एकदा दोघे प्रवासी पुणे दर्शनाला पुण्यात आलेले असतात.
तेव्हा रात्री मुक्काम करायला ते भाड्याची एखादी खोली मिळते का ते शोधत असतात.
ते सदाशिव पेठेतील एका वाड्याजवळ येऊन पोचतात.
ते तिथेच उभ्या असलेल्या एका वृद्ध आजोबांना विचारतात, “अहो आजोबा, इथे आम्हाला मुक्कामासाठी एखादी भाड्याची खोली मिळेल का?”
आजोबा चष्म्याच्या वरून दोघांकडे खालून वरपर्यंत आणि मग वरून खालपर्यंत असा काही हिणवल्यासारखा कटाक्ष टाकतात की ते दोघे प्रवासी एकदम बिचकतात.
आजोबा त्यांना एका पडक्या वाड्याची खोली दाखवतात.
ती खोली पाहून त्यातला एक प्रवासी म्हणतो, “अहो, ही कसली खोली? हा तर गोठा आहे गोठा.”
आजोबा त्याच्याकडे पुन्हा एक कटाक्ष टाकतात.
मग दूसरा प्रवासी म्हणतो, “बरं असू देत. गोठा तर गोठा. या खोलीचे भाडे किती आजोबा?”
आजोबा : एका बैलाचे ३०० रुपये आणि दोन बैलांचे ५०० फक्त.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.