Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label barbar. Show all posts
Showing posts with label barbar. Show all posts

03 August 2014

कृतज्ञ न्हावी

एकदा एक बौद्ध भिक्षू न्हाव्याकडे केस कापायला जातो.
न्हावी त्याचा चमन गोटा करून देतो. भिक्षू त्याला पैसे देतो परंतु न्हावी ते नाकारतो.
न्हावी म्हणतो, “तुम्ही सद्गृहस्थ आहात. तुम्ही देवाचे काम करता. मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाही.”
दुसर्‍या दिवशी जेव्हा न्हावी दुकानात येतो, तेव्हा त्याला एक अनामिक व्यक्ती बौद्धांच्या धार्मिक ग्रंथांच्या २१ प्रती भेट म्हणून देऊन जातो.

मग न्हाव्याकडे एक पोलीस केस कापायला येतो आणि केस कापून झाल्यावर “तुम्ही जनतेला संरक्षण देता असे म्हणून पोलिसाने देऊ केलेले पैसे नाकारतो.”
दुसर्‍या दिवशी जेव्हा न्हावी दुकानात येतो, तेव्हा त्याला एक अनामिक व्यक्ती मिठाई आणि खमंग जेवणाची थाळी देऊन जाते.

मग न्हाव्याकडे एक वकील केस कापायला येतो. केस कापून झाल्यावर “तुम्ही न्यायदानाचे पुण्यवान काम करता तेव्हा मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकत नाही असे म्हणून वकिलाने देऊ केलेले पैसे नाकारतो.”


दुसर्‍या दिवशी तो वकील आपल्या कोर्टातल्या सगळ्या वकिलांना केस कापायला घेऊन जातो.



मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...