राबडीदेवीचा मृत्यू होतो आणि त्या यमसदनी जाताच तेथे त्या पाहतात की तेथे भिंतींवर खूप घड्याळे लावलेली असतात.
एवढी घड्याळे पाहून आपण यमसदनीच आलोय की घड्याळाच्या दुकानात असा त्यांना प्रश्न पडतो.
राबडीदेवी : अहो यमराज, ही कसली घड्याळे आहेत?
यमराज : ही घड्याळे मायावी आहेत. पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसासाठी आमच्याकडे एक घड्याळ याठिकाणी आहे. तो तो मनुष्य जेवढ्या वेळा खोटं बोलेल, तेवढ्या वेळा या घड्याळाचे काटे फिरतात.
राबडीदेवी : (एका घड्याळाकडे बोट दाखवून) हे कुणाचं घड्याळ आहे?
यमराज : गौतम बुद्धांचं. ते आयुष्यात कधीही खोटं बोलले नाहीत म्हणून त्यांच्या घड्याळावरचे काटे आजपर्यंत कधीच फिरले नाहीत.
राबडीदेवी : (दुसर्या एका घड्याळाकडे बोट दाखवून) आणि हे कुणाचं घड्याळ आहे?
यमराज : हे आहे अब्राहम लिंकन यांचं. ते आयुष्यात केवळ दोनदा खोटं बोलले म्हणून त्यांच्या घड्याळाचे काटे केवळ दोनदाच फिरलेत.
राबडीदेवी : अय्या, गंमतच आहे. (जिज्ञासेने) मग आमच्या लालूंचं घड्याळ कुठे आहे?
यमराज : हा हा हा. ते माझ्या शयनकक्षात आहे. मी त्याचा “सीलिंग फॅन” म्हणून वापर करतो.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.