एक नागपूरकर कुटुंब सदाशिव पेठेत नुकतेच राहायला आलेले असते.
बाजूला राहणारे नाडकर्णी एक दिवस त्यांच्याकडे सहज गप्पा मारायला जातात.
नागपूरकरांच्या घरात एक मोठ्ठं कपाट वेगवेगळ्या विषयांवरील वाचनीय अशा पुस्तकांनी भरलेलं दिसतं.
नाडकर्णी हे एक उत्तम वाचक असतात. ते नागपूरकरांना विनंती करतात.
नाडकर्णी : अहो मी हे शिवाजीराव भोसलेंचं पुस्तक घेऊन जाऊ का? २-४ दिवसांत वाचून परत आणून देईन.
नागपूरकर : माफ करा. त्याचं काय आहे, मी माझ्या घरातील कोणतीही वस्तु कुणाला बाहेर नेऊ देत नाही. मी काही तुम्हाला नाही म्हणत नाही पुस्तक वाचायला. या खोलीत बसून एकच काय सगळीच्या सगळी पुस्तके वाचा, माझी काहीही हरकत नाही.
नाडकर्णी : बरं बरं. आता वेळ नाहीये, नंतर निवांत येईन.
असेच काही दिवस जातात. नाडकर्णी पुन्हा तिकडे फिरकतही नाहीत.
एक दिवस मग नागपूरकर नाडकर्णीच्याकडे येतात.
नागपूरकर : अहो नाडकर्णी, जरा झाडू हवा होता.
नाडकर्णी : माफ करा. त्याचं काय आहे, मी माझ्या घरातील कोणतीही वस्तु कुणाला बाहेर नेऊ देत नाही. मी काही तुम्हाला नाही म्हणत नाही झाडू द्यायला. या खोलीत किती झाडू मारायचाय तेवढा मारा आणि हो, हीच खोली काय पण सगळ्या खोल्या जरी झाडून घेतल्या तरी माझी काहीच हरकत नाही.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.