एक माणूस दुकानात जातो आणि दुकानदाराला एका
वस्तूकडे बोट दाखवून विचारतो, “हा फ्रीज केवढ्याला?”
दुकानदार : आम्ही निरक्षर लोकांना वस्तू विकत
नाही.
मग तो माणूस घरी जातो आणि दुसर्या दिवशी केस
कापून, दाढी करून आणि मस्त पावडर लावून दुकानात जातो. पुन्हा दुकानदाराला तोच
प्रश्न विचारतो.
पण दुकानदार पुन्हा तेच उत्तर देतो.
पुन्हा तो माणूस घरी जातो, नवीन कपडे घालतो आणि परत येतो. पुन्हा दुकानदाराला विचारतो, “हा फ्रीज केवढ्याला?”
तरी पण दुकानदार तेच उत्तर देतो.
मग तो माणूस वैतागून दुकानदाराची गचांडी धरतो
आणि म्हणतो, “काय रे भामटया? नीट
सांगतो का कच्चा खाऊन टाकू?”
दुकानदार गयावया करत म्हणतो, “अहो साहेब, तो फ्रीज नाही,
वाशिंग मशीन आहे.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.