एकदा कपिल सिब्बल आपले केस कापण्यासाठी एका सलूनमध्ये जातात.
न्हावी केस कापायला चालू करतो.
केस कापता-कापता तो कपिल सिब्बलना विचारतो, “साहेब, हा काळ्या पैशांचा मामला काय आहे?”
कपिल सिब्बल : तुला काय करायचंय? गप केसं कापायचं काम कर.
थोडा वेळ जातो. पुन्हा एकदा...
न्हावी : साहेब, हे स्विस बँकेचं काय लफडंय ओ?
कपिल सिब्बल : तू फक्त केस कापायचं काम कर. जास्त शहाणपणा दाखवू नकोस.
न्हावी थोडा वेळ शांतपणे केस कापतो. पुन्हा एकदा...
न्हावी : अहो साहेब, हे अण्णा आणि रामदेवबाबा तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप का करतात बरं?
कपिल सिब्बल (वैतागून) : का रे, तू माझी चौकशी घेतोस काय? तू काय त्या अण्णा-रामदेवबाबाचा एजंट आहेस का?
न्हावी : तसं नाही साहेब. त्याचं काय आहे, तुम्हाला असले प्रश्न विचारले की मग तुमच्या डोक्यावरचे केस उभे राहतात आणि मग ते कापायला सोप्पं जातं म्हणून विचारतोय.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.