एक
पुणेकर म्हणजे जोशीकाका आणि एक नागपुरकर काका शेजारी शेजारी राहत असतात, पुण्यात.
एक
दिवस नागपूरकर काकांच्या घरी पाहुणे येतात.
ते
चुकून चपला जोशीकाकांच्या दरवाजासमोर काढतात.
हे
नवे लोक असल्याने एकदम चपला भिरकावून देण्यापेक्षा यांना पुण्याचे नियम सांगावे म्हणून
जोशीकाका नागपूरकर काकांच्या घरी तावातावाने जातात.
जोशीकाका : हे बघा. तुमच्या पाहुण्यांनी आमच्या घरासमोर चपला काढल्यात. त्या आधी उचला नाहीतर
त्या मिळवण्यासाठी कचरा-डेपोत जावे लागेल आणि पुन्हा असले नखरे आम्ही खपवून घेणार नाही.
तुम्हाला चांगला सज्जन समजत होतो मी आणि तुम्हाला एवढं कळत नाही?
नागपूरकर
काका : अहो जोशी, मीपण तुम्हाला चांगला सज्जनच समजत होतो.
जोशीकाका : हो. तुम्ही बरोबरच समजत होतात. चूक माझीच झाली.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.