गुरुजी शाळेत विद्यार्थ्यांना समजावून सांगतात की रोज वर्तमानपत्र वाचल्याने चालू घडामोडींची माहिती मिळते. या जगात कसं जगायचं ते कळतं.
बंड्या दुसर्याच दिवसापासून वर्तमानपत्र चालू करतो.
तिसर्या दिवशी शाळेत गेल्यावर...
बंड्या : गुरुजी, तुम्ही आम्हाला रोज रोज काहीही प्रश्न विचारता. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. बघू तुम्हाला उत्तर येतंय का?
गुरुजी : ठीक आहे, विचार.
बंड्या : सांगा पाहू, की सरकारने मतदान करता यावे म्हणून नागरिकाचे वय १८ वर्षे असल्याचा कायदा केला आहे. पण लग्नाचं वय मात्र २१ वर्षे केलेलं आहे. असं का?
गुरुजी : (जरा डोकं खाजवतात) कारण माणूस १८ वर्षांनी सज्ञान होतो म्हणून.
बंड्या : मग लग्नाचं वय पण १८ वर्षेच असायला पाहिजे ना?
गुरुजी : (जरा विचार करून) हो, हो, बरोबर आहे.
बंड्या : पण तसं नाही गुरुजी, जरा विचार करून सांगा.
गुरुजी : (डोक्यावरची टोपी काढून बोटांची वाढलेली पाचंही नखं पांढर्या केसांत घालून थोडा वेळ खाजवतात) हरलो बुवा. तूच सांग.
बंड्या : कारण, सरकारलाही माहीत आहे की कमी वयातही देश सांभाळणे हे बायको सांभाळण्यापेक्षा सोप्पं आहे.

No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.