Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label weight. Show all posts
Showing posts with label weight. Show all posts

25 April 2012

जड खिसा...


सरदार एक दिवस एक दगड खिशात घालून चाललेला असतो.

त्याचा मित्र विचारतो, “हा काय मूर्खपणाय? खिशात दगड घेऊन का हिंडतोयस?”

सरदार : अरे मूर्खा, तुला माहीत नाही का? आजकाल ज्याचा खिसा जड असतो, त्याचीच चलती असते.

29 June 2011

झीरो फिगर


एक जाडजूड बाई आपलं वजन कमी व्हावं म्हणून दवाखान्यात येऊन म्हणते की तिला करीना कपूरसारखं झीरो फिगर व्हायचंय.

बाई : डॉक्टरसाहेब, तुम्ही माझं वजन कमी व्हावं म्हणून दिलेल्या ह्या गोळ्या मी दिवसातून किती वेळा घ्यायच्या?

डॉक्टर : ५० वेळा.

बाई : (घाबरून) ५० वेळा ? अहो, वेड-बिड लागलंय की काय तुम्हाला? तुम्ही डॉक्टरच आहात ना?

डॉक्टर : खायच्या नाही हो. ह्या गोळ्या तुम्ही फक्त ५० वेळा जमिनीवर टाकायच्या आणि उचलायच्या, झीरो फिगरसाठी हेच करावं लागतं.

06 April 2011

लठ्ठपणा कमी करायचाय तर...

खाऊन-पिऊन, एकाजागी बसून लठ्ठ झालेला संता मग एक दिवस डॉक्टरकडे जातो.

संता : डॉक्टर, मला माझं वजन कमी करायचंय. काहीतरी उपाय सांगा.

डॉक्टर : रोज कमीत कमी १० किलोमीटर पळा. किमान ३० दिवस हा उपक्रम चालू ठेवा आणि मग माझ्याकडे या.

३० दिवसांनी संताचा डॉक्टरांना फोन येतो.

संता : धन्यवाद डॉक्टर. माझं वजन कमी झालं. पण मी मात्र माझ्या घरापासून ३०,००० किलोमीटर दूर येऊन पोचलोय.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...