाला लावून घेतो. नवी चप्पल घेऊन टाक. नाहीतरी ती चप्पल काय तू मेल्यावर वर घेऊन जाणार होतास काय?

सरदार : नाही ना. म्हणूनच तर इथे आलोय. त्या चप्पलचोराचा इथं स्मशानात नंबर लागेलंच की. जाऊन जाऊन कुठे जाईल तो. त्याचीच वाट बघत बसलोय.

13 April 2012

रामाला नाही रजनीकांतला???

रावण आणि रामाचं तूफान युद्ध चालू असतं.

तेवढ्यात रावणाला रामाच्या मागे एक व्यक्ती दिसते.

त्या व्यक्तीला बघून रावण रामाला म्हणतो, “बाय बाय. नंतर भेटू.”

रावण तिथून धूम ठोकण्याच्या प्रयत्नात असतो.

लक्ष्मण रावणाला विचारतो, “काय रे भित्र्या, घाबरलास काय? लढ की आमच्याशी.”

रावण : काय राव, एवढ्याश्या गोष्टीसाठी रजनीकांतला बोलवायची गरज होती का?

10 April 2012

रजनीकांत आणि एलियन

रजनीकांत आपल्या मुलीच्या लग्नात स्वत:च सनई वाजवू लागतो.

तेवढ्यात एक उडती तबकडी लग्नमंडपाजवळ येते.

त्यातून एक एलियन हात जोडून रजनीकांतकडे विनवणी करतो.
एलियन : हे रजनीकांत देवा, मी आपणाला विनंती करतो की उद्या माझ्या मुलाचा पेपर आहे त्यामुळे आपण सनई जरा हळू आवाजात वाजवावी.

07 April 2012

रजनीकांत आणि बुजगावणं?

एक शेतकरी आपल्या शेतात एक बुजगावणं उभं करतो.

त्या बुजगावण्याला तो रजनीकांतच्या फोटोचा चेहरा लावतो.

...आणि काय आश्चर्य?

सगळे पक्षी त्यांनी मागच्या वर्षी धान्याचा नेलेला एक एक दाणा आणून शेतात टाकू लागले.

10 December 2011

अण्णा हजारे : जनलोकपाल आंदोलनानंतर

अण्णा हजारेंच्या गाजलेल्या जनलोकपाल आंदोलनानंतर केवळ भारतीय जनमानसावरच नव्हे तर देवावरही त्याचा प्रभाव पडलेला दिसून आला.

एकजण इंजिनीयर झाल्यावर आनंदाने उड्या मारत मिठाई घेऊन गणपतीच्या देवळात गेला.

विद्यार्थी : देवा, तुझी कृपा अशीच राहुदे माझ्यावर. हे १५१ रुपये आणि मिठाई आणली आहे मी तुझ्यासाठी. आता मला चांगल्या पगाराची नोकरी मिळू दे.

देव : ए मर्कटा, मारतोस काय मला. अण्णा हजारेंनी पाहिलं तर???...ती मिठाई आणि पैसे मागून दे, समोर ठेऊ नकोस.

19 July 2011

देवाचंच अपहरण

एक छोटा मुलगा एका चित्रपटात पाहतो की, त्यातल्या एका लहान मुलाला काही गुंड पळवून नेतात आणि त्याच्या आई-वडिलांना पैसे मागतात. मग आई-वडील पैसे देऊन आपल्या मुलाची सुटका करून घेतात.

हा पण मग अशीच भन्नाट युक्ती वापरुन सायकल मिळवायची असं ठरवतो.

तो शंकराच्या देवळात जातो आणि प्रार्थना करतो, "हे महादेवा, मला एक सायकल दे."

तो १ दिवस वाट पाहतो, पण सायकल काही मिळत नाही. मग दुसर्‍या दिवशी पुन्हा देवळात जातो.

आता मात्र तो देवळातली गणपतीची मूर्ती उचलून घेऊन घरी येतो.

देवळातून बाहेर पडण्यापूर्वी मात्र तो एक चिठ्ठी शंकराच्या पुढे ठेवून येतो.

ती अशी...

"जर तुला तुझा मुलगा सुरक्षित हवा असेल, तर उद्या सायकल घेऊन देवळाच्या मागे ये."

03 May 2011

वरदान



बेंजोचा व्यवसाय असणारा एक व्यावसायिक डी.जे आल्याने तोट्यात गेलेला असतो. 
मग तो एक दिवस शंकराच्या देवळात जातो आणि म्हणतो, "देवा माझा बेंजोचा व्यवसाय पार बुडाला बघ. मला डी.जे. दे, देवा."

देव : अरे मूर्खा, माझ्याकडे डी.जे असता, तर मी डमरू घेऊन कशाला फिरलो असतो?

02 April 2011

नान

संता हॉटेलमध्ये जेवायला जातो.

जेवण अतिशय स्वादिष्ट असल्याने तो अगदी दाबून जेवतो.

त्याने जवळपास १२-१३ नान म्हणजे बटर लावलेल्या रोटया हादडलेल्या असतात.

जेवण झाल्यावर त्याचं पोत चांगलंच दुखू लागतं.

तो स्वच्छतागृहात (टॉयलेटमध्ये) जातो आणि जोरजोरात देवाचा धावा करू लागतो, "हे भगवान, या तो जान निकाल दे या नान निकाल दे."



24 September 2010

बायको

एका माणसाची बायको हरवते. तो प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात जातो.

हे प्रभू, माझी बायको हरवलीये.

राम म्हणतो, अरे, बाजूच्या हनुमानाच्या मंदिरात जा. माझी बायकोपण त्यानेच शोधली होती.

मिसकॉल


बाळ जन्माला आल्यानंतर नर्सला म्हणाला, तुमच्याजवळ मोबाइल आहे का ?

नर्स : तुला कशाला हवाय मोबाइल ?
 
बाळ : देवाला मिसकॉल करायचाय. मी पोचलो म्हणून.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...