एकदा दोन कामगार कामाच्या प्रचंड ताणामुळे वैतागलेले
असतात.
एकजण दुसर्याला म्हणतो, “हुश्श, खूप थकलोय. हा मॅनेजर काही सरळ सरळ मागून एक
दिवसाची सुट्टी देईल असं वाटत नाही. बघ मी आता काय करतो ते.”
असं म्हणून तो डोकं खाली अन पाय वर अशारीतीने पंख्याच्या
हुकला लटकतो.
हे मॅनेजर पाहतो आणि त्याला म्हणतो, “हे काय रे? काय चाललंय हे?”
कामगार : साहेब मी बल्ब झालोय.
मॅनेजर : जास्त काम करून तुझ्या डोक्यावर परिणाम
झालेला दिसतोय. असं कर, आजच्या दिवस सुट्टी घे.
मग हा कामगार त्या मॅनेजरला धन्यवाद देऊन दुसर्या
कामगाराकडे बघून स्मितहास्य करत निघून जातो.
पण दूसरा कामगारही काही कमी नसतो.
तो पण ह्या पहिल्या कामगाराच्या मागे मागे चालायला
लागतो.
हे पाहून मॅनेजर त्याला विचारतो, “तुला सुट्टी दिलेली नाहीये. तू कुठे चाललास?”
दूसरा कामगार : साहेब, मी अंधारात काम नाही करू शकत.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.