एकदा वेटरच्या हातून चुकून
एका ग्राहकाच्या शर्टवर चहा सांडला आणि त्यामुळे तो ग्राहक जाम चिडला.
मालकाने त्या वेटरला चांगलेच
झापले.
तरीही तो ग्राहक काही शांत
होईना. मग तो मालकावरही तशाच प्रकारे भडकला.
मालक आपले पुणेरी.
वेटरला त्यांनी शांतपणे बोलावून
घेतलं.
वेटरला आपल्या तिरसट आणि करड्या
आवाजात म्हणाले, “हे बघ, हे फार मोठे शेठ आहेत. यापुढे ह्यांचा कुत्राजरी आपल्या
हॉटेलात आला, तरी साक्षात हे साहेबच आलेत असं समजून ह्यांचा पाहुणचार
करायचा. समजलं?”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.