अण्णांच्या आंदोलनानंतर प्रत्येक नागरिक आपापल्या प्रकारे सरकारचा निषेध करत आहे.
असाच एकजण एका पोलीस चौकीच्या बाहेर उभा राहून घोषणा देऊ लागला..."पंतप्रधान मूर्ख आहे, पंतप्रधान मूर्ख आहे, पंतप्रधान मूर्ख आहे."
पोलिसांनी त्याच्या घोषणा ऐकल्या आणि अजून जमाव होऊन परिस्थितीने वेगळंच वळण घेऊ नये म्हणून त्याला हटकले.
तर तो माणूस (बचावाच्या पवित्र्यात) पोलिसांना म्हणाला, "मी तर रशियाचा पंतप्रधान मूर्ख आहे, अशा घोषणा देत होतो."
हवालदार हे ऐकून त्या माणसाच्या दोन कानाखाली वाजवत म्हणाला, "तुला काय वाटलं??? आम्हाला माहीत नाही, कुठला पंतप्रधान मूर्ख आहे ते???"
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.