साठे सरांच्या बाजूला एक नागपूरकर कुटुंब राहायचं.
साठे सरांचा मुलगा सकाळी नाश्ता करायला बसला की ह्या नागपूरकरांचा पोरगा कुठून तरी वास आल्यासारखा सरांच्या घरी यायचा.
आजपण तो आला.
मुलगा : काकू, राजू आहे का घरी?
साठे सरांची बायको : हो आहे ना. आताच तयार झालाय. नाश्ता करतोय. जरा थांब हं. बरं, तुला भूक लागलीय ना?
मुलगा : हो हो.
आता साठे सरांनी ओळखलं की आता आपली बायको ह्याला ४ चपात्या वाढणार आणि हा सोकावलेला बैल निर्लज्जाप्रमाणे हादडणार.
मग ते प्रसंगावधान राखून म्हणाले, “अरे बाळ, मग आमच्या राजुचा नाश्ता होईपर्यंत घरी जाऊन तूही नाश्ता करून ये बघू.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.